तुम्हाला नक्की काय पाहिजे? का पाहिजे?

तुम्हाला नक्की काय पाहिजे? का पाहिजे?


तुमच्या मनात प्रश्न देखील असे आले पाहिजे ज्याची उत्तरे शोधतांना तुम्हाला ध्येयाच्या जवळ जात असल्याचा अनुभव आला पाहिजे.


मला काय करायचे आहे?

मला काय हवे आहे?

मला कुठे जायचे आहे?

मला कोणते योगदान द्यायचे आहे?

मला काय बनायचे आहे?

मला काय शिकायचे आहे?

मला माझा वेळ कोणासोबत घालवायचा आहे?

कोणाला खर्च, बचत आणि गुंतवणूक करायची आहे?

मला मजा करण्यासाठी किती वेळ हवा आहे?

निरोगी धडधाकट शरीर निर्माण करण्यासाठी मी काय करू?


वरील प्रश्न तुमचा सर्वांगीण विकास करणार आहे, तुमचे सर्वांगीण आयुष्य घडवणार आहे.


सुरुवात एक एक दिवसापासून करायची, जास्त ताण द्यायचा नाही. हे संपूर्ण आयुष्य खर्ची झाले तरी चालेल पण घाई नको. घाई करणाऱ्याला काहीही मिळत नाही, मिळते ती फक्त ठेच आणि आयुष्य ठेच देते तेव्हा तिचे परिणाम मोठे असतात. विषाची परीक्षा नको.


एका वहीत तुम्ही काय काय करणार आहात ते लिहून ठेवा व त्याच मार्गाने जा. मध्ये समस्या येतील त्या कायमस्वरूपी नसतील, परत आपल्या मार्गाला लागा. रात्री झोपण्याआधी आत्म परीक्षण, आत्म चिंतन करा.


इच्छाशक्ती आणि स्वयंशिस्त खूप महत्वाची आहे. ह्याला पर्यायच नाही. धीर धरा, बदल हळू हळू होतो. बी पेरल्या पेरल्या झाड उगवत नाही.


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

 

Comments