तुमची उर्जा वास्तूवर आणि वास्तू ची उर्जा तुमच्यावर प्रभाव पाडू शकते


 उर्जा शास्त्रानुसार आपली उर्जा वास्तू वर प्रभाव पाडू शकते किंवा वास्तू ची उर्जा आपल्यावर प्रभाव पाडू शकते. मग ती तुम्ही स्वतः घेतलेली वास्तू असो किंवा त्या वास्तू च्या सहवासात तुम्ही आला असाल, मग ते घर, ऑफिस, कारखाना किंवा इतर प्रकारच्या वास्तू असे काहीही असू शकते.


इथे उर्जेच्या शक्तीवर सर्वकाही अवलंबून आहे. समजा जर तुमची उर्जा कमजोर असेल आणि सहसा आपली उर्जा हि कुठल्याही वास्तू पेक्षा कमजोरच असते फक्त उच्च लेव्हल चे मास्टर सोडून, त्यामुळे जास्तीत जास्त वेळा आपल्यावर वास्तूचा प्रभाव हा असतोच.


इथे आस्तिक असो किंवा नास्तिक ह्याने काहीही फरक पडत नाही, जेव्हा त्यांना अनुभव विचारले जातात तेव्हा ते अनेकदा सारखेच असतात. समजा तुम्हाला ती किंवा तो व्यक्ती कसा वाटला? जी चांगली व्यक्ती असेल तर आस्तिक बोलेल कि देव माणूस भेटला आणि नास्तिक बोलेल कि भेटून आनंद झाला, व व्यक्ती चांगली आहे. कारण अध्यात्म आणि विज्ञानाने आपल्याला भावनांचे महत्व पटवून दिले आहे. आणि भावनांना उर्जा असते.


वास्तू चा प्रभाव पडणे काहीही गैर नाही पण जेव्हा प्रभाव नकारात्मक पडतो तेव्हा आपल्याला त्यावर विचार करावा लागतो. सुरुवात सरळ वास्तू तपासणी करून नाही करायची तर समोरील व्यक्ती मानसिक दृष्ट्या निरोगी आहे कि नाही हे तपासायचे आणि जर ती व्यक्ती निरोगी असेल आणि तरीही तिच्यात समस्या निर्माण होत असतील तेव्हा इथे वास्तू तपासण्याची गरज पडते.


इथे मानसिकता तपासण्याचे कारण जे मानसिक समस्येने ग्रस्त असतात त्यांना असेच आभास होत असतात, ह्या आभासांचा आणि वास्तू उर्जेचा काहीही संबंध नसतो, जिथे तर्क काम करत नाही तिथे आपल्याला उर्जा शास्त्राकडे वळावे लागते. मी ह्या सर्व तपासण्या करतो त्यानंतरच जे खरे कारण आहे तेच सांगतो. वास्तू शास्त्रा मध्ये पैसा हि एक उर्जा असते त्यामुळे पैसे उकळण्यासाठी खोटे बोलण्याची गरज पडत नाही.


कुठचीही वास्तू परिपूर्ण नसते फक्त उर्जेचा समतोल राखता आला पाहिजे आणि काही वास्तू अश्या तयार केलेल्या असतात किंवा नकारात्मक उर्जा देवून वास्तू नकारात्मक केलेली असते जिथे नकारात्मक उर्जेसाठी अगदी पोषक वातावरण असते, अश्या वास्तू खूप धोकादायक असतात.


अनेकदा लोक समस्या घेवून येतात व सांगतात कि आम्ही पूजा पाठ केली, वास्तू शांती केली तरीही आम्हाला समस्या का आहेत?


उत्तर अगदी सोपे आहे, समजा आपल्याला आजार झाले आणि आपण जनरल फिजिशियन डॉक्टर कडे जावून गोळ्या घेतल्या व त्या डॉक्टर ने गोळ्या दिला पण आजार बरे झाले नाही ह्याचा अर्थ असा नाही कि डॉक्टर ने गोळ्या चुकीच्या दिल्या म्हणून, इथे मग आपल्याला गरज स्पेशालीस्ट ची येते, त्यापलीकडे जनरल सर्जन आणि अवयव विशेष सर्जन असे प्रकार आहेत. जेव्हा आपण ह्या पायऱ्या वापरतो तेव्हा निदान लवकर होते व लवकर आपण बरे होतो, हो तसा खर्च वाढत जातो, ह्याला पर्याय नाही.


असेच उर्जा शास्त्रामध्ये सुद्धा विशेषज्ञ आहेत आणि तुम्हाला त्यानुसार जावे लागते आणि त्यानंतरच रिझल्ट येतो. तुम्हाला फक्त उपाय पूर्ण करायचे आहेत. बिल्डर्स का लाखो रुपये उर्जा शास्त्र उपयांवर खर्च करत असतात? कारण त्यांचे शेकडो करोडो रुपये लागलेले असतात व काहींचे करोडो देणे देखील असते त्यामुळे इथे उर्जा शास्त्राचा वापर करून ते समस्या आणि संकटांना दूर ठेवतात.


सामान्य सफेद, सकारात्मक किंवा दैवी उर्जा संदर्भात समस्या असेल तर काही नाही पण जिथे काळी, नकारात्मक आणि दानवी उर्जा असते तिथे समस्या हि जास्त मोठी असते. उर्जे मध्ये अजून एक भाग असतो तो म्हणजे अलौकिक उर्जेचा. अलौकिक समस्या देखील मोठ्या असतात. ह्या दोन प्रकारच्या उर्जा मोठी समस्या घेवून येत असतात.


एकदा का त्या व्यक्तीची प्राण उर्जा किंवा वास्तू ची उर्जा शुद्ध केली कि मानसिक, शारीरिक आजार सारख्या समस्या, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्या, वैवाहिक समस्या, उद्योग व्यवसाय संदर्भातील समस्या दूर होवून जातात. उपाय तुम्ही कुठूनही करून घेवू शकता, मग भारतात असो किंवा भारताबाहेर.


उर्जा शास्त्रावरील लेखनमाला आता सुरु होणार आहे, तुमच्याकडे जर एखादा विषय असेल, तुमचे अनुभव असतील त्यावर पुढील लेख लिहिला जाईल. कृपया लेख हा सल्ला, समुपदेशन, तपासणी किंवा उपचार असेल असे समजू नका. त्यामध्ये फक्त सर्वसमावेशक माहिती देण्यात येईल.


धन्यवाद

मास्टर अश्विनीकुमार


रेकी हिलिंग उर्जा, अलौकिक उर्जा, डार्क एनर्जी

Comments