आकर्षणाचा सिद्धांत बाहेरून काम करतांना तेव्हाच दिसतो जेव्हा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही आकर्षित करता पण आकर्षणाचा सिद्धांत हा तुमच्या अंतर्मनात सतत काम करत असतो व तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देत असतो.
जे अंतर्मनात काम चालते ते अतिशय वास्तव असते फक्त तुम्हाला जागृत अवस्थेत जाणवत नाही. जेव्हा तुम्ही अंतर्मनात जगता तेव्हाच तुम्ही ते जागृत अवस्थेत आकर्षित करू शकता.
मुंबईत स्वतःचे घर जास्तीत जास्त लोकांना शक्य नसते तरीही आकर्षणाचा सिद्धांत घर आकर्षित करून देतो तेही २ ते ५ वर्षात. तुम्हाला हि २ ते ५ वर्षे जास्त कालावधी वाटत असेल पण करोडो चे घर घ्यायला इतका कालावधी हा जातोच, जिथे कमी वेळ असतो तिथे घोटाळा असतो आणि तुमची १०० % फसवणूक हि होणारच.
हि जी २ ते ५ वर्षे असतात त्यामध्ये ती व्यक्ती २०० ते ५०० वर्षांचे आयुष्य हे अंतर्मनात जगलेली असते. विविध आयाम जगलेली असते. विविध मार्ग अवलंबून झालेले असतात. हे सर्व झाल्यानंतर घर तर आकर्षित होतेच पण सोबत त्या दर्ज्याची जीवनशैली मेंटेन ठेवू शकते त्यापेक्षा जास्त पैसा तिच्याकडे असतो.
चमत्कार तर प्रचंड घडत असतात, घर घेणे हे दूर राहिले पण जो प्रत्येक क्षण असतो त्यामध्ये सर्व काही मिळत जात असते, दिशा योग्य असते, जर दिशा चुकली तर सल्ला घेवून किंवा उपाय, उपचार करून परत योग्य दिशेने प्रवास सुरु होतो.
फक्त एकच ध्येय नाही तर अनेक ध्येय साध्य झालेली असतात. अश्या छोट्या मोठ्या ध्येय आणि स्वप्न ह्यांची पायरी बनत तुम्ही एक सकारात्मक, भाग्यशाली आणि चमत्कारिक आयुष्य जगता.
ब्रम्हांड सरळ अंतर्मनाशी जुळलेला असतो त्यामुळे तुम्ही कितीही का सकारात्मक विचार करेना पण जोपर्यंत अंतर्मनात सकारात्मकता रुजून वाढलेली नसेल तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही. जे अंतर्मनात आहे तेच मिळणार. सकारात्मक असेल तर सकारात्मक मिळेल आणि नकारात्मक असेल तर नकारात्मक मिळेल.
जी लोक तुम्हाला चमत्कारिक आयुष्य जगतांना दिसत आहे ती अंतर्मनात अगदी सुस्पष्ट ध्येय घेऊन चाललेली असतात, त्यांना जर पैसा पाहिजे असेल तर पैसा कसा मिळणार हे अंतर्मनात अगदी सुस्पष्ट असते, ते कधीही द्विधा मनस्थिती मध्ये राहत नाही. ते मानसिक आरोग्याबाबत सुस्पष्ट असतात, शारीरिक आरोग्य बाबत सुस्पष्ट असतात, कुटुंबाबाबत सुस्पष्ट असतात, जोडीदाराबाबत सुस्पष्ट असतात, शारीरिक गरजा पूर्ण करण्याबाबत सुस्पष्ट असतात.
तुम्ही इतके सुस्पष्ट आयुष्य जगत असता कि नाही? कि सतत नकारात्मक विचार करत आयुष्य जगत असता?
हा लेख एकदा नाही तर जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत वाचा, एकदा का समजले कि तुम्हाला तुमचे उत्तर मिळून जाईल. आज आता ह्या क्षणी ठरवा आणि त्याच दिशेने जा आणि बघा कसे पुढील क्षणी ते जास्तीत जास्त ३ महिन्यात तुम्हाला जे पाहिजे ते कसे मिळते ते.
आभारी आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment