आकर्षणाचा सिद्धांत "तुम्हाला जे पाहिजे ते मिळवण्याच्या पाठी लागाल तर तुम्हाला मिळेल" असे काम करत नाही तर आकर्षणाचा सिद्धांत "तुम्हाला ते आकर्षित करून देतो". म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळत जाते.
आकर्षणाचा सिद्धांत समाजाने बनवलेले नियम मान्य करत नाही तर जो त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी मनापासून ब्रम्हांडाला मागतो त्यालाच ते मिळते.
साधे उदाहरण घ्या, काही दिवसांपासून मी काही लोकांच्या समस्या ऐकत होतो त्यामध्ये त्यांच्या कडे जे होते ते त्यांचेच होते पण ते त्यांच्याकडून ज्यांचा हक्क नाही त्यांच्याकडे गेले.
काही व्यक्तींकडे पैसा होता तो ज्याच्या हक्काचा नाही त्याच्याकडे गेला आणि ती सर्वांची रक्कम हि २५ करोड ची आहे. त्यांचे घर, जमीन सुद्धा गेले मग पेपरवर त्यांच्या नावावर का असेना.
काहींचे जोडीदार त्यांना सोडून दुसऱ्याकडे गेले भले ते समाज आणि कायद्यानुसार पती पत्नी का असेना. ते कुटुंबासाठी करत आहे आणि कुटुंब दुसऱ्याच व्यक्तीला सर्वकाही देत आहे. म्हणजे एका घरात त्या दुसऱ्या व्यक्तीला महत्व आहे त्यांना नाही.
नोकरीमध्ये बढती ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही तर जे लायक नाही ते अगदी आरामात घेवून चालले आहे. अगदी हे सर्व समोर घडलेले बघत आहे. म्हणजे ज्यांनी कंपनीसाठी सर्वकाही केले त्यांना अक्षरक्ष काढून टाकण्यात आले.
तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही आरामात बसता ह्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्यासोबत तुमची कंपने सक्षम आहेत कि नाही हे बघणे गरजेचे आहे. जो तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे तो तुमच्याकडून घेवूनच जाणार. हेच वास्तव आहे.
ह्यासाठी तुम्हाला स्वतःची कंपने सक्षम करायची आहे, ब्रम्हांडासोबत कंपने जुळवून आणायची आहे, कुठलीही शंका घ्यायची नाही मग तुम्हाला जे पाहिजे ते ब्रम्हांड देणारच.
सर्वात कमजोर आणि नकारात्मक लोक तीच जी स्वतःकडचे वाईट लोकांना देतात व त्यांना माफ करून त्यांना शक्तीशाली करून सोडतात, मग तीच वाईट लोक पुढे जावून अजून ४ चांगल्या लोकांकडून सर्वकाही काढून घेतात. अश्या चांगल्या लोकांना तुमच्या आयुष्यात ठेवू नका.
आयुष्य जगण्याचा नियम सोपा आहे जिथे तुम्ही कमजोर आहात तिथे गुरूंची मदत घ्या, सर्वच काही परिपूर्ण नसतात, तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी इतरांची मदत लागते आणि जर तीच लोक नसतील तर तुम्ही फक्त आणि फक्त गुरूंच्या सहवासात रहा कारण एकही चुकीची सांगत तुमच्याकडे आहे ते सर्व तुमच्याकडून काढून घेईल.
ब्रह्मांडाला हे नाही माहिती कि समोरील व्यक्ती चांगली आहे कि वाईट, ब्रम्हांडाला जर चांगल्या किंवा वाईट व्यक्तीने पैसे मागितले आणि ज्यांची कंपने सक्षम असतील त्यांना ब्रम्हांड देईल. आणि जिथे कंपने कमजोर असतील तिथून आपोआप सर्वकाही चालले जात ज्याची कंपने सक्षम आहे त्याच्याकडे जाईल. मग भले तो चांगला व्यक्ती असो किंवा वाईट.
आज आता ह्या क्षणापासून तुम्हाला जे पाहिजे त्यावर हक्क गाजवा, आणी मिळवाच नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. इथे प्रत्येक जन आप आपले बघत आहे, आपल्या कुटुंबाचा विचार करत आहे मग तुम्ही देखील करा तेव्हाच तुम्ही सुरक्षित राहाल. कटू आहे पण सत्य आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment