योग्य पद्धतीने केलेले ध्यान प्रभावशाली आहे


 तुम्ही जर स्वतःहून ध्यान साधना करत असाल तर नेहमी लक्षात ठेवा कि ध्यान साधना एक प्रकारे इंधनासारखे आहे. रॉकेटची दिशा हि नेहमी आकाशाच्या दिशेने असते आणि जेव्हा रॉकेटचे इंधन जळते तेव्हा रॉकेट हे आकाशाच्या दिशेने जाते.


आता समजा रॉकेट ची दिशा हि जमिनीच्या दिशेने ठेवली असेल तर?


रॉकेट जमिनीवर फुटले ह्यामध्ये इंधनाचा काय दोष?


समजा जर तुमच्या अंतर्मनात एखाद दुसरी नकारात्मकता असेल आणि ती न काढता तुम्ही ध्यान करत असाल तर ती नकारात्मकता हि जास्त वाढणारच. ह्यामध्ये ध्यानाचा काय दोष? ध्यान तर त्याचे काम करतच राहणार.


इथे सरळ एक चुकी दिसून येते ती म्हणजे तुम्ही तुमच्या समस्येवर काम केलेले नाही. समस्येवर काम केले नाही ह्याचा अर्थ तुम्ही करत असलेली ध्यान साधना हि योग्य आहे पण तुमच्यासाठी नाही किंवा तुम्ही ती योग्य पद्धतीने करत नाही किंवा तुम्ही फक्त करायचे म्हणून करत आहात.


नुसते श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ध्यान साधना योग्य पद्धतीने आणि मनापासून केली तरी प्रचंड चमत्कार घडतात इतकी ध्यान साधनेची क्षमता आहे.


एक लक्षात ठेवा कि तुमचा मेंदू हा एक अवयव आहे, तुम्ही जसे त्याला घडवाल तसे तो घडेल. सकारात्मक घडवा सकारात्मक घडेल आणि नकारात्मक घडवा तर नकारात्मक घडेल. त्यामध्ये जर काही समस्या ठेवून घडवला तर तुमचा मेंदू तसाच घडेल. ह्यामध्ये ध्यान साधनेची काहीही चूक नाही, सर्वस्वी चूक तुमची आहे.


ध्यान असो किंवा बंदूक, मग ती मोफत मिळाली किंवा लाखो रुपये खर्चून मिळाली, काम तर जी व्यक्ती करवून घेणार आहे तिच्यावर सर्वकाही अवलंबून आहे. ह्यामध्ये ना ध्यानाची आणि ना हि बंदुकीची चुक आहे.


योग्य पद्धतीने ध्यान करा व त्याचे फायदे अनुभवा. गर्व बाजूला ठेवा व जिथे सल्ला, मार्गदर्शनाची गरज वाटते तिथे घ्या आणि जर तुमच्यात गर्व बाकी असेल आणि तुम्हाला मदतीची गरज वाटत नसेल तर मग तुमची ध्यानाची दिशा हि पूर्णच चुकली आहे.


आयुष्य सोपे आहे, कठीण करू नका.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments