प्रत्येक व्यक्तीची उर्जा हि दिसून येत असते. चांगली उर्जा - वाईट उर्जा, शक्तिशाली उर्जा - कमजोर उर्जा, श्रीमंत उर्जा - गरीब उर्जा, दैवी उर्जा - दानवी उर्जा, अलौकिक उर्जा आणि डार्क एनर्जी असे विविध प्रकारच्या उर्जा व्यक्तीमध्ये दिसून येतात.
जेव्हा तुम्हाला चागली व्यक्ती मिळते तेव्हा तिच्या आजूबाजूला सफेद किंवा पिवळसर उर्जा दिसून येते, उर्जा वेगळी आणि औरा वेगळा. उर्जा हि फक्त उर्जाच असते आणि औरा हा एक प्रकारे सुरक्षा कवच असते ज्यामध्ये उर्जा आणी कंपने असतात त्यामुळे औरा हा शक्तिशाली असतो.
आपल्याला अनेकदा काही अनुभव येतात, चांगले अनुभव येत असतील तर काहीही समस्या नाही पण जेव्हा वाईट अनुभव येतात तेव्हा आपल्याला सजग राहता आले पाहिजे, कारण काही व्यक्तींची उर्जा हि तुमच्यावर प्रभाव पाडत असते.
वाईट नकारात्मक दानवी उर्जेकडून नेहमी सकारात्मक उर्जा शोषून तिचे नकारात्मक उर्जेत रुपांतर केले जाते. ह्याचा पुरुषांपेक्षा जास्त परिणाम हा स्त्रियांवर होत असतो कारण नैसर्गिक रित्या स्त्रिया ह्या उर्जा आणि सहावे इंद्रिय ह्याबद्दल जागृत असतात.
नकळत स्त्रिया त्या नकारात्मक उर्जा ह्या घरी घेवून येतात आणि अचानक घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जाते. अचानक नवरा बायको मध्ये वाद व्हायला लागतात, उद्योग व्यवसायात तोटा सुरु होतो, मुलं बिघडतात व गैर मार्गाला लागतात, आजारपण अश्या विविध प्रकारच्या समस्या निर्माण होवून जातात.
ज्या कुटुंबात स्त्री पुरुषांचे समप्रमाण असते तिथे उर्जेचा समतोल राखला जातो पण जिथे स्त्रियांचे प्रमाण जास्त असते तिथे एखाद तरी स्त्री वर नकारात्मक उर्जा हि परिणाम करून टाकतेच व सोबत घरातील पुरुषांवर अचानक आर्थिक मानसिक ताण येतो. भविष्यात निर्माण होणारी संकटे टाळण्यासाठी तुमच्या घरातील स्त्री उर्जा आणि पुरुष उर्जा तपासणे व त्यावर उपाय करणे गरजेचे असते.
जेव्हा स्त्रिया ह्या उच्च पदावर जाणार असतात तेव्हा पुरुषांपेक्षा जास्त नकारात्मक उर्जा ह्या त्यांच्या सहकर्मी स्त्रिया वापरतात व त्या स्त्रीला उच्च पदावर जाण्यापासून रोखतात आणि रोखणे शक्य न झाल्यास तिचे करिअर संपवून टाकतात. अश्या केसेस मुंबई पुण्यावरून माझ्याकडे खूप येत असतात.
इथे जास्त बळी हा चांगल्या कुटुंबाचा जातो, चांगल्या स्त्री पुरुषाचा जातो असे निरीक्षणातून दिसून आले आहे. तुम्हाला फक्त उर्जा ओळखायची नाही तर चांगल्या सकारात्मक उर्जा असलेल्या लोकांना देखील वाचवायचे आहे कारण अश्या लोकांची उर्जा शोषून नकारात्मक उर्जा वाले शक्तिशाली बनतात.
इथे कोर्स पेक्षा उपाय व उपचार हे जास्त कामी येतात कारण उर्जा शास्त्रात पारंगत होण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी जातो, इतके सोपे नाही. आता वर्तमानात केलेले उपाय व उपचार हे तुम्हाला भविष्यात सुरक्षित ठेवू शकतात.
पुढील लेखात आपण जी लहान मुलं सोफ्ट टार्गेट असतात त्यांना म्हणजे तुमच्या मुलांची उर्जा आणि त्यांच्या आयुष्यावर होणारे परिणाम ह्यावर बोलणार आहोत.
मास्टर अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment