ध्यानाचे मुख्य उद्देश हे एखाद्या कृतीवर लक्ष केंद्रित करणे आहे.

ध्यानाचे मुख्य उद्देश हे एखाद्या कृतीवर लक्ष केंद्रित करणे आहे. तुम्ही जेव्हा ध्यान करता तेव्हा शांत बसता व श्वासावर लक्ष केंद्रित करता जेणेकरून तुमचे सर्व लक्ष हे श्वासावर केंद्रित होते व विचारांची शृंखला तुटून जाते.


जेव्हा दररोज तुम्ही ध्यानाचा सराव करता तेव्हा तुमचे विचारांवर नियंत्रण मिळते, भावना नियंत्रित करू शकता व कृती ताब्यात ठेवू शकता. ह्यामुळे तुम्ही योग्य विचार करून, भावना निर्माण करून योग्य कृती करू शकता.


किती सोपे आहे ना?


पण तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही चुकलात तर किती मोठे परिणाम तुम्हाला भोगावे लागतात ते?


जर तुम्ही विचारांवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर अति विचाराने ग्रासू शकता, नकारात्मक भावना उफाळून येतात व भावनेच्या भरात अशी कृती करता कि तिची तुम्हाला खूप मोठी शिक्षा मिळून जाते.


इतके सोपे ध्यान जर तुम्ही केले असते तर तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा झाला असता.


मन शांत झाले असते.

मन एकाग्र झाले असते.

एका वेळेस एका कामावर लक्ष केंद्रित करू शकला असता.

भावनांवर नियंत्रण मिळवता आले असते.

वर्तमानात होणाऱ्या चुकांपासून तुम्ही वाचला असता.

वेळेची बचत झाली असती.

पैश्यांची बचत झाली असती.

नातेसंबंध सुधारले असते.

असे अनेक फायदे झाले असते.


तुम्हाला काय करायचे होते?

फक्त ध्यान.


ज्यांचा ध्यानावर विश्वास नाही त्यांचे जावू द्या पण तुमचा आहे ना? ज्याला जसे आयुष्य जगायचे आहे तो जगेल तुम्हाला उत्तम दर्जाचे आयुष्य पाहिजे कि नको? ती व्यक्ती त्याचा श्वास घेते तुम्ही तुमचा मग कुणाचा काय विश्वास असण्यापेक्षा तुमची मानसिकता अशी तयार करा कि तुम्ही आत्मविकासासाठी जे काही कराल मग ते समुपदेशन असो, ध्यान असो, संमोहन असो किंवा रेकी हिलिंग त्या सर्वांचा तुम्हाला फायदा हा होणारच मग बघा कसे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतात ते.


नेहमी लक्षात ठेवा कि तुम्ही जितके जास्त ध्यान कराल तितके जास्त तुम्ही स्वतःला ओळखाल, तुमचे ध्येय स्वप्ने तुम्हाला स्पष्ट दिसतील व तुम्ही ते साध्य कराल. इतके सोपे आहे.


जी लोक ध्यान करतात ती अगदी स्पष्ट असतात व जेव्हा ती समुपदेशनासाठी येतात तेव्हा फक्त ५ ते १० मिनिटे समस्येवर काम करण्यात जातात आणि जर वेळ बाकी असेल तर त्यांच्या आवडीचे जे काही आहे त्यावर आमचे बोलणे सुरु असते. सकारात्मक बोलण्यामध्ये वेळ कधी निघून जातो तेच समजत नाही.


जी लोक मनापासून ध्यान करत नाहीत ती जेव्हा समुपदेशनासाठी येतात तेव्हा त्यांचा वैचारिक गोंधळ हा खूप असतो, त्यांचे चित्त थाऱ्यावर नसते, भावनांवर ताबा नसतो व हेच उत्तर पाहिजे असे ठरवून आलेले असतात.


ध्यानामुळे फक्त तुमचाच नाही तर तुमच्या कुटुंबाचा, नातेवाईक, मित्र मंडळींचा, तुमच्या सहवासात येणाऱ्या सर्व लोकांचा फायदा होतो. आयुष्य हे फक्त जगण्यात जाते व जरी समस्या आली किंवा कितीही मोठे संकट जरी आले तर ध्यानामुळे निर्माण झालेल्या शांत मनामुळे संकटे आणि समस्यांचे वादळ हे तिथेच रोखले जाते.


ध्यान तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचवते. ह्यासाठी ध्यान हि तुमची जीवनशैली असली पाहिजे ना कि कधीतरी करणार व परत सोडून देणार, असे नाही चालणार. जर ध्यानाबद्दल ऐकायचे झाल्यास जी लोक २, ३ वर्षे सतत ध्यान करतात त्यांच्यापासून ऐका बाकी कुणाकडून नको. जीवनशैलीला  दुसरा पर्याय नसतो.


असे नाही कि ध्यान करणाऱ्यांना आयुष्यात समस्या नसतात म्हणून? त्यांच्या पण आयुष्यात समस्या असतात पण त्यांचा ते आयुष्याच्या इतर भागांवर परिणाम होऊ देत नाही, ते त्या समस्या योग्य पद्धतीने हाताळतात, फक्त समस्येमुळे जीवनातील सकारात्मकता आणि आशा सोडून देत नाही. विनाकार टोकाचे विचार किंवा गैरसमज नको.


एखाद्या ध्यान करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा राग येतो तेव्हा समजून जायचे कि जो कोणी जबाबदार असेल त्याने मर्यादेच्या अतिपलीकडे मर्यादा ओलांडली असेल, एखाद्याला कराटे येतात म्हणून त्याला मारून तपासू शकत नाही ना? भले तो एखाद दुसरा मार खाईल पण ते भांडण टाळण्यासाठी पण त्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेले तर परिणाम तर भोगावेच लागतील.


म्हणून बोलतो कि ध्यान करा, ध्यान तुम्हाला स्वतःसोबत अजून जुळवून टाकते. ध्यान करा व आयुष्याचा आनंद घ्या.


धन्यवाद

अश्विनीकुमार


आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

 

Comments