सतत येणारे नकारात्मक विचार हे एखाद्या वाळवीसारखे तुमच्या मन, मेंदूला पोखरत जातात. जर ते नकारात्मक विचार तुमच्या अंतर्मनात रुजले, तुमच्या मेंदूला पोखरले कि त्याचे रुपांतर हे डिप्रेशन, एनझायटी, ओसीडी, अल्झायमर, फोबिया अश्या विविध मानसिक, मनोशारीरिक आणि मेंदूशी निगडीत आजारांमध्ये होते.
सतत येणारे नकारात्मक विचार हे तुमचे खाजगी, व्यवसायिक, सामाजिक, कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्य देखील पोखरून टाकतात. तुमच्यातील आत्मविश्वास हा हळू हळू नाहीसा होऊ लागतो, उद्योग व्यवसायात तोटा सहन करावा लागतो, समाजात कोणीही महत्व देत नाही असे वाटते, कुटुंबात विविध कारणांनी वाद होत राहतात आणि वैवाहिक आयुष्यात सतत खटके उडतात किंवा बाहेरील व्यक्तीचा शिरकाव होतो.
भाग्याची जागा दुर्भाग्य घेते, चमत्कार नाहीसे होवून जातात, सतत विषारी लोकच संपर्कात येतात, जिथे भल्याचे करायला जातात तिथे त्यांनाच आरोपी केले जाते, छोट्या अपघातांचे रुपांतर हे मोठ्या समस्येत होते, एक नकारात्मक शृंखला सुरु होवून जाते.
सततच्या नकारात्मक विचारांची दिशा काय असणार आहे?
सततच्या नकारात्मक विचारांचे ध्येय काय असणार आहे?
सततच्या नकारात्मक विचारांची कृती काय असणार आहे?
नकारात्मकता पेरली तर सकारात्मकता उगवणार का?
वरील प्रश्नांमध्येच तुम्हाला उत्तर मिळून जाईल.
सकारात्मकता आणि नकारात्मकता हे दोन्ही जीवनाचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे आपण ते बाजूला काढून ठेवू शकत नाही. फक्त तुमच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही विसाव्या मजल्यावरून उडी माराल, माराल का उडी? विसाव्या मजल्यावरून मी उडी मारली तर मी मरणार आहे हा विचार नकारात्मक आहे आणि तो योग्य देखील आहे नाहीतर फक्त सकारात्मकते मुळे खरच उडी मारली गेली असती.
"विचार बदला आयुष्य बदलेल." हा सुविचार आला कुठून? वरील लेखात मी ते उत्तर दिले आहे, त्यामुळे विचार बदला, त्याचे रुपांतर कृतीत होईल व तुम्ही तुमचे आयुष्य सकारात्मक घडवाल.
सकारात्मक विचार हे तुमचे आयुष्य घडवतात व सततचे नकारात्मक विचार तुमचे आयुष्य पोखरतात.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Video by Abraham Suna from Pixabay
Comments
Post a Comment