व्यवसायिक समुपदेशन आणि रिझल्ट

व्यवसायिक :-  सर व्यवसाय तोट्यात चालला आहे


मी - कारण काय?


व्यवसायिक :-  नाही माहित पण ४ वर्षे झाली सतत तोट्यात चालला आहे. राहते घर विकावे लागले, आता आम्ही भाड्याच्या घरात राहतो. मार्केट मध्ये ३ करोड अडकले आणि ओळखीच्याकडे ८० लाखाच्या आसपास अडकले. कुठूनही पैसा येत नाही.


मी : म्हणजे तुमच्याकडे पैसे होते, जात देखील होते आणि तुम्ही जावू देखील देत होते. ह्या अगोदर तुम्ही तज्ञ लोकांच्या सहवासात होता का? कोणी तुमचा गुरु होता का?


व्यवसायिक :-  नाही सर. मी आस्तिक आहे पण गुरु नाही आणि कधीही तज्ञांचा सल्ला घेतला नाही, फक्त तुम्हाला फोलोव करत आहे.


मी - मला इतक्या वर्षांपासून फोलोव करत आहे मग मी जे क्वोट टाकायचो जे लेख लिहायचो त्याचा तुम्ही तुमच्या आयुष्यात वापर केला का?


व्यवसायिक :-  नाही सर, वाचून प्रोस्ताहित व्हायचो, त्यावर अजून टिकून आहे.


मी - म्हणजे तुमच्याकडे वेळ होता कि योग्य निर्णय घ्यायचा व त्याच वेळेस तुमचे नुकसान थांबले असते. प्रत्येक व्यक्तीचा मानसिकतेचा, भावनेचा प्रवाह असतो तो सतत वाहता असतो आणि तो कोणीही अडवू शकत नाही. सोबत तुमचा चांगला स्वभाव, भावनिक दृष्ट्या हळवे, माणुसकी धर्म जपणारे त्यामुळे धूर्त लोकांना तुमचा फायदा उचलता आला आणि तुम्ही इथपर्यंत पोहचले.


जर तुम्ही तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राहिला असता, अकौंटंट कामाला ठेवला असता तेव्हा त्याचा पगार भले काहीही का असेना त्याने तुमची गळती थांबवली असती. ठीक आहे पूर्ण वेळ कामाला नका ठेवू पण मध्ये तज्ञांची मदत घेतली असती तरी गळती थांबली असती.


जर तुम्ही गुरूंच्या संपर्कात असला असता तर तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटले असते. कधीही देव खाली येत नाही देव येतो व्यक्तीच्या स्वरुपात.


जवळील मानसोपचार तज्ञांची मदत घेतली असती तर त्यांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले असते, तुमची मानसिक, भावनिक अवस्था कशी आहे, इतर लोक कसे आहेत आणि तुम्ही कसे वागले पाहिजे ह्यावर योग्य मार्गदर्शन केले असते.


हे तुम्हाला ह्यासाठी सांगत आहे कारण व्यक्ती सर्वकाही एकटी करू शकत नाही, तिला मदतीची गरज लागत असते. तुम्ही जिथे कमी पडला तिथे तज्ञांची मदत घेणे, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहणे गरजेचे आहे जेणेकरून तुम्ही तुमचे आयुष्य पूर्ण एकाग्रतेने जगू शकता.


तुम्हाला समजले मी काय बोलत आहे ते?


व्यवसायिक :-  हो सर. मी योग्य वेळेस योग्य निर्णय घेत जाईल. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राहील.


मी : आयुष्य असेच शिकवते, ह्याला धाडस बोलत नाही, आणि सर्वांनाच परत संधी भेटत नाही, काहींची संधी हि शेवटची असते तर काहींकडे अमर्याद संधी उपलब्ध असतात. म्हणून प्रत्येक संधीला सुवर्ण संधी असे म्हणतात व कधीही सोडायची नाही असे म्हणतात. काही अगोदर पासून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली राहतात, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहतात किंवा अश्या वेळेस येतात जेव्हा जास्त नुकसान झाले नसते तेव्हा त्यांना बाहेर निघणे सोपे जाते. प्रत्येक व्यक्ती वेग वेगळी असते. तुमच्या केस मध्ये बघा तुम्ही कुठे आहात?


व्यवसायिक :-  हो सर, मी ह्या मधून बाहेर पडू शकतो कि नाही?


