कुंडलिनी सप्त चक्र आणि ब्लोकेजेस

कुंडलिनी सप्त चक्र जेव्हा विना अडथळे प्रवाहित होत असते तेव्हा ती व्यक्ती संतुलित आयुष्य जगत असते. म्हणजे त्या व्यक्तीकडे सर्वकाही असते, खाजगी आयुष्यात भरभराट असते, व्यवसायिक आयुष्यात भरभराट असते, सामाजिक आयुष्यात भरभराट असते, कौटुंबिक आयुष्यात भरभराट असते, वैवाहिक आयुष्यात भरभराट असते म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास त्या व्यक्तीच्या सर्वांगीण आयुष्यात भरभराट असते.


कुंडलिनी सप्त चक्र जागृत होतांना खालून वर असे जागृत होतात, उर्जेचे प्रवाह खालून वर असा जातो, मूलाधार चक्र जे दोन पायांच्या मध्ये असते उर्जा तिथून वर जाते व वैश्विक उर्जा शरीरात प्रवेश करतांना वरून शरीरात प्रवेश करते, सहस्त्राकार चक्रामधून जे डोक्याच्या मध्यभागी असते तिथून प्रवेश करत वरून खाली मूलाधार चक्रा पर्यंत सर्व चक्र जागृत करत पूर्ण शरीरभर जाते.


आपला पाठीचा कणा हा उर्जा प्रवाहित करत असतो तर चक्र हे समोर फिरत असतात. बेंबी, नाभी उर्जेचे दुसरे प्रवेशद्वार देखील असते, किंवा तुमच्या उर्जेच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी टाळा असलेल्या दरवाज्यासारखे देखील काम करते. अनेक उपाय व उपचारांमध्ये बेंबी, नाभीचा वापर केला जातो. ह्या जगातील काही ठराविक लोकच अश्या प्रकारची उर्जेची चावी बनवू शकतात, हि विद्या खूप गुप्त ठेवली गेली आहे कारण गैरवापर हा खूप घातक ठरतो. काही शक्तिशाली लोक कुठल्याही चक्राचे त्यांच्या उर्जेची चावी बनवून दार उघडू शकतात मग भले ते सहस्त्राकार चक्र का असेना. शोधणे सोपे नाही त्यामुळे त्याच्या भानगडीत नका पडू. हा विषय इथेच बंद.


संतुलित, योग्य प्रवाहित कुंडलिनी ऊर्जेमुळे मनुष्याल प्रचंड हलके वाटते, कुठलेही नकारात्मक विचार नसतात, आयुष्य जगतांना ते पूर्ण आनंद घेत जगतात. त्यांना जे पाहिजे ते मिळत जाते, ते उर्जा नेहमी शुध्द ठेवतात, त्यांचे विचार सुस्पष्ट असतात व त्यांना जे पाहिजे त्याच्याशी एकनिष्ठ असतात त्यामुळे द्विधा मनस्थितीत पडत नाही व त्यांना जे पाहिजे ते मिळवत त्यांचा आनंद घेत जातात.


जेव्हा कुंडलिनी सप्त चक्रांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा व्यक्ती विविध समस्यांनी ग्रस्त होते. प्रत्येक चक्रांचे कार्य वेगवेगळे असते व त्यानुसार समस्या निर्माण होतात, इथे एखाद दुसरे उदाहरण देतो, जर दोन पायांमध्ये असलेल्या मूलाधार चक्रात समस्या निर्माण झाली तर व्यक्ती जमिनीच्या स्तरावर आयुष्य जगत असते, म्हणजे पैसा मग तो हजार असो किंवा करोडो पण कट टू कट आयुष्य जगत असते, मुलभूत गरजा पूर्ण होत नाही किंवा कश्याबश्या पूर्ण होतात. अपत्य प्राप्तीस समस्या निर्माण होतात, जोडीदार मिळत नाही.


जेव्हा अनाहत चक्रांमध्ये अडथळे निर्माण होतात तेव्हा व्यक्तीच्या प्रेम आणि दया ह्या भावनांमध्ये समस्या निर्माण होतात. इथे त्या व्यक्तीच्या भावनांशी खेळले जाते, फायदा उचलला जातो. अनेकदा अनाहत चक्रामध्ये समस्या असतील तर भावनिक, मानसिक, शारीरक आणि आर्थिक शोषण केले जाते. एक प्रकारे अविश्वास आणि धोका असे आयुष्य जगणे सुरु असते. अश्या व्यक्तींनी वेळीच जागे होणे गरजेचे आहे.


