आकर्षणाचा सिद्धांत फक्त visualization चालत नाही तर कृती देखील करावी लागते

आकर्षणाचा सिद्धांत हा शब्द आला कि लोक अतिरेक विचार करतात. त्यांना काहीही करायचे नसते व visualization म्हणजे जिवंत स्वप्ने बघतात पण त्या स्वप्नांपर्यंत पोहचण्यासाठी मार्गच नाही बनवत. म्हणजे लोकांना वाटते कि visualization केले तर झाले का.


आता मला सांगा एखाद्या रुग्णाचे ऑपरेशन आहे तर डॉक्टर visualize करत बसणार कि ऑपरेशन करणार? तुम्हाला तरी पटते का? असे असले असते तर कुणीच काम केले नसते, आपण काय नुसते visualization मुळे जन्माला आलो का?


तुम्हाला जे काही पाहिजे त्याबद्दल स्पष्ट रहा, आणि त्याच दिशेने जाणारी कृती करा इतके सोपे आहे. एकदा मागितले तर तुमची कृती तुम्हाला तिथपर्यंत घेवून जाईल. पुण्याहून मुंबईला तुम्ही फक्त visualization ने पोहचणार का?


तुम्हाला नक्की काय पाहिजे?


का पाहिजे?


कारण असो किंवा नसो तुम्हाला पाहिजे ना मग झाले. आकर्षणाचा सिद्धांत हा सिद्धांत आहे आणि ब्रम्हांडाचे काम आहे त्याच्या पर्यंत पोहचणार्या कंपनांना प्रतिसाद द्यायचे. तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच. आपले खाजगी आयुष्य आणि समाजातील आयुष्य वेगळे ठेवा, खाजगी आयुष्य चार चौघात आणू नका, गोपनीयता बाळगा.


तुम्हाला नक्की काय पाहिजे ते ठरवायचे आहे आणि त्या दिशेने कृती करायची आहे. तुम्हाला इथे स्पष्ट राहणे गरजेचे आहे, अगदी जे पाहिजे ते सुस्पष्ट पाहिजे. तुमच्या सर्व इच्छा ब्रम्हांड पूर्ण करेन.


इथे महत्वाचे एक आहे कि कंपने बघून परिस्थिती आणि लोकांना जवळ करा नाहीतर तुमची कंपने बिघडण्याची शक्यता आहे. एक व्यक्ती फक्त करोडपती आहे म्हणून त्याची कंपने चांगली असतील असे नाही आणि गरीब आहे म्हणून कंपने कमजोर असतील असे नाही, जी सक्षम कंपने आहे ती जाणवून येतातच म्हणून काही गरीब लोकांच्या जवळ चांगली कंपने असलेल्या व्यक्तींचा समूह असतो तर काही श्रीमंत लोकांच्या जवळ वाईट कंपने असलेल्या लोकांचा समूह असतो.


कंपने सक्षम करणे अतिशय सोपे आहे. ध्यान करा, व्यायाम करा, सकारात्मक रहा, आहार घरचा ठेवा, प्रेमाची भावना जागृत ठेवा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जिथे कंपने जुळत नाही अश्या लोकांपासून लांब रहा. सकारात्मक कमवायला नकारात्मक गमवावे लागते, ह्याला पर्याय नाही.


धन्यवाद

अश्विनीकुमार

 

Comments