आकर्षणाचा सिद्धांत लोकांच्या आयुष्यात कसा काम करतो ते समजून घ्या


 कल्पना करा


तुम्ही एक श्रीमंत व्यक्ती आहात. 


इथे श्रीमंती आपण फक्त आर्थिक स्वरुपात बघत आहोत.


ह्या श्रीमंत व्यक्तीकडे पैसे, संपत्ती, फायदा करून देणारी परिस्थिती आणि लोक आकर्षित होतात.


आता परिस्थिती आणि लोक कोण?


मागील माझ्या लेखात बघा कि एकाने जमीन कि घर हे खूप स्वस्तात घेवून विकले, निव्वळ दुप्पट तिप्पट नफा. अशी लोक आणि परिस्थिती आकर्षित होते. हे काही गैर फायदा घेण्यासाठी नाही तर योग्य व्यक्ती आकर्षित होते.


हा झाला एक भाग. आता पुढे टिकवून ठेवणे खूप महत्वाचे आहे.


हि श्रीमंत लोकं सकारात्मक आणि भाग्यशाली राहण्यासाठी आत्मविकास, मानसिक विकास व अध्यात्मिक विकास करत असतात आणि जिथे कमी पडतात तिथे तज्ञांचे मार्गदर्शन घेतात, सल्ला घेतात आणि वेळो वेळी प्रशिक्षण चालू असते.


ह्या श्रीमंत लोकांची जीवनशैली सकारात्मक आणि आरोग्यदायी असते.


ध्यान, व्यायाम हा त्यांचा रोजचा दिनक्रम असतो. जर एखाद दिवशी राहून गेले तर सतत काहीतरी राहून गेल्यासारखे वाटते इतकी सकारात्मक राहण्याची सवय लागलेली असते.


श्रीमंत लोक हि विचारांच्या बाबतीत अगदी सुस्पष्ट असतात. त्यांना जे पाहिजे असते ते माहिती असते. द्विधा मनस्थिती मध्ये पडत नाहीत.


ह्या लोकांचे कधीही ध्येय हे अल्पकालीन नसते तर दीर्घकालीन असते.


एका महिन्यात शेअर चे भाव दुप्पट अश्या प्रलोभनांना बळी पडत नाही. त्यांना माहिती असते कि आज जे शेअर्स चे भाव दुप्पट करत आहेत ती लोक अश्या जाहिराती कधी करत नाही व २ ते २०, ३० किंवा ४० वर्षे त्यांनी शेअर बाजाराचा अभ्यास करायला घालवलेली असतात.


आता हा झाला श्रीमंतीचा भाग इथे विविध प्रकारे आकर्षणाचा सिद्धांत लोकांच्या आयुष्यात काम करत असतो.


काहींचा आकर्षणाचा सिद्धांत हा आरोग्य आकर्षित करून देतो.


काहींचा आकर्षणाचा सिद्धांत हा लग्नासाठी जोडीदार आकर्षित करून देतो.


काहींचा आकर्षणाचा सिद्धांत हा नोकरी आकर्षित करून देतो.


काहींचा आकर्षणाचा सिद्धांत हा शारीरिक सुख आकर्षित करून देत असतो.


काहींचा आकर्षणाचा सिद्धांत हा वेळो वेळी लॉटरी जिंकून देतो, पडलेले पैसे मिळतात.


काहींचा आकर्षणाचा सिद्धांत हा संकटातून पूर्णपणे बाहेर काढून देत असतो.


व्यक्ती तितक्या प्रकृती. ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते अमर्याद भेटत जात असते.


तुमच्या आजूबाजूलाच अशी अनेक उदाहरणे मिळतील आणि तेच वास्तव आहे.


तर्कावर विजय मिळवलेला दिसेल.


हीच शक्ती तुम्हाला जागृत करायची आहे.


सकारात्मक रहायचे आहे.


ध्यान करायचे आहे.


व्यायाम करायचे आहे.


सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहायचे आहे.


आत्मविकास व त्या संलग्न कोर्सेस करत रहायचे आहे.


तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहायचे आहे.


सोपे आहे.


वर्षाचा पहिला महिना हा सकारात्मक सुरु करून टाका.


पहिला महिना शक्य नाही झाला तर जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा सुरु करा.


पण एकदा का सुरु केले कि मागे हटू नका.


एकच आयुष्य भेटले आहे त्याचे सोने करा व तुम्हाला जसे आयुष्य जगायचे आहे तसे जगा.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,

मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments