जर तुम्ही तुमच्या विषयातील तज्ञ असाल तर व्यवसायिक रित्याच पुढे जा


 मुंबई मधील एक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ माझ्याकडे सल्ल्यासाठी आले होते. एक समस्या निर्माण झाली होती ज्यावर त्यांना सल्ला पाहिजे होता.


मानसोपचार तज्ञांचा एक रुग्ण होता जिथे त्यांची भावनिक जवळीक निर्माण झाली होती, भावनिक जवळीक म्हणजे प्रेमी प्रेमिका फक्त असेच नाही तर जी ओरीजनल भावनिक जवळीक जी कुनासोबत देखील होते ती.


कधी कधी ते मानसोपचार तज्ञ व्यवसायिक नियम मोडून म्हणजे फी न घेता देखील मदत करत होते. फक्त ह्याचा फायदा समोरच्या व्यक्तीने उचलला व त्याच्या एका घरच्या व्यक्तीचे नाव घेवून बोलले कि त्यांनी तुम्ही सांगितलेले नाही करायला सांगितले.


जी व्यक्ती मुंबई सारख्या मुख्य शहरातील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहे तुम्ही त्यांना तुमच्या घरातील व्यक्ती आहे म्हणून फक्त महत्व देवून तज्ञांचा सल्ला नाकारत आहात?


त्या मानसोपचार तज्ञाची वयक्तिक फी किती आहे ह्याचा विचार केला का?


त्या मानसोपचार तज्ञाकडे किती आंतरराष्ट्रीय कंपन्या लाईन लावून उभ्या आहेत माहिती आहे का?


पहिली गोष्ट ती मानसोपचार तज्ञ आहे म्हणून ती मनुष्य प्राणी नाही, किंवा तिला भावना नाही असे होतच नाही. कितीही मोठा धार्मिक गुरु असू देत त्याला भावना नाही असे होवूच शकत नाही. चुका करणे हे मनुष्य असण्याचे लक्षण आहे त्यामुळे तुमचा दृष्टीकोन बदला.


माझा मित्र एम डी रेडियो लॉजिस्ट आहे, तो सरळ बोलला कि आम्ही माणसे नाही आहोत का? आम्हाला वाईट नाही वाटत का? एक डॉक्टर हॉस्पिटल मध्ये हार्ट एटेक येवून गेला , वाचू शकला का? आमचे सर नेव्ही पोलीस ते देखील असेच म्हणतात कि आम्ही माणसे नाही आहोत का? तुमच्यामधूनच आम्ही आलो ना?


एका चुकीचा आणि त्यांचा मानसोपचार तज्ञ असण्यावर शंका घेण्याचा काहीही संबंध नाही.


तुम्हाला माहिती आहे का मानसोपचार तज्ञांना काय काय ऐकावे लागते ते? मनुष्य प्राण्याचा चांगला वाईट विकृत असे सर्व प्रकारचे चेहरे बाहेर पडत असतात. सतत तेच तेच काम करणे सोपे नाही, जर आगोच्या जवळ काम करत आहात तर कितीही सुरक्षा घ्या कधी ना काही तरी हात जळणारच. बोलत नाही ह्याचा अर्थ असा नाही काही फरक पडत नाही म्हणून.


जर तुम्ही तुमच्या विषयातील तज्ञ असाल तर व्यवसायिक रित्याच पुढे जा, भले कितीही भावनिकता का निर्माण होऊ देत, एक सेक्रेटरी ठेवा, तिला सर्व मेनेज करू द्या, डायरेक्ट टच मध्ये राहू नका.


ह्याचा फायदा असा होईल कि ज्या चुकीचं व्यक्तीकडे वेळ जातो तो जाणार नाही व योग्य ठिकाणी वेळ जाईल. अजून चार लोकांना तुमचा फायदा होईल. जास्त विचार करू नका आणि जर जास्त गोंधळ उडाला असेल तर appointment घेवून मला संपर्क कराल.


आपला दर्जा मेंटेन ठेवा.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Comments