वेळेचे शास्त्र काळ शास्त्र भाग १
ध्यानाचे ५ स्तर व त्यामधील वेळेचा वेग
आपल्या ध्यानाचे पाच स्तर आहे आणि त्या स्तरामध्ये काळ म्हणजे वेळ वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो.
आयाम म्हणजे डायमेंशन मध्ये देखील काळ आणि वेळ वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो.
आज आपण ध्यानाचे ५ स्तर बद्दल समजून घेणार आहोत
ध्यानाचे स्तर
१) वैचारिक स्तर : विचार
अवयव : मेंदू
इथे वेळ हळू प्रवाहित होत असतो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला पैसे कमवायचे असेल तर काही वर्षांचा कालावधी जातो. इथे पैश्यांच्या जागी तुम्ही तुम्हाला जे टाकायचे आहे ते टाकून वाक्य वाचू शकता.
२) अंतर्मनाचा स्तर : स्वयंचलित विचार, अंतर्मनात रुजलेले सकारात्मक नकारात्मक विचार, आपला तो चेहरा किंवा स्वभाव जो आपण दाखवत नाही, स्वप्न, टेलीपेथी, डी जा व्हू, मेंदूतून निघणाऱ्या वेव्ह, भूत, भविष्य आणि वर्तमान काळ, विविध आयामातील आयुष्य, अंतर्मनात दडलेल्या शक्ती.
अवयव : मेंदू
इथे वेळ अत्यंत संथ गतीने किंवा प्रचंड वेगाने प्रवाहित होत असतो. इथे तुम्ही १ तासात एक आयुष्य देखील जगू शकता, भूत म्हणजे पुनरजन्म, वर्तमान आणि भविष्य तुम्ही जगत असता, जे अंतर्मनात आणाल तसे तुम्ही वास्तवात घडवू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्याची पूर्ण प्रोग्रामिंग करू शकता. संमोहन, वशीकरण शास्त्र ह्या स्तरावर काम करते.
३) भावनांचा स्तर : भावना, मानसिक व शारीरिक मुलभूत गरजा, जे शरीरातून बाहेर येते ते जसे कि भूक वैगैरे सर्व नैसर्गिक गरजा
अवयव : हृद्य
मेंदू पेक्षा शक्तिशाली हृदयाचा स्तर असतो. इतका शक्तिशाली असतो कि एखाद्या सुपर ह्युमन सारखे तुम्ही आयुष्य जगू शकता. अगदी ह्या वास्तवात तुम्ही तसे आयुष्य जगत असता. अंतर्मनात अगोदर तयार होते तर भावनांच्या स्तरात तुम्ही तसे आयुष्य जगायला लागता. म्हणजे पैसा पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला घेवून यायचा आहे, कोणीही अडवणार नाही. तंत्र साधना ह्या स्तरापासून सुरु होतात. हृद्य नुसते धडकत नसते तर शरीरात कंपने निर्माण करत असते, शरीराबाहेर कंपने सोडत असते.
४) कंपनांचा स्तर : हृद्य पेक्षा जास्त शक्तिशाली स्तर
शरीरातील भाग : पेशी
पेशी स्तर पूर्णपणे कंपनावर चालतो. आपल्या ट्रिलीयन पेशी सतत कंपन पावत असतात, प्रचंड शक्तिशाली हा स्तर असतो. तार्किक जग ह्या स्तरासाठी नथिंग असतो. ह्या स्तरामध्ये काम करणारी एक शक्ती म्हणजे टेलीपोर्ट. अस्तित्वहीन स्तर समजा. पाहिजे ते रूप तुम्ही घेवू शकता. पैसा पाहिजे तो घेवून येणारी लोक तुमच्या साठी काम करत असतात.
५) उर्जेचा स्तर:
शरीर हे ह्या विश्वातील संपूर्ण उर्जेसोबत कनेक्ट असते. शरीर उर्जेचा एक भाग असतो.
उच्च स्तराची साधना ह्या उर्जेच्या स्तरावर चालते, काहीच भौतिक स्वरुपात दिसत नाही. सर्वकाही असते, अगदी ह्या क्षणात. बोलतात ना कि ह्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न आहे म्हणून तो हा स्तर जिथे सरळ तुमचे कनेक्शन हे मुख्य शक्तीच्या स्त्रोत सोबत जुळलेले असते. इथे काळ वेळ काहीही अस्तित्वात नाही.
म्हणून काही लोकांच्या आयुष्यात एका क्षणात चमत्कार घडतात तर काहींना १०, २०, ३० वर्षे लागतात. तुम्ही ध्यानाद्वारे आरामात पाच स्तर गाठू शकता. जसे स्तर वाढतील तस तसे तुम्ही शक्तिशाली होत जाल. अति प्रचंड शक्तिशाली देखील होत जाल. तुम्ही जे पाहिजे ते तुम्हाला अमर्याद भेटत जाईल, आयुष्यभर काहीही कसलीही कमी नसणार.
वर दिलेल्या लेखामधील अद्भुत शक्ती तुमच्यात दडलेल्या आहेत किंवा तुम्हाला त्या जागृत करायच्या आहेत. वेळ जातो, एका दिवसाचे काम नाही तर जीवनशैली असावी लागते जसे अध्यात्मिक गुरूंची असते तशी. माझ्याकडे अनेक वर्षे साधनेसाठी येणारे शिष्य आहेत व ते आज चमत्कार करायला लागतात, नुसते ३ महिने जरी सातत्य ठेवले तरी तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाते.
जर ध्यान करायचे असेल तर निस्वार्थपणे करा ज्याचा तुम्हाला फायदा होईल. जर काही मनात ठेवून केले तर त्याचा फायदा होणार नाही. निस्वार्थ ध्यान तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवते, तुमच्यातील अद्भुत शक्ती जागृत करते, तुम्ही भाग्यशाली बनता मग तुमच्या आयुष्यातील समस्या ह्या आपोआप सोल्व्ह व्हायला लागतात.
ह्या सर स्तरामध्ये काळ वेळ ह्यांचा वेग वेगवेगळा असतो आणि नियम देखील. पुढील लेखात आपण आयम डायमेंशन मध्ये काळ वेळ कसे काम करतो ते समजून घेणार आहोत.
आपल्याला काळ वेळेचे अद्भुत अनुभव आले असतील तर ते मेसेज द्वारे शेअर कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार

Comments
Post a Comment