प्रोस्ताहन आणि मोटिवेशन ह्याचा अतिरेक झाल्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. काहींच्या मनात नकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे. अनेक समज गैरसमज दूर करून देतो.
एक कथा होती ज्यामध्ये जंगलात एक परीक्षा घेण्यात येत होती, कोण उत्तम पोहू शकत होता ह्याची परीक्षा होती. स्पर्धेत भाग घेण्यासाठी माकड, मासा, हत्ती आणि गरुड ह्यांची निवड करण्यात आली होती.
परीक्षेचा उद्देश काय तो समजला?
म्हणजे जो ह्या परीक्षेत पहिला येईल तो पास झाला.
नेहमीप्रमाणे परीक्षा सुरु झाली, मासा अगदी आरामात परीक्षा पास झाला, हत्ती आणि माकड कसातरी परीक्षा काठावर पास झाले, आणि गरुड सपशेल नापास झाला व बुडाला. आता गरुड कधीच परीक्षा देवू शकणार नाही.
आता येवूया प्रोस्ताहनाकडे.
गरुड का जिवंत नाही राहिला?
मासा जमिनीवर जिवंत राहू शकला असता का? असेच गरुडाचे झाले.
गरुडाची क्षमता आहे उडणे त्यावर त्याला प्रोस्ताहन भेटले असते तर किती फायदा झाला असता. सोपे आहे जी ज्याची क्षमता आहे त्याला प्रोस्ताहन भेटले तर फायदा होणारच.
जर गरुडाची क्षमता पोहण्याची नाही आणि त्याला पोहण्याचे प्रोस्ताहन भेटत गेले तर तो कसा जिवंत राहील? प्रोस्ताहन देणाऱ्याला समजले पाहिजे ना?
म्हणजे एखाद्याला शेअर बाजाराचे ज्ञान नाही आणि त्याला प्रोस्ताहित केले शेअर बाजार पैसे गुंतवण्यासाठी तर तो शेअर बाजारात टिकेल का?
असे माझ्याकडे कितीतरी उच्च शिक्षित लोकांचे फोन येतात कि माझे २ करोड, ५ करोड, २५ करोड, खानदानी संपत्ती शेअर बाजारात बुडाली. हो हे वास्तव आहे.
इथे प्रोस्ताहन ह्या गुणाची काय चूक? प्रोस्ताहन ह्या गुणाचा दुरुपयोग करणाऱ्याची चूक आहे.
एखादी व्यक्ती नाही उद्योग व्यवसाय करू शकत ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या जगात काहीच करू शकत नाही म्हणून.
आहे ना नोकरी, रोजंदारी ची कामे, फ्रीलांसर वगैरे, पैसे कमावण्याचे शेकडो मार्ग उपलब्ध आहेत ह्या जगात.
ज्या व्यक्तीकडे जे कौशल्य आहे त्याला प्रोस्ताहन मिळाले तर त्या व्यक्तीची ग्रोथ होणारच आणि जे कौशल्य नाही विनाकारण दुसरे कौशल्य आहे असे भासवून प्रोस्ताहन दिले तर ते विषासारखेच काम करेन.
प्रोस्ताहन देणारा हा उत्तम समुपदेशक असला पाहिजे. त्याला समोरील व्यक्तीचे जन्मजात गुण कौशल्य समजले पाहिजे किंवा शोधले पाहिजे, आणि त्या नंतरच जिथे गरज असेल तिथे प्रोस्ताहनाचा वापर केला पाहिजे.
प्रोस्ताहन चांगले किंवा वाईट नाही तर त्याचा वापर करणाऱ्याच्या नैतिकतेवर अवलंबून आहे.
प्रोस्ताहनाचा योग्य वापर हा चमत्कार घडवतो.
मला आशा आहे कि मी प्रोस्ताहन, मोटिवेशन बद्दल असलेले तुमचे गैर समज दूर करण्यात यशस्वी झालो असेल, अजून कुठल्या विषयावर तुम्हाला लेख पाहिजे असेल तर तसे कमेंट मध्ये मेंशन करा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन,
मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Comments
Post a Comment