सकारात्मक दैवी उर्जा असलेल्या लोकांचा समूह असेल आणि त्यामध्ये जर एखादी नकारात्मक दानवी उर्जा असलेली व्यक्ती येत असेल तर समजून जायचे कि ती व्यक्ती तिची उर्जा तात्पुरती शुद्ध करायला आली आहे, जेणेकरून ती नकारात्मक दानवी उर्जा असलेली व्यक्ती सकारात्मक दैवी उर्जा असलेल्या लोकांच्या समूहात आरामात राहू शकते.
काही सामुहिक रेकी सेशन किंवा कोर्सेस मध्ये असे होते म्हणून रेकी हिलिंग कोर्सेस मी जास्तीत जास्त वयक्तिक घेतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या रेकी मास्टर ची ओळख असणे खूप गरजेचे आहे, कधी कधी रेकी मास्टर ला सुद्धा हे माहिती नसते. इथे तुमच्या रेकी मास्टर चा दोष नाही तर हे उर्जा शास्त्र आहे ज्याला जसे वापरायचे आहे तो तसे वापरेन.
काही केसेस मध्ये असे आढळून आले आहे कि रेकी मास्टर ला मिडीयम बनवून त्यांच्या थ्रू त्यांच्या व त्यांच्या शिष्यांची उर्जा हि दानवी उर्जा असलेली व्यक्ती शोषत होती. त्यावेळी मी सरळ रेकी मास्टर ला संपर्क करू शकत नव्हतो कारण त्या दानवी उर्जा असलेल्या व्यक्तीला हे कळालेच असते. सात्विक मंत्राच्या मार्गाने, पूजा पाठ दाखवून उपायांना सुरुवात केली व त्यानंतर तामसिक तांत्रिक हिलिंग म्हणजे ऑपरेशन सारखे सुरुवात झाली. फक्त हेच नाही तर नंतर सुरक्षा कवची देखील निर्माण करून दिले.
किती सोपी प्रोसेस वाटत आहे ना? पण हे उपाय ३ महिने चालले, खर्च झाला, रेकी क्लासेस बंद ठेवायला लागले, घरात वाद विवाद होत होते ते थांबले, मुलगी अचानक बिघडली होती ती सुधारली, बायको चा जीवघेणा आजार बरा झाला, आणि जे रेकी मास्टर निस्तेज झाले होते त्यांची उर्जा परत आली, एक ते दीड वर्षे ते सतत त्रास सहन करत होते.
रेकी हिलिंग उर्जा शास्त्राचा एक भाग झाला, उर्जा शास्त्र त्यापेक्षा प्रचंड वास्ट आहे. खूप मोठे आहे. इथे सर्व प्रकारच्या उर्जा उपलब्ध आहे, इथे तज्ञ होण्यासाठीच अनेक वर्षे जातात. जर त्या रेकी मास्टर चा माझ्यासोबत संपर्क नसता झाला तर पुढील महिन्यात संपूर्ण कुटुंब संपले असते इतकी वाईट परिस्थिती होती.
म्हणून उर्जा शास्त्र शिकवतांना किंवा कुठलेही शास्त्र शिकवतांना पहिले सुरक्षित रहायला शिकणे महत्वाचे आहे आणि जो सुरक्षित राहू शकत नाही त्याने ते शास्त्र न शिकलेले बरे, अश्या व्यक्तींनी गुरु, मास्टर करावा व वेळ पडली कि उपाय उपचार करत रहावे.
तुमची उर्जा हि कधीही आणि कुठूनही शोषली जावू शकते, खास करून ज्या महिला मॉल मध्ये जातात त्यांच्यात तर प्रचंड नकारात्मकता शिरलेली दिसून येते, काही कालावधीने ती नकारात्मकता कमी कमी होत जाते.
दानवी उर्जा कुणाला शिकार करते?
महिला, लहान मुले, भावनिक स्त्री पुरुष, सरळ मार्गी स्त्री पुरुष, नकारात्मक मानसिकता असलेली लोक, जे डोळे झाकून अनोळखी लोकावर देखील विश्वास ठेवतात ते आणि ज्यांना माहिती आहे कि दानवी उर्जा असलेली व्यक्ती संपूर्ण कुटुंबाची उर्जा शोषत आहे तरीही काही करत नाही असे पूर्ण कुटुंब संपून जाते.
हा लेख घाबरवण्यासाठी नाही तर जागृतीसाठी आहे. बिनधास्त कोर्सेस करा आणि जर तुम्हाला वरील अनुभव आले तरच मला संपर्क कराल. दर महिन्याला जगभरातून २ ते ४ तरी रेकी मास्टर माझ्याकडे उपाय, उपचारांसाठी येतच असतात. हे चालूच राहणार आहे.
जिथे समूह असेल तिथे थोडी काळजी घ्याल, गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळा, पुढील प्रार्थना बोलला
पहिली प्रार्थान सर्वांसाठी
"हे ह्या ब्रम्हांडातील उर्जा मी उर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे, मला सुरक्षा द्या, माझ्यात सुरक्षा उर्जा प्रवाहित करा, मी तन मन धन अर्पण केले आहे."
दुसरी प्रार्थना माझ्या शिष्यांसाठी
"हे अश्विनीकुमार गुरु, मास्टर मी उर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आली आहे, मला सुरक्षा द्या, माझ्यात सुरक्षा उर्जा प्रवाहित करा, मी तन मन धन अर्पण केले आहे."
तिसरी प्रार्थना ज्यांना पहिल्या आणि दुसऱ्या प्रार्थनेमुळे कनेक्ट होण्यासाठी समस्या निर्माण होत असेल तर पुढील प्रार्थना
बुद्धा हेंड, हिलिंग हेंड (बुद्धांचा हिलिंग हात, जो प्रचंड शक्तिशाली आहे व सर्व समस्यांवर काम करतो)
"हे हिलिंग हेंड, हे बुद्धा हेंड मी उर्जेची प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे, मला सुरक्षा द्या, माझ्यात सुरक्षा उर्जा प्रवाहित करा, मी तन मन धन अर्पण केले आहे."
तुम्ही ज्या देवांना मानता ते किंवा जर माझ्याशी कनेक्ट व्हायचे असल्यास बुद्धा आणि शिवा ऊर्जेद्वारे कनेक्ट होऊ शकता
"हे हे देवांचे देव महादेव मी उर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे, मला सुरक्षा द्या, माझ्यात सुरक्षा उर्जा प्रवाहित करा, मी तन मन धन अर्पित केले आहे."
"हे स्वयं प्रकाशित बुद्धा, सर्