डिप्रेशन, तणाव, नैराश्य आणि भावनांचा अतिरेक हा कोणीही टाळू शकत नाही, पण ह्यावर ताबा ठेवता येतो

डिप्रेशन, तणाव, नैराश्य आणि भावनांचा अतिरेक हा कोणीही टाळू शकत नाही, पण ह्यावर ताबा ठेवता येतो, तुम्हाला आलेच पाहिजे. 


तणाव, नैराश्य कधीतरी तुम्ही काय आणि मी काय सर्वांनाच येते फक्त फरक इथे हाच आहे कोण कसा हाताळतो व कोण वाहत जातो. 


जिथे तणाव नैराश्य हे १५ दिवस ते ३ महिन्यांपेक्षा जास्त असते तिथे तुम्हाला मानसोपचार तज्ञांची मदत हि घ्यावीच लागेल नाहीतर तणाव नैराश्य वाढत जावून तुम्हाला मानसिक आजार बळकावण्याची शक्यता वाढत जाते. 


मानसिक आजारांवर उपचार हे खर्चिक आहेत पण इतके खर्चिक नाही कि जिथे तुमची अनेक वर्षे वाया जातात व तुम्ही आनंद मौज मजा न करत नैराश्यात आयुष्य जगता. 


तुम्ही तुमची ध्येय स्वप्ने ह्यावर पाणी सोडता ह्या सर्वांची किंमत ठरवू शकत नाही ना? कारण ते तुमचे आयुष्य आहे, तुमची वेळ आहे, तुमचे ध्येय स्वप्ने आहेत ती अमुल्य असणारच. 


उपाय खरच सोपे आणि प्रभावशाली आहेत. 


सुरुवात हि ध्यान आणि व्यायामापासून करा, छंदावर काम करा, ध्येय स्वप्ने पूर्ण करण्याच्या कामाला लागा आणि समविचारी लोकांच्या संपर्कात रहा. 


आणि समजा तरीही डिप्रेशन दूर नाही झाले तर समुपदेशन करा, मानसोपचार तज्ञांची मदत घ्या, जास्त तीव्रता असेल तर मनोविकारतज्ञांची मदत घ्या, मनोविकारतज्ज्ञ तुम्हाला गोळ्या देतील ती त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खा व जेव्हा ते थांब बोलतील तेव्हा गोळ्या घेणे थांबवा. 


खरच फरक पडतो. 


अगदी सोपे आहे.


आपल्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या. 


मानसिक आरोग्याशी तडजोड करू नका.


आज आता ह्या क्षणापासून सुरुवात करा.


धन्यवाद


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,

मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

 

Comments