मी - तुम्हाला हा प्रश्न ह्यासाठी नाही विचारला कि तुमचा प्रती प्रश्न हा वेगळा असेल म्हणून, तुम्हाला प्रश्न ह्यासाठी केला कारण तुम्हाला हे सर्व मान्य आहे कि नाही. जेव्हा व्यक्ती तिच्या चुका मनापासून मान्य करते तेव्हा ती पुढे जावू शकते व चुकांचा तिच्यावर परिणाम होत नाही, नाहीतर सतत ह्या चुका आठवून तुम्ही स्वतःला दोष देत बसाल व गिल्ट फिलिंग जी सर्वात खालची फिलिंग असते त्यामध्ये अडकाल.


त्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करायचा आहे. आपल्या क्षमता आणि मर्यादा बघून आयुष्य हुशारीने जगायचे आहे. तुम्ही चुकलात ह्याचा अर्थ असा नाही कि परत चुका करायच्या नाही म्हणून, तुम्ह्याकडून परत चुका होतील पण त्या का नवीन असतील व जुन्या चुका असल्या तरी तुम्ही लगेच तज्ञांची, गुरूंची मदत घेवून समस्या तिथेच निवळाल.


जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिकतेचा, भावनेचा पाया बदलाल तेव्हा तुमचा पाया भक्कम होईल व बदल कायमस्वरूपी असेल. आपला मेंदू हा एक अवयव आहे, तुम्ही जसे घडवाल तसे तो घडेल, आपल्याला हळू हळू जुनी मेंदूची रचना बदलून नवीन सकारात्मक रचना निर्माण करायची आहे. सुरुवातीला जास्तीत जास्त ३ महिन्याचा पहिला टप्पा ठेवू, त्यामध्ये सेशन, मेंटल टेक्निक्स ज्या वैज्ञानिक आणि अध्यात्मिक देखील असतील त्यांचा वापर करणार आहोत.


तुमचे वय आहे ३५. इतक्या वर्षांचा बदल आपल्याला परत बदलायचा आहे त्यामुळे थोडा कालावधी तर जातोच. ह्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता तयार करायची आहे. समजले?


व्यवसायिक :-  हो सर, मी तयार आहे.


६ महिन्यानंतर, मध्ये अनेक सेशन झाले. सातत्य होते.


व्यवसायिक :-  नमस्कार सर. आज माझे आयुष्य पूर्ण बदलले आहे. मी मार्गस्थ झालो आहे, तुम्ही जे जे सांगितले, ज्या ज्या तज्ञ लोकांचा सल्ला घेतला त्याचा प्रचंड फायदा झाला. सर मी जितके व्यवसायात, खाजगी आयुष्यात नुकसान नाही केला त्यापेक्षा कमी पैश्यात म्हणजे अर्धा ते एक टक्क्यात मी आज सुखी समाधानी आणि नफ्याचे आयुष्य जगत आहे. 


तुम्ही जी माझ्या मिसेस ला हिलिंग दिली त्याचा तिच्या आयुष्यात प्रचंड प्रभाव पडला, तुम्ही मला मोठ्या समस्येमधून बाहेर काढले व मिसेस ला मोठ्या आजारपनापासून वाचवले, आज माझी मुले आमची बघून ध्यान करत आहे, गरजेनुसार आम्ही बाल मानसोपचारतज्ज्ञ ह्यांची मदत घेत आहे. प्रचंड फायदा होत आहे.


आज आम्ही फक्त, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आहार ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलले आहे. प्रचंड सकारात्मकता घरात, ऑफिस मध्ये निर्माण झाली आहे. अक्कलकोट ला जावून स्वामींचे दर्शन घेतले आहे. मिसेस पुढील महिन्यात विपश्यनेला जाणार आहे. घरात ध्यान करण्याच्या जागी एक बुद्धांची मूर्ती ठेवली आहे. प्रचंड मन शांती जाणवते. असे वाटत आहे कि मध्यम मार्गाने आम्ही आयुष्य जगत आहोत.


सर आपले आभार मानावे तितके कमी आहे. आता हा मार्ग आमच्या कुटुंबाने जीवनशैली केला आहे. सर १२ वर्षे सातत्य ठेवून मी माझे आयुष्य सिध्द करणार आहे, आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आयुष्य सिध्द करणार आहे.


"आयुष्य बदलण्यासाठी कमीत कमी ३ ते जास्तीत जास्त २ वर्षे पुरेसी आहे, सातत्य पाहिजे, जितकी जुनी समस्या तितका जास्त कालावधी, जितकी तीव्र समस्या तितका जास्त कालावधी. पण त्यानंतर तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तुमचा असतो. पण हा प्रवास देखील खरच खुप सुखदायक असतो, इथे त्रास होतो पण तो सकारात्मक आयुष्यासाठी सहन केलेला त्रास असतो." अश्विनीकुमार


धन्यवाद

अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

 

Comments