आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जे पाहिजे ते कसे आकर्षित करून देतो?


 तुम्हाला फक्त जे पाहिजे त्या बद्दल स्पष्ट रहायचे आहे. ब्रम्हांडासाठी तुमचे अस्तित्व नाही आहे, ब्रम्हांड फक्त कंपनाना प्रतिसाद देतो, ह्या ब्रम्हांडात साधे आपल्या पृथ्वीचे अस्तित्व नाही आहे तर मग आपले काय असेल?


समजून घ्या कि तुमच्यासाठी तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला खूप जास्त वाटत असेल पण ब्रम्हांडासाठी काहीच नाही, आणि ब्रम्हांड असेच वाटल्यासारखे, किंवा गळती असते ना त्या प्रकारे देवून टाकतो.


आता बघा माझा शिष्य जो अतिशय आर्थीक अडचणीत अडकला होता व त्याने पैश्याला इतके महत्व दिले कि पैसा येण्याच्या जागी पैसे येण्याचे सर्वच मार्ग बंद झाले, विचार इतके घट्ट पकडले कि पैसा हा हातात येवून सुटू लागला. हे सर्व का होत होते?


ब्रम्हांडाला हे नाही माहिती कि नक्की तुम्हाला काय व कश्याला पाहिजे. तुमच्यातून जे निघेल ते सर्व खरे होत तुम्हाला मिळेल, म्हणून काहीतरी कारण आहे कि मी तुम्हाला रीलेक्स रहा असे का म्हणत असतो?


ठीक आहे ना जर तुमच्याने होत नसेल, जर तुम्ही कुठेतरी कमी पडत असाल तिथे तज्ञांची मदत घ्या, गुरूंची मदत घ्या. का ज्यांच्याकडे गुरु आहेत ती सर्व लोक सुरक्षित आहेत? तुमचा एक विचार मग तो सकारात्मक असो किंवा नकारात्मक तो खरा होतोच म्हणून आपल्याला योग्य गुरूची, तज्ञाची गरज लागते.


कुठचीही गोष्ट इतक्या घट्ट पकडली तर त्रास होणारच ना? आणि किती वेळ पकडायची? साधे एक किलोचे वजन देखील घट्ट पकडल्यामुळे, जास्त वेळ पकडल्यामुळे १००० किलोचे वाटते, त्याचे नुकसान तर होतेच, तुमची मानसिकता आणि सर्वकाही बिघडून जातेच.


ह्यामध्ये तुमच्यातून कंपने तर निर्माण होतात पण तुमच्यासाठीच खर्च होतात व ती ब्रम्हांडापर्यंत पोहचतच नाही. आणि नंतर तुम्ही बोलाल कि आकर्षणाचा सिद्धांत काम करत नाही, हे सर्व थोतांड आहे मग काय ब्रम्हांड तथास्तु बोलेलच. मिळाला तुम्हाला आशीर्वाद, आता काहीही मिळणार नाही.


काहीही करून ब्रम्हांडापर्यंत तुमची कंपने हि पोहचली पाहिजे त्यासाठी सर्वकाही करायचे आहे. रीलेक्स होणे गरजेचे आहे, नकारात्मक विचारांवर ताबा मिळवणे गरजेचे आहे, सकारात्मक विचारांना शक्ती देणे गरजेचे आहे, दीर्घकालीन फायद्याचा विचार करणे गरजेचे आहे, आजू बाजूचे वातावरण सकरात्मक ठेवणे गरजेचे आहे मग ह्यामध्ये व्यक्ती देखील आले, घरचे असो किंवा बाहेरचे.


तुम्हाला जे पाहिजे त्या बद्दल अगदी सुस्पष्ट रहा, ध्यान करा, व्यायाम करा, सकस आहार घ्या, वेळेचे नियोजन करा, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा, गुरूंच्या चरणी जा अगदी इतके सोपे आहे.


माझ्या ज्या शिष्यांना सर्वकाही मिळाले त्यांचे सर्व लक्ष हे त्यांना जे जे पाहिजे त्यावर लागून होते व बाकी साठी ते तज्ञ आणी गुरूंची मदत घेत होते त्यामुळे त्यांना आरामात पाहिजे ते अमर्याद मिळत गेले.


तुम्हाला काय पाहिजे? जे अंतर्मनात आहे तेच बाहेर आहे, जे पाहिजे ते बिनधास्त मागायला शिका, तेव्हाच तुम्हाला मिळेल, जर अतिविचार करत, लाजत "हे कसे मागू" असे करत गेलात तर काहीच मिळणार नाही.


तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या अंतर्मन ते ब्रम्हांड ह्यामधील रस्त्यात अडथळे नसतील तर ते तुम्हाला पुढील क्षणी मिळूनच जाईल. जर अडथळे असतील तर नाही मिळणार. ब्रम्हांडाला कंपने स्पष्ट लागतात. तुम्ही ब्रम्हांडाला, गुरूंना, तज्ञांना तुमच्या मनातील स्पष्ट सांगू शकतात, इथे जज केले जात नाही. तुम्ही जितके स्पष्ट रहाल तितके चांगले.


प्रयत्न करून बघा, तुम्हाला हलके वाटेल व ह्याच क्षणापासून आकर्षणाचा सिद्धांत काम करतांना जाणवेल, आपले खाजगी आयुष्य हे जगापासून अलिप्त ठेवा कारण जाळणारी लोक खूप आहेत आणि दोन तोंडाची लोक पण, एकदा का तुम्हाला जे पाहिजे ते इतरांना कळाले कि नजर लागली म्हणून समजा, म्हणून जे करायचे ते गुप्त पने करा. लोकांना फक्त रिझल्ट दिसू द्या.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Comments