पाणी हे संवादाचे एक पोर्टल आहे


 तुम्ही आंघोळ किंवा शॉवरमध्ये असता तेव्हा तुमच्या सर्वोत्तम कल्पना तुमच्या अंतर्मनातून बाहेर येतात, ह्या श्रुष्टीतून, ब्रम्हांडातून डाउनलोड होतात हे तुमच्या लक्षात आले आहे का? 


किंवा तलाव, नदी, सरोवर किंवा महासागर इथे गेल्यावर तुम्हाला वरील अनुभव येतात? 


अजून अद्भुत चांगल्या वाईट शक्तींचा अनुभव येतो? 


स्वप्ने बदलून जातात? 


पाणी अनंत माहिती साठवून ठेवते, पाण्याचे स्वतःचे नैसर्गिक अलौकिक इको सिस्टम आहे. आपल्या ग्रहाचे पाणी आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व ज्ञान, प्रेम, प्रकाश कोड आणि उच्च फ्रिक्वेन्सीसह प्रोग्राम केलेले आहे. सर्वकाही पाण्यात आहे.


पाणी तुमच्या चेतनेला, अंतर्मनाला प्रवास करू देते आणि इतर आयामांमधील माहिती अधिक सहजतेने टॅप करते. 


ते तुमच्या मार्गदर्शकांना तुमच्याशी संवाद साधण्याची परवानगी देते. ते मार्गदर्शक देव, निसर्ग साधू संत आणि गुरु असू शकतात किंवा नकारात्मक शक्ती देखील. 


सध्याच्या काळात आध्यात्मिक प्रगतीसाठी पाणी हे सर्वात दुर्लक्षित साधन आहे.


पाण्यामध्ये शक्ती प्रचंड आहे म्हणून अनुष्ठान करतांना, संकल्प करतांना पाण्याचा वापर केला जातो.


काळ्या जादुमध्ये देखील पाण्याला खूप महत्व आहे.


वैज्ञानिक आणि डॉक्टर देखील पाण्याला खूप महत्व देतात.


खालील उपाय पाण्यासोबत करा :


जेव्हा तुम्ही आंघोळ करत असाल तेव्हा नेहमी सकारात्मक विचार करा.


पाणी पीत असतांना सकारात्मक विचार करा.


नवीन सुरुवात करतांना पाण्याने अनुष्ठाना संकल्प करा.


ह्याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल.


तरीही बदल घडत नसेल तर गुरूंकडून वरील सर्व उपाय करून घ्या.


माझी पंच तत्व साधना आणि शहरी भाषेत कोर्स आहे त्यामध्ये एक तत्व आहे पाणी, शिष्यांना प्रचंड अनुभव येत असतात. ह्या पंच तत्वांमध्ये शक्ती प्रचंड आहे.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Comments