आकर्षणाचा सिद्धांत कुणाच्या आयुष्यात योग्य काम करतो?
जिथे निरोगी लोक निरोगी लोकांना आकर्षित करतात.
जिथे श्रीमंत लोक श्रीमंत लोकांना आकर्षित करतात.
जिथे समृध्द लोक समृध्द लोकांना आकर्षित करतात.
जिथे मुक्त मनाची लोक मुक्त मनाच्या लोकांना आकर्षित करतात.
जिथे नैसर्गिक आयुष्य जगणारी लोक नैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या लोकांना आकर्षित करतात.
जिथे मुलभूत गरजा पूर्ण असलेली लोक मुलभूत गरजा पूर्ण असलेल्या लोकांना आकर्षित करतात.
थोडक्यात सांगायचे झाल्यास जसे तुमचे आयुष्य आहे तसेच जर तुम्ही लोक आकर्षित करत असतील तर आकर्षणाचा सिद्धांत तुमच्या आयुष्यात योग्य काम करत आहे.
एकसारखी कंपने असलेली व्यक्ती एकसारख्या कंपनाना आकर्षित करते त्यामुळे जिथे सकारात्मक आहे तिथे तुमची कंपने जुळवून ठेवा.
आकर्षणाचा सिद्धांत कुणाच्या आयुष्यात योग्य काम करत नाही?
जिथे निरोगी लोक रोगी लोकांना आकर्षित करतात.
जिथे श्रीमंत लोक गरीब लोकांना आकर्षित करतात.
जिथे समृध्द लोक समृद्धी नसलेल्या लोकांना आकर्षित करतात.
जिथे मुक्त मनाची लोक बंद, चौकटीत असलेल्या मनाच्या लोकांना आकर्षित करतात.
जिथे नैसर्गिक आयुष्य जगणारी लोक अनैसर्गिक आयुष्य जगणाऱ्या लोकांना आकर्षित करतात.
जिथे मुलभूत गरजा पूर्ण असलेली लोक मुलभूत गरजा पूर्ण नसलेल्या लोकांना आकर्षित करतात.
थोडक्यात सांगायचे झाल्यास जसे तुमचे आयुष्य आहे तशी लोक आकर्षित करत नसतील तर आकर्षणाचा सिद्धांत तुमच्या आयुष्यात योग्य काम करत नाही.
योग्य लोक आयुष्यात नसतील तर काय करायचे?
योग्य लोक तुमच्या संपर्कात येत नसतील तिथे गुरूंची मदत घ्यायची व गुरुंसोबत कंपने जुळवून ठेवायची पण काहीही झाले तरी नकारात्मक लोकांना उभे करायचे नाही मग ते घरचे असो किंवा बाहेरचे.
ब्रम्हांड तुमचे नातेसंबंध बघत नाही तर ब्रम्हांड फक्त कंपने आणि उर्जा बघतो आणि त्यानुसार तुम्हाला आकर्षित करून देतो.
ब्रम्हांडाचे नियम इतके सोपे आहे, इथे हो किंवा नाही असेच चालते, इथे मधला मार्ग नाही. इथे तुम्हाला सकारात्मकता पाहिजे तर सकारात्मकता भेटले आणि नकारात्मकता पाहिजे तर नकारात्मकता भेटेल.
निवड सोपी आहे कि नाही?
निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.
सकारात्मक आयुष्य सकारात्मक लोक किंवा गुरु किंवा नकारात्मक आयुष्य नकारात्मक लोक किंवा गुरु विना.
आयुष्य सोपे आहे, कठीण करू नका.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment