नेहमी स्वतःसोबत बोलतांना सकारात्मक बोला.
नेहमी स्वतःबद्दल विचार करतांना सकारात्मक करा.
नेहमी स्वतःबद्दल भावना व्यक्त करतांना सकारात्मक भावना व्यक्त करा.
नेहमी स्वतःसाठी ध्यान साधना आणि व्यायाम अश्या सकारात्मक कृती करा.
तुम्ही जेव्हा एकांतात असता तेव्हा तुम्हाला हे सर्व करायचे आहे. संकटे आणि समस्या ह्या सर्वांच्या आयुष्यात असतात, त्या मुळे निर्माण होणाऱ्या भावना दुख, निराशा आणि तणाव ह्या व्यक्त होऊ द्या विनाकारण दाबून ठेवू नका. जर रडायला येत असेल तर रडा, पूर्ण व्यक्त व्हा पण जेव्हा सुद्धा एकांतात जाल तेव्हा कुठलेही स्वतःला दोष देणारे नकारात्मक विचार, भावना, मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडवणारी कृती नको.
एकट्यात तुम्ही रडता, स्वतःला दोष देता व चार चौघात वावरतांना जबरदस्तीने हसत वावरता असे वागणे योग्य नाही, असे वागणे आज ना उद्या तुमचाच घात करणार. जी लोक त्यांच्या आयुष्यात कितीही मोठ्या समस्या किंवा संकटे का असेना पण चार चौघात वावरतांना मनापासून आनंदाने वावरतात ते कधीही नैराश्याने ग्रस्त होत नाही पण जे खोटे हास्य दाखवतात ते नैराश्याने ग्रस्त होतातच.
सतत हसत राहणारी व्यक्ती आनंदी आत्मविश्वासू असते आणि सिरीयस चेहरा घेवून राहणारी व्यक्ती आनंदी आत्मविश्वासू नसते हा गैरसमज आहे. जिथे समविचारी लोक असतात तिथे लोक आनंदी असतात त्यामुळे जर एखादी व्यक्ती जास्त वेळे तुमच्यासोबत आहे पण आनंदी नाही तर समजून जा कि तुमचे विचार जुळत नाही, ह्यामध्ये काहीही गैर नाही, मला माहिती आहे कि मी कुठे आनंदी असतो तिथे मी जातो इतके सोपे आहे, इथे कुणाचाही दोष नाही.
आनंद आतून बाहेरून दोन्ही ठिकाणाहून असला पाहिजे. बाहेरील परिस्थिती तुम्हाला अनुकूल नाही आणि तरीही तुम्ही त्या वातावरणात राहता इथे तुमची चुकी आहे. एखाद ठिकाणी काम करतो मग ठीक आहे कारण तिथे आपण सर्वाइव्ह होत आहोत त्यामुळे कितीही का नकारात्मक परिस्थिती असेना इथे आपल्याला जोपर्यंत दुसरीकडे संधी मिळत नाही तोपर्यंत रहावेच लागेल.
लक्षात ठेवा कि कोणीही तुमचे राशन भरणार नाही, कोणीही तुमचे वीज बिल भरणार नाही, कोणीही तुमचे, तुमच्या कुटुंबाचे हॉस्पिटलचे बिल भरणार नाही त्यामुळे इथे तुम्हालाच मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम बनावे लागणार आहे. आयुष्य जगतांना, जिवंत राहण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आप आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असते, तुमच्याकडे आवडीचे काम आहे, आजूबाजूचे लोक सकारात्मक आहे ह्याचा अर्थ असा नाही कि सर्वांनाच तीच परिस्थिती मिळेल म्हणून.
म्हणून लेखाच्या सुरुवातीची वाक्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात जगवण्यात मदत करतील. दररोज सकाळी त्या वाक्यांचा सराव करा मग बघा तुम्ही तुमच्या अंतर्मनात बदलाल व तुमचे अंतर्मन हे बाहेरील परिस्थिती बदलेल. हो हे सत्य आहे. इथे आपण नकारात्मक परिस्थितीला विरोध नाही करत तर सकारात्मक परिस्थितीला उर्जा देत आहोत.
आहे कि नाही सोपे. मग कराल ना प्रयत्न.
लाईक करायचे असेल तर स्वतःला लाईक करा.
सबस्क्राईब करायचे असेल तर तुमच्यातील सकारात्मक गुणांना सबस्क्राईब करा.
शेअर करायचे असेल तर तुम्ही स्वतःला आहे तसे ह्या जगामध्ये शेअर करा.
तुमची पूर्ण झालेली ध्येय, स्वप्ने शेअर करा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Video by Marsel Sharipov from Pixabay
Comments
Post a Comment