जेव्हा एका चक्रात अडथळे निर्माण होतात ते दुसर्या चक्रांपर्यंत उर्जा नीट पोहचवत नाही किंवा समस्या निर्माण असलेले चक्र फिरण्यासाठी पाहिजे तेवढी उर्जा वापरत नाही व बाकींच्या चक्रात पुरेपूर उर्जेचा वापर होतो. म्हणजे बुद्धी आहे पण पैसा नाही, प्रेम आहे पण विश्वासू जोडीदार नाही अश्या प्रकारचे आयुष्य जगणे सुरु होवून जाते.


आता ह्यावर उपाय आहे व ते सांभाळून करावे लागतात कारण उर्जा शास्त्र प्रचंड शक्तिशाली आहे, तुमच्या कल्पनेपलीकडे शक्तिशाली आहे. समस्येनुसार उपाय आहे तुम्ही कुठूनही उपाय करून घेवू शकता, प्रत्यक्षात हजर राहण्याची गरज नाही कारण हे एक उर्जा शास्त्र आहे. काही समस्या ह्या लवकर ठीक केल्या जातात व काहींना वेळ लागतो. ह्या उपायात सातत्य पाहिजे. उपाय करतांना नियम कडक पाळावे लागतात.


उर्जेने आपण सर्व एकमेकांशी जुळलेलो असतो, तुमच्यात, तुमच्या कुटुंबात, सहवासात येणाऱ्या व्यक्ती, तुमचे घर, कार्यालय आणि कारखाना हे सर्व एका स्तरावर उर्जा होवून जातात. तिथे कुणाचेहि अस्तित्व नसते, सर्व एक होवून जातो. इथे फक्त लोक आणि ह्या श्रुष्टीत जे काही अस्तित्वात आहे त्यांच्या उर्जेनुसार रंगात, औरात फरक दिसून येतो. चांगली उर्जा सफेद रंगाची आणि वाईट उर्जा काळ्या रंगाची, हे तुम्हाला सोपे पडावे म्हणून दोनच रंग सांगितले आहे, ह्यामध्ये सर्व रंग आहेत, अति गडद रंग देखील आहे, प्राण उर्जा, वैश्विक उर्जा, अलौकिक उर्जा, दैवी उर्जा, दानवी उर्जा आणि डार्क एनर्जी हा झाला तपासणीचा भाग.


अनेकांना प्रश्न पडतो कि कुंडलिनी शास्त्र शिकावे कि उपाय उपचार करावे? इथे उत्तर सोपे आहे, शास्त्र शिकण्यासाठी सुरुवात असते ती लहानपणापासून जसे बाकी शिक्षण आहे तसे हे पण एक शिक्षण आहे पूर्ण वेळचे, आता देखील सुरुवात करू शकता पण तितक्याच सिरीयस होवून शिकाल का? शिकणे, त्या नंतर अनुभव घेणे ह्यामध्ये कालावधी जातो. ह्यामुळे मार्ग दोन्ही उघडे ठेवा जसे तुम्हाला जमते तसे पण हे एक पूर्ण वेळचे काम आहे. म्हणून उपाय केलेले उत्तम. 


आजारपणावर ३०० रुपये खर्च करण्यापेक्षा ध्यान, व्यायाम आणि आहारावर ३००० रुपये खर्च केलेले बरे, कारण आजारपणावर खर्च केलेले ३०० रुपये ३ लाख ते ३०० करोड चे नुकसान करू शकते पण आत्मविकास आणि आरोग्यावर खर्च केलेले ३००० रुपये तुमचे ३ लाख ते ३०० करोड फक्त वाचवत नाही तर पूर्णपणे आयुष्य जगवते. इथे श्रीमंत गरीब चा फरक नाही तर तुम्ही महत्व कश्याला देता ते महत्वाचे आहे. माझे तर आयुष्य कसे जगायचे ते स्पष्ट आहे, ध्यान मानसिक विकास, अध्यात्मिक विकास, व्यायाम शारीरिक विकास आणि आत्मविकास, आत्मविकासाचे कोर्सेस, सल्ला व मार्गदर्शन घेत जाने, ज्याचे त्याचे काम त्या क्षेत्रातील विशेषज्ञ लोकांना देत जाने कारण मी स्वतः सर्वकाही शिकू शकत नाही.


जर तुमच्या आयुष्यात अश्या काही समस्या आली असेल जिचे तार्किक उत्तर मिळत नाही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ह्या शास्त्रात मिळतील. अचानक आलेल्या मोठ्या समस्या, दीर्घकालीन समस्या ह्या सर्व ह्या उर्जा शास्त्रामध्ये नाहीश्या होतात, मग ते खाजगी समस्या असो, आर्थिक समस्या असो किंवा कितीही मोठे आजारपण असो म्हणजे सर्वकाही तुम्ही ठीक करू शकता.


धन्यवाद

अश्विनीकुमार


रेकी, हिलिंग अध्यात्मिक हिलिंग, अलौकिक हिलिंग, डार्क एनर्जी

 

Comments