सकाळी उठल्या उठल्या वातवरण ताजे असते, प्रचंड सकारात्मकता ह्या वातावरणात असते. प्रचंड अध्यात्मिक उर्जा असते, प्रचंड अलौकिक उर्जा असते. जेव्हा तुम्ही सकाळी उठल्या उठल्या ध्यान करता, व्यायाम करता, दिवसभराची योजना आखता किंवा गुरूंचे मार्गदर्शन घेता तेव्हा त्याचा प्रचंड फायदा होतो.
अध्यात्मात अगोदर पासून लिहिले होते आणि विज्ञानाने सिध्द करून दाखवले.
इथे मी कुणाला पुरावा देत नाही आणि कुणाला प्रोस्ताहित करत आहे. प्रत्येक जन आपआपल्या आयुष्यात जबाबदार आहे. ह्याला कॉमन सेंस म्हणजे अतिशय साधी गोष्ट असे बोलू आणि जर तुमच्या वर्तमान वयात तुम्हाला कॉमन सेंस म्हणजे अतिशय साधी गोष्ट शिकवावी लागत असेल तर समस्या फार मोठी आहे.
समृध्द लोक का सर्वांगीण समृध्द आयुष्य जगत असतात?
समृध्द लोक का समृद्ध लेव्हल वरच आयुष्य जगत असतात?
समृध्द लोक समृद्धी कशी काय टिकवून ठेवतात?
कारण समृद्ध लोक सकाळच्या वेळेचा भरपूर फायदा घेतात. समृध्द लोकांची सकाळ सकारात्मक जाते. समृध्द लोकांनी सकाळ चा सकारात्मक वापर करण्याची सवय लावून घेतली आहे व ती टिकवून ठेवली आहे.
सामान्यतः सकाळ म्हणजे साडे पाच ते साडेसात हि एक वेळ. प्रहार म्हणजे साडे तीन ते साडेपाच हि वेळ. आणि अजून एक वेळ म्हणजे साडेसात ते अकरा वाजता. मी इथे जी सकाळ बोलत आहे ती साडे पाच ते साडे सात मधील. एडव्हांस साधक ह्यांची वेळ त्यांच्या त्यांच्या साधने प्रमाणे साडे तीन ते साडे पाच मधली असते. एडव्हांस नुसते उठून नाही तर शास्त्र शुध्द पद्धतीने जीवनशैली असलेले बोलत आहे.
सकाळी तुम्ही आत्मविकास करा, ह्याचा प्रचंड फायदा होतो कारण तुम्ही दिवसाची सुरुवात हि सकारात्मक करत आहात व पूर्ण दिवस तुमचा चांगला जातो. असेच एक एक दिवस करत महिने निघून जातात, वर्ष निघून जाते व बघता बघता तुम्ही तुमच्या स्वप्नांचे आयुष्य जगत जाता.
इथे प्रत्येकाची सुरुवात हि वेगवेगळी असू शकते. एखादी व्यक्ती संकटे आणि समस्यांच्या खोल दरीत असू शकते तर एखादी व्यक्ती भाग्य आणि चमत्काराच्या ब्रम्हांडात वावरत असू शकते. तुमच्या आयुष्यात समस्या आहेत ह्याचा अर्थ असा नाही कि सर्वांच्या आयुष्यात समस्या आहेत म्हणून, काहींच्या आयुष्यात काहीच समस्या नाही त्यामुळे त्यांना झेप घेणे सोपे जाते.
काहींची सुरुवात हि - १०० पासून होते व त्यांना ० पर्यंत यायचे असते तर काहींची सुरुवात हि ० पासून होते तर त्यांना + १०० पर्यंत जायचे असते. - १०० मध्ये असलेल्यांना २ वर्षे लागत असतील तर ० मध्ये असलेल्याला १ वर्ष लागेल पण सातत्य जर ठेवले तर दोघेही एक वर्षाचे अंतर ठेवून पाठी पुढे आज नाही तर उद्या + १०० पर्यंत पोहचणारच.
काही रॉकेट सायंस नाही आहे, सकरात्मक रहा, ध्यान करा, कृती करा आणि स्वतःची मर्यादा ओळखून जिथे गरज वाटत असेल तिथे तज्ञांची मदत घ्या. तुम्हाला ध्यानाचे व्हिडीओ पाहिजेत तर आपल्या युट्यूब चेनल ला भेट द्या. इथे पैसा आहे काय आणि नाही काय ह्याने काही फरक पडत नाही, ज्याला बदलायचे आहे तो फुकट मध्ये देखील बदलेल आणि ज्याला बदलायचे नाहीच तो अब्जो रुपये देवून सुद्धा बदलू शकत नाही. बदलाव हि मानसिकता आहे.
मला आशा आहे कि हा लेख तुमच्या आयुष्यात बदल घडवेल. आपण भले आणि आपले घर भले, आज आता ह्या पासून तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी जगायला सुरुवात करा आणी हे संस्कार स्वरुपात तुमच्या मुलांना द्या.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment