दिसत तसं नसत म्हणून जग फसत. जे अंतर्मनात आहे ते दिसत नसत.

दिसत तसं नसत म्हणून जग फसत.

जे अंतर्मनात आहे ते दिसत नसत.


सामान्यतः लोक दिसण्यावर, घातलेल्या कपड्यांवर जातात व त्यांना वास्तव परिस्थिती माहिती नसते.


मी जेव्हा व्यायाम शाळेत जायचो तेव्हा बॉडी बिल्डर इतरांपेक्षा जास्त वजन उचलतांना दिसायचे. मला वाटायचे कि मोठे शरीर आहे म्हणून ते तसे वजन उचलू शकतात. पण तितक्यात एक ओळखीच्या ग्रुप मधील मित्र व्यायाम शाळेत आला व त्याने व्यायाम सुरु केला. शरीरी एकदम काटक आणि कट्स असलेले. जेव्हा त्याने व्यायाम सुरु केला तेव्हा समजले कि हा सर्वात जास्त वजन उचलणारा आहे.


शक्ती हि शरीर किती मोठे आहे ह्यावर अवलंबून नाही तर मनावर, अंतर्मनावर अवलंबून आहे.


एक व्यक्ती अति सामान्य रहायची. तिच्या राहण्यावरून वाटत नव्हते कि ती करोडो रुपयांची मालक आहे. पण जेव्हा ओळखीच्या काकांकडून त्यांची कहाणी समजली तर शॉक बसला, जेमतेम शिक्षण मुंबई मधील पोस्टात नोकरी, आर्थिक ज्ञान नाही, उद्योग व्यवसायाचे ज्ञान नाही आणि तरीही कसे बसे दिवस काढत करोडपती झाली आहे.


बाहेर पडा, चार चौघात वावरा, संबंध चांगले ठेवा तेव्हाच तुम्हाला अश्या आतल्या गोष्टी कळतील, अशी लोक ओरडत फिरत नाही तर सामान्य आयुष्य जगत असतात.


एक मानसिक समस्येने ग्रस्त असलेला व्यक्ती, एकदा असेच ओरडलो, तेव्हा तो गेल्यावर काका बोलले कि तुला माहिती आहे का कि तो कोण आहे? तो जग फिरला आहे, दुबई मध्ये ड्राइव्हर होता, इथे त्याची २ घरे आहेत व त्याला देशी विदेशी अश्या १० भाषा येतात.


मनुष्यावर परिस्थिती येते ह्याचा अर्थ असा नाही कि तो जी परिस्थिती दाखवतो तीच परिस्थिती खरी आहे म्हणून. तुमचे जे स्वप्न असू शकतात ते इतरांनी साध्य करून सोडून देखील दिले असतात. हेच आयुष्य आहे.


समुपदेशन करतांना एक व्यक्ती घरी आली होती, दिसायला काळी व सिनेमात जसे गुंड दाखवतात तसे वाटायचे पण जेव्हा हेच त्या व्यक्तीचे दिसणे त्याच्या समस्येचे मुख्य कारण निघायचे कारण जी अनोळखी लोक असायची ती जसे सिनेमात दाखवत आहे अगदी तसेच गुंड प्रवृत्तीची व्यक्ती समजायची आणि ती व्यक्ती निघाली भावनिक व हळवी. आता विचार करा कि समाजाच्या वागण्याचा त्या व्यक्तीवर किती परिणाम झाला असेल ते?


फक्त दिसण्यावरून कधीही द्वेष करायचा नसतो.


एक पुरुष जिच्याकडे मुली स्त्रिया आकर्षित होतात ती दिसायला जसे सिनेमात दाखवतात तशी नाहीच पण सुंदर स्त्रिया आणि मुली ती व्यक्ती आकर्षित करते.

एक स्त्री जी सुंदर नाही पण तिच्याकडे पुरुष आकर्षित होतात, लग्न झालेले सुद्धा.

ह्याउलट सर्वकाही ठीक असूनसुद्धा जोडीदार भेटत काय जवळपास तसा विचार करणारा पण कोणीच नसतो. ह्यामुळे अनेक तरून तरुणींची लग्न थांबून आहे, प्रेमासाठी जोडीदार मिळत नाही.


ज्याची कंपने सक्षम आहे तो कुठूनही, कुणालाही आकर्षित करू शकतो. कमजोर कंपनवाला तर पहिला आकर्षित होतो.


वास्तव नेहमी आपण जे डोळ्यांनी बघतो त्यापेक्षा वेगळे असते. मन, अंतर्मन, कंपने आणि उर्जा ह्या स्तरावरच व्यक्ती ओळखून येते. दिखाव्यावर कधीही जायचे नाही. आयुष्य तर्कावर चालत नाही तर अंतर्मन, कंपने आणि उर्जेवर चालते.


मी दोन्ही विरोधाभास बघितले आहेत. त्यामधून वास्तव बघायला शिकलो आहे. देवाच्या रुपात दानवही बघितले आहे आणि दानवाच्या रुपात देवही बघितले आहे. बाहेरील रूपरेखा काहीही कामाची नाही.


हा विषय खोल आहे. समजून घ्या, जितके समजून घ्याल तितके तुम्ही जागृत व्हाल व शांततेत आयुष्य जगाल. जर बाह्य स्वरूप बघत आयुष्य जगलात तर सतत तुमची फसवणूक होईल, आणि ह्याचा परिणाम हा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर देखील होईल.


मी ज्या परिसरात राहतो त्याची लोकसंख्या १ लाख ३१ हजार, मुंबईची लोकसंख्या २ कोटी १३ लाख, महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ६७ लाख, भारताची लोकसंख्या १४२ करोड ८६ लाख आणि जगाची लोकसंख्या ८ अब्ज म्हणजे ८०० करोड. हि लोकसंख्या ह्यासाठी सांगितली आहे कि कुणाच्या आयुष्यात काय चमत्कार घडत असतील काय माहित?


जे अंतर्मनात आहे तेच वास्तव आहे मग तुम्ही काय आणि मी काय. जे ज्या व्यक्तीच्या अंतर्मनात असते तेच ती व्यक्ती आयुष्य जगत असते. तिला बाहेरील परिस्थिती जाणवतच नाही इतकी अंतर्मनातील स्व सोबत एकरूप असते म्हणून त्या व्यक्तीला तिचे अंतर्मन तिला जे पहिजे ते देत जातो.


तुम्हाला जे पाहिजे ते अंतर्मनात जगा मग बघा कसे ते तुम्हाला मिळते, तुमचे अंतर्मन आजू बाजूच्या लोकांना दिसून येत नाही तर फक्त तुम्हाला आणि जी जागृत लोक आहेत फक्त त्यांनाच दिसून येते.


म्हणून बोलतो दिसते तसे नसते म्हणून जग फसते.

जे अंतर्मनात आहे ते दिसत नाही.


धन्यवाद

अश्विनीकुमार


आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

 

Comments