ध्यानाची प्रत्येक अवस्था हि जागृत करता आली पाहिजे. ज्यांना अनुभव नाही त्यांना नुसते श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचे ध्यान हि सामान्य क्रिया वाटते पण जी लोक ध्यान आवडीने करतात ती ध्यानाची प्रत्येक पायरी जागृत करत असतात.
जागृत हा शब्द नाही तर अनुभव आहे. तुम्हाला उदाहरण देवून समजावतो.
जेव्हा अनेक वर्षांचा ध्यानाचा अनुभव असलेली व्यक्ती हि ध्यान करते तेव्हा तेव्हा पुढील प्रमाणे अनुभव येतात.
१) संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित होवून वेळेचे अस्तित्व नष्ट होवून जाते.
२) श्वास आत घेतांना व बाहेर सोडतांना जाणवते. जसे दुचाकीवरून प्रवास करतांना आपल्याला हवा जाणवते अगदी तसेच श्वास आत बाहेर घेतांना साधकाला जाणवते.
३) काही जास्त खोलवर जावून ध्यान करतात तेव्हा श्वास आत घेतांना व बाहेर सोडतांना वादळाची अनुभूती येते.
४) आजूबाजूचे काहीही एकू येत नाही, जाणवत नाही.
५) जेव्हा जागृत अवस्थेत येतात तेव्हा आजूबाजूचे जाणवायला लागते आणि इतकी क्षमता जागृत झाली असते कि नकारात्मक लगेच ऐकणे बंद करून टाकतात.
६) बाहेर निघतात तेव्हा जसे पाहिजे तसे घडत जाते. फक्त पुढील व्यक्ती जास्त शक्तिशाली असेल तर ते उर्जा आणि कंपने ह्याद्वारे जाणवून येते तेव्हा आपल्या शक्तिशाली व्यक्तीला आदर व्यक्त करून त्यांना पहिले प्राधान्य दिले जाते.
हि जागृत अवस्था यायला ३ वर्षे जातात. ३ वर्षे म्हणजे नुसते करायचे म्हणून नाही तर मनापासून आणि आवडीने केले तरच अशी जागृत अवस्था विकसित करता येते.
म्हणून ध्यान स्वतः करा किंवा कुठच्याहि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करा जर मनापासून केले आणि एक दीर्घ कालावधी दिला तरच त्याचा फायदा होतो नाहीतर नाही.
सातत्य, चिकाटी, स्वयंशिस्त आणि दृढ इच्छाशक्ती ह्याला पर्याय नाही.
इथे किमंत चुकवावी लागते पण मिळते ते सर्व अमर्याद असते.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment