व्यवसायिक : सर काही वर्षांपासून मला व्यवसायात प्रचंड मेहनत करावी लागत आहे. ह्या अगोदर जेव्हा सुरु केले तेव्हा अगदी आरामात सर्वकाही होत होते, कसलीही कमी नव्हती.
मी : आता टर्नओव्हर किती आहे?
व्यवसायिक : १ करोड
मी : ह्या अगोदर किती होता?
व्यवसायिक : २ करोड
मी : ठीक आहे. काही तपासणी करावी लागेल, त्यानंतर समस्येचे मुळ समजून येईल.
तपासणी सेशन
पहिल्या तपासणीत असे दिसून आले कि जिथे ५, १० लाखांचे व्यवहार होत होते तिथे देखील १०० % कंपने वापरण्यात येत गेली.
दुसऱ्या तपासणीत असे आढळून आले कि योग्य कंपने वापरल्या न गेल्यामुळे कंपने कमजोर होत गेली.
तिसऱ्या तपासणीत असे आढळून आले कि उच्च दर्जाची कंपने हि खालच्या दर्ज्याची झाली व त्यांची दिशा देखील खाली जाणारी झाली.
दुसरे सेशन
मी : तुम्ही कंपने अगोदरच कमजोर झाली आहेत त्यामुळे त्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये आणून ठेवणे गरजेचे आहे. जर कंपने वाढवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे. धोकादायक आहे. जर आता सुद्धा एक ते दीड करोड चे टर्नओव्हर सातत्य ठेवले व त्यामध्ये ५ ते २५ % वाढ ठेवली तर तुमच्यातील निर्माण होणार्या कंपनामुळे तुम्हाला धोका निर्माण होणार नाही.
कंपने जर योग्य वापरली नाहीत तर तुमच्या आयुष्याच्या इतर भागांवर परिणाम होतो. शरीरावर देखील होतो कारण इतके तर पक्के होते कि काही दिवसातच मोठा आजार बळकावण्याची शक्यता आहे. कंपनाच्या स्तरावर आयुष्य जगतो त्याचा वेग प्रचंड असतो आणि झालेले चांगले वाईट परिणाम डायरेक्ट दिसून येतात, तेव्हा कोणीच काही करू शकत नाही.
जर ५० लाख ते १ करोड चे टर्नओव्हर ठेवले तर अजून उत्तम कारण त्या वेळेस तुमची उरलेली कंपने हि तुमच्यासाठी वापरण्यात येतील. तुम्हाला हे वास्तव सांगत आहे कारण माझ्याकडे ५०० करोड वाला पण त्याचे आजारी शरीर घेवून आला होता, त्यामुळे इथे तुमचा पैसा कामी येत नाही. ५० लाख ते दीड करोड मधील तुमचे आयुष्य देखील काही वाईट नाही. आयुष्य खूप वाईट पद्धतीने शिकवते, त्याचा चुकून अनुभव घेवू नका.
इतके मी खात्रीने सांगू शकतो ती तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगाल, मानसिक आरोग्य चांगले राहील, शारीरिक आरोग्य चांगले राहील, कौटुंबिक सुख मिळेल, व्यवसायात भरभराट होईल, मुलांसोबत वेळ घालवाल, तुमचा छंद जोपासू शकाल, योग्य लोकांच्या सहवासात राहू शकाल.
तुम्ही आता ज्या लैंगिक समस्येमधून जात आहात त्याला Erectile dysfunction (ED) असे म्हणतात. हि समस्या पण तुम्ही तुमची व्यवसायिक समस्या आहे तशी ठेवल्यामुळे झाले. Erectile dysfunction (ED) हि समस्या सुद्धा हळू हळू बरी होऊ जाईल.
अश्या समस्येमध्ये जर तुम्ही जवळील मानसोपचार तज्ञांची मदत घेतली असती व सोबत तुमच्या व्यवसाय संदर्भात तज्ञांची मदत घेतली असती तर समस्या इतकी वाढली नसती. हे नेहमी लक्षात ठेवा. सुखी आयुष्य जगायचे असेल तर मानसोपचार तज्ञ, व्यवसायातील विशेष तज्ञ आणि आमच्या सारख्या गुरूंच्या सहवासात राहत जा.
व्यवसायिक : धन्यवाद सर, आता माझा दृष्टीकोन स्पष्ट झाला, मी माझ्याकडे आहे त्याचे आभार मानत आहे व आता तुम्ही सांगितले तसेच आयुष्य जगेन. आता खूप हलके वाटत आहे. मला वाटत होते कि आयुष्यात पाठी जाने म्हणजे अपयश आहे पण तुम्ही योग्य पद्धतीने समजवले, मार्गदर्शन केले, उपाय केले त्यामुळे प्रचंड हलके वाटत आहे.
दीड महिने फोलोअप होता. आणि तीन महिन्या नंतर
व्यवसायिक : सर तुम्ही बरोबर बोलले, मला मानसिक आजाराची सुरुवात झाली होती ती तपासणी मधून समजली त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपचार करता आले. माझ्या सर्व समस्या दूर झाल्या, व्यवसायाचा टर्नओव्हर कडे लक्ष न देता मी माझ्या सर्वांगीण आयुष्याकडे लक्ष देत होतो त्यामुळे व्यवसायात देखील स्थिरता आली. आता व्यवसाय उत्तम चालत आहे व येणाऱ्या समस्या मी हाताळत आहे. व्यवसायात तणाव येतो पण आता त्याचा परिणाम माझ्यावर मी होऊ देत नाही, माझी मानसिकता देखील सक्षम झाली आहे. मी मझी तपासणी हि वेळो वेळी ठेवत जाईल आणि जिथे मला गरज वाटेल तिथे तुमचे मार्गदर्शन लगेच घेत जाईल पण समस्या इतकी वर्षे ठेवणार नाही.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, रेकी, हिलिंग, वास्तू उर्जा शास्त्र, कुंडलिनी, अध्यात्म, अलौकिक
कोर्स, सल्ला, मार्गदर्शन, उपाय, उपचार, समुपदेशन

Comments
Post a Comment