प्रोस्ताहन देणारी, आत्मविकास करणारी आणि मानसशास्त्रावरील पुस्तके सर्वच वाचतात. काही अनेक पुस्तके वाचतात आणि ह्यामध्ये मी पण होतो पण जेव्हा समजले कि वाचन आणि कृतीत फरक आहे, वाचन हि एक थेअरी आहे तर कृती हे प्रैक्टिकल आहे.
अशी अनेक लोक भेटली जी पुस्तके न वाचता सुद्धा ज्ञानी आहेत व आत्मविकास केला आहे त्यामुळे असे समजू नका कि सर्वच पुस्तकाने मिळेल म्हणून, आयुष्यात सर्व मार्ग मोकळे आहे.
आयुष्य हे स्वतः एक पुस्तक आहे फक्त आपल्याला भूतकाळाचे पान वाचता येते, वर्तमान काळाचे पान आता लिहिणे चालू असते व भविष्य काळाचे पान हे पूर्ण कोरे असते. ज्या समजूतदार व्यक्ती मिळाल्या त्या सर्वांनी आयुष्यात अनुभव घेतले होते त्यामुळे ते समजूतदार झाले ना कि पुस्तक वाचून. आयुष्य एकदाच शिकवते ते पण कायमस्वरूपी.
ह्याचा अर्थ असा नाही कि पुस्तके वाचायची नाही म्हणून, इतके टोकाचे विचार नको, प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने आयुष्य जगत असते, मला पुस्तकांचा फायदा झाला पण खरा फायदा तेव्हा झाला जेव्हा पुस्तके वाचणे सोडले व प्रत्यक्षात कृती करायला लागलो. इथे पुस्तकांचा दोष नाही आणि नाही तुमचे काही चुकले, फक्त मार्गदर्शनाची गरज आहे ते मी इथे देत आहे.
समजा तुम्ही अबक पुस्तक वाचत आहात, समजा कि ३ दिवस, ७ दिवस किंवा १ महिन्यात तुम्ही पुस्तक वाचून संपवले, समजा तेच पुस्तक परत परत वाचले आणि ३ महिन्यात वाचून संपले आता इथून पुढे तुमच्याकडे ४ मार्ग आहे,
१) दुसरे पुस्तक घेवून येणे
२) ते पुस्तक कृतीत उतरवणे, ह्यामध्ये कमीत कमी ३ महिने ते जास्तीत जास्त २ वर्षे जातात
३) सामुहिक किंवा वयक्तिक कोर्सेस करणे, इथे ३ महिने ते २ वर्षांचा कालावधी अजून कमी होतो
४) सल्ला मार्गदर्शन घेणे, इथे देखील कालावधी कमी होतो.
मी वाचलेली काही पुस्तके अशी आहेत जी पीएचडी पदवीधरांनी लिहिलेली होती, त्यामध्ये जे शेअर केले गेले ती त्या लोकांची जीवनशैली होती म्हणजे विचार करा लोकांचे १०, २०, ३० वर्षांचे अनुभव व शास्त्रज्ञांची मेहनत त्यामधून हे एक पुस्तक लिहिले गेले होते, म्हणजे तुम्ही ते पुस्तक ३ दिवसात संपवा किंवा ३ वर्षात इथे महत्वाचे एक आहे कि पुस्तकांमध्ये २ शास्त्रज्ञ, ५ प्रयोगासाठी निवडलेली लोक, मागील फोलोव केलेले रेफरंस चला इथे एकच पकडू असे सरासरी लोकांचे आयुष्य आपण ६० वर्षे पकडू म्हणजे ८ लोकांचे आयुष्य लागलेले होते, ६० x ८ = ४८० वर्षांची मेहनत त्यामध्ये दडलेली आहे.
हि वरील आयुष्याची आकडेवारी ह्यासाठी देण्यात आली आहे कारण तुम्हाला समजले पाहिजे कि ते पुस्तक किती अमुल्य किमतीचे आहे व त्याचा तुमच्या आयुष्यात वापर केल्यास किती फायदा होऊ शकतो ते. पुस्तक आणि अनुभव ह्यांची तुलना करू नका कारण अनुभव हे जास्त महत्वाचे आहे. अनुभव वाचणे आणि अनुभव मिळवणे ह्यामध्ये फरक आहे, अपयशी होवून यशस्वी झालेल्या लोकांची पुस्तके वाचणे व स्वतः जेव्हा तुम्ही अपयशातून जात असता तेव्हा अनुभवणे ह्यामध्ये फरक आहे.
कुठलेही एक पुस्तक वाचा मग ते कृतीत उतरवा मग बघा किती फायदा होतो ते, फक्त पुस्तके वाचणे महत्वाचे नाही तर तुमचे जगणे देखील असे असले पाहिजे जिथे लोक पुस्तके लिहितील.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment