collective consciousness, सामूहिक चेतना, सामूहिक अंतर्मन, सामूहिक सुप्त मन

अंतर्मनाच्या सिद्धांतात एक सामुहिक मन असते आणि त्याच्या शिवाय दोन मन, अंतरमन एकत्र येवू शकत नाही. ह्या सामुहिक मनाला मी अनंत अंतर्मन बोलतो जिथे भूत भविष्य आणि वर्तमान अस्तित्वात असतात. जर तुमचे भूत, भविष्य आणि वर्तमान एक सूर्य माला solar system आहे तर त्या अनंत ब्रम्हांडात तुमच्या सारखे अनेकांचे अंतर्मनाच्या सूर्य माला solar system आहेत.


आता समजा माझे अंतर्मन एक आकाश गंगा असेल तर माझ्या अनेक शिष्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि अनुयायांच्या अंतर्मनाच्या सूर्य माला, वायू gas आणि धूळ dust माझ्यात सामावलेले आहेत.


हे कधी शक्य होते जेव्हा एकरूपता असते, एकसुरता असते तेव्हा. आणि जेव्हा हि एकरूपता, एकसुरता असते तेव्हा जास्त प्रमाणात उर्जा उत्पन्न होते व संपूर्ण समूहात पसरते. उदाहरणार्थ माझी व माझ्या शिष्यांची उर्जा एकरूप, होते, एकसुर होते तेव्हा उर्जा प्रचंड वाढते व हि वाढलेली उर्जा माझ्या समूहात म्हणजेच आकाशगंगेत असलेले सर्व शिष्य, विद्यार्थी, अनुयायी ह्यापर्यंत पोहचते.


सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तुम्हाला जसे आयुष्य जगायचे आहे तश्या समूहात राहण्याचा प्रयत्न करा, जिथे संपर्क कमी पडत असेल तिथे मध्ये मध्ये गुरूंची मदत घ्या आणि एकदमच संपर्क नसेल जमत तर गुरूंच्या सानिध्यात रहा पण चुकुनही तडजोड करू नका कारण संपूर्ण आयुष्य तुमचे कोलमडून जाईल, अनेकांच्या अनुभवावरून सांगत आहे. आज ना उद्या तुम्ही योग्य सहवासात येणारच.


माझ्या सारख्या अनेक अश्या आकाश गंगा आहेत. तुम्हाला जी सुटेबल वाटेल तिथे जा. प्रत्येकाचे नियम असतात ते फोलोव करत जा. अतिशय सोपे आहे. जिथे तुम्ही तुम्हाला काय पाहिजे त्या बाबतीत स्पष्ट असतात तितके तुम्ही हलके होत जाता व ध्येय सुस्पष्ट दिसून येते आणि कुठे कनेक्ट व्हायचे हे देखील समजते.


एखाद्या व्यक्तीत उर्जा असणे वेगळे व जर तो योग्य समूहात असेल तर वाढलेली उर्जा असणे वेगळे. आपली उर्जा हि वाढती असली पाहिजे, आले अंतर्मन हे अद्भुत शक्तीने वाढते असले पाहिजे आणि हे तेव्हाच साध्य होते जेव्हा तुम्ही योग्य समूहात असता.


अनुभवला पर्याय नाही, वास्तवात तुम्हाला वाढलेली उर्जा जाणवते व तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतात, आता ह्य क्षणी तुम्हाला ते जाणवते. असे नाही कि भविष्यात होणार आहे, आज आता ह्या क्षणाचे मी बोलत आहे. जर तुमच्या आयुष्यात चमत्कार होत नसतील तर तुम्हाला योग्य समूहात राहणे खूप गरजेचे आहे.


धन्यवाद

अश्विनीकुमार

 

Comments