तुम्ही स्वतःसोबत करत असलेला नकारात्मक स्व-संवाद केवळ तणाव निर्माण नाही करत तर त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळणे आणि तुमची ध्येये साध्य करणे कठीण होऊन जाते.
नकारात्मक स्व संवादामुळे तुम्हाला विविध प्रकारची हानी होते. तुम्हाला Depression, Generalized anxiety disorder, Post-traumatic stress disorder (PTSD), Psychosis, Obsessive-compulsive disorder (OCD), Social anxiety disorder असे मानसिक आजार होण्याची शक्यता बळकावते.
प्रोस्ताहनाची कमतरता भासते, स्ट्रेस वाढतो, अपयशी होण्याचे प्रमाण वाढते, मर्यादित संकुचीत विचार करायला लागता, अति परिपूर्ण राहण्याचा प्रयत्न करता, नैराश्याची भावना वाढते, तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होतो, असे विविध परिणाम तुमच्यावर होत असतो.
तुम्हाला माहिती आहे का तुम्ही स्वतःसोबत करत असलेला स्वसंवाद कमी कमी करत पूर्णपणे बरा करणे सोपे आहे ते?
सुरुवात हि मानसोपचार तज्ञांची मदत घेवून करा कारण जर तीव्रता जास्त असेल तिथे गोळ्या दिल्या जातील व तीव्रता कमी केली जाईल. तपासल्यास आपल्याला कळते कि तीव्रता किती आहे ते व त्यावर काम करणे अजून सोपे होवून जाते.
नकारात्मक स्व संवाद बरे करण्याचे विविध मार्ग आहेत, प्रत्येक व्यक्तीनुसार मार्ग आहेत, सोपे मार्ग आहेत.
नकारात्मक स्व संवाद कधी सुरु होतो त्यावर लक्ष ठेवा, तो तुमचा ट्रिगर पोइंट आहे.
तुम्ही जो विचार करता ते सत्य नाही आहे, ते फक्त विचार आहेत. त्या सर्व विचार आणि भावनांना तुम्ही थांबवू शकता.
तुमच्यातील नकारात्मक स्व संवादाला नाव द्या जेणेकरून तुम्हाला ओळखायला व उपाय करायला सोपे जाईल.
जेव्हा तुम्हाला समजेल कि आता तुम्हा नकारात्मक स्व संवाद सुरु होणार आहे तेव्हा तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता, तासांची दिवसाची मर्यादा घालू शकता.
नकारात्मक स संवादाला न्युट्रल करा.
नकारात्मक स संवादाला क्रोस एक्झामिन करा, किती खरे आहे, किती खोटे आहे आणि किती काल्पनिक आहे ते तपासा.
नकारात्मक स्व संवादाला शत्रू समजू नका, त्याला मित्र बनवा.
दृष्टीकोन बदला.
नकारात्मक स्व संवाद मोठ्याने बोला तेव्हा तुम्ही लगेच नकारात्मक स्व संवादाबद्दल जागे व्हाल.
नकारात्मक विचार थांबवा.
नकारात्मक स्व संवादाला सकारात्मक स्व संवादशी बदला.
धन्यवाद
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
मोबाईल क्रमांक फक्त appointment साठी आहे.

Comments
Post a Comment