जेव्हा आपण सुपीक जमिनीत बी पेरतो तेव्हाच झाड उगवते, आणि जास्त किलोमीटर मध्ये जर सुपीकता असेल तर तिथे जंगल देखील उगवते. जिथे जंगल आले तिथे पाणी तर असणारच, आणि जिथे पाणी असेल तिथे जीवन तर असणारच.
ह्या जंगलात विविध प्रकारचे सजीव वास्तव्य करतात, ज्यांना ज्यांना इथे पोहचायला मिळते ते तीथेच राहतात. आता जो पर्यंत सुपीकता आहे तोपर्यंत हे जंगल तर राहणारच आणि सजीव देखील.
नैसर्गिक रित्या हि सुपीकता जायला शेकडो वर्षांचा कालावधी जातो, सुरुवातील सुपीकता अशीच जात नाही तर पाण्याचा प्रवाह कमी होतो किंवा आटून जातो. ह्या होत्या नैसर्गिक समस्या आणि ह्या समस्यांची चाहूल मनुष्य प्राणी सोडून इतर सर्व प्राण्यांमध्ये टिकून आहे.
आता बी च्या जागी स्वतःला ठेवून बघा. तुमचा सर्वांगीण विकास झाला आहे कि नाही?
जर तुमचा सर्वांगीण विकास झाला असेल तर अति उत्तम.
जर एखाद दुसरे आत्मविकास बाकी असतील तर ते खाद्य स्वरुपात तुम्ही मिळवू शकता जसे कि समुपदेशन, ध्यान, आत्मविकासाचे कोर्सेस जसे कि आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन शास्त्र आणि उर्जा शास्त्र रेकी हिलिंग व इतर ह्या द्वारे.
आणि जर पूर्णच आत्मविकास बाकी असेल तर तुमचे आजूबाजूचे वातावरण सुपीक नाही आहे. तुम्हाला त्या वातावरणातून बाहेर पडावेच लागेल आणि हा नियम तुमच्या कौटुंबिक वातावरणाला देखील लागू आहे. जे आहे ते स्पष्ट सांगितले आहे. तुम्हाला तुमचे वातावरण सुपीक आहे कि नाही हे ओळखायला जमत नसेल तर तज्ञांचे मार्गदर्शन घ्या, सल्ला घ्या, प्रशिक्षण घ्या.
बी काही स्वतःहून चालत जावू शकत नाही पण तुम्ही जावू शकता. जर तुम्हाला वाटले कि तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात सुपीकता नाही आहे तर तुम्ही सुपीक सकारात्मक वातावरणात जावून स्वतःचा सर्वांगीण विकास करून घेवू शकता. तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर तज्ञांचे मार्गदर्शन घ्या, सल्ला घ्या, प्रशिक्षण घ्या.
झाड काही स्वतःहून चालत जावू शकत नाही पण तुम्ही जावू शकता. जर तुम्हाला वाटत असेल कि आजूबाजूच्या वातावरणातील सुपीकता संपली, पाणी आटले तर तुम्ही सुपीक जमीनच्या शोधात जावू शकता. तुम्हाला एकट्याला जमत नसेल तर तज्ञांचे मार्गदर्शन घ्या, सल्ला घ्या, प्रशिक्षण घ्या.
तुमचा सुपीकतेचा प्रवास हा सोपा पण असू शकतो किंवा कठीण देखील, पण तुम्हाला हा प्रवास तर करावाच लागणार आहे, ह्याला दुसरा पर्याय नाही.
हे बघा तुम्ही दुष्काळी जमीन म्हणजे नकारात्मक वातावरणात आमच्या सारख्या तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली राहू शकता जसे ग्रीन हाउस सारख्या कृत्रिम वातावरणात रोप उगवतात तसेच पण मला हे मान्य नाही आणि हे माझे वयक्तिक मत आहे, कारण जर तुम्ही नकारात्मक वातावरणात राहिलात तर कधी ना कधी तरी त्याचा परिणाम हा तुमच्यावर होणारच आहे त्यापेक्षा कठीण निर्णय घेतलेले बरे.
कृत्रिम ते कृत्रिमच असते आणि नैसर्गिक ते नैसर्गिक.
आता कळाले का कि तुम्ही तुमचा सर्वांगीण विकास करू शकता, ध्येय स्वप्ने पूर्ण करू शकता, तुमच्या स्वप्नांचे आयुष्य जगू शकता, तुम्ही स्वतः देखील करू शकता व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली देखील.
हा प्रयोग खरच खूप सोपा आहे आणी तुम्ही तुमच्या घरात दोन कुंड्या लावून देखील हा प्रयोग करून बघू शकता. तुम्ही सर्वकाही एका कागदावर किंवा डायरी बनवून लिहून देखील बघू शकता कि तुमचा परिसर राहण्यालायक आहे कि नाही, ह्यामध्ये आजू बाजूचे सर्व लोक देखील आलेत मग ती लोक कुठलीही का असेना.
जास्त काही करायची गरज नाही, स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्ती आणि कमजोरी ओळखा, स्वतःच्या मानसिकतेला प्राधान्य द्या, स्वतःच्या मर्यादा ओळखा आणि त्यानुसार स्वतःमध्ये बदल करा.
जर त्याच परिस्थिती मध्ये राहून तुमचा सर्वांगीण विकास होत असेल तर करा आणि नाही तर सुपीक परिस्थितीमध्ये जा.
खालील जीवनशैली अवलंबवा :
१) ध्यान
२) व्यायाम
३) योग्य आहार
४) सकारात्मक वातावरण ह्यामध्ये परिस्थिती आणि लोक दोन्ही आली.
५) आर्थिक विकास
६) स्वयंशिस्त. बेशिस्त लोकांपासून लांब रहा, किंवा ज्या लोकांमुळे तुमची शिस्त जी तुम्हाला सर्वांगीण विकसित आयुष्य जगायला मदत करत असते ह्याला धक्का लागत असेल तर अश्या लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका.
७) नकारात्मक लोकांना सहसा दुसरी संधी देवू नका आणि दिली तरी तिसरी संधी हि शेवटची ठेवा.
मला आशा आहे कि मला जे बोलायचे आहे ते तुम्हाला समजले असेल. हि माझी सिद्ध झालेली थेअरी आहे, मी साक्षी आहे लोकांचे सर्वांगीण विकास बघण्याचा त्यामुळे तुम्ही ह्या थेअरी चा वापर आरामात करू शकता.
तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा, सोपे आहे, बिनधास्त प्रयत्न करा, मी आहे तुमच्यासोबत.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,
मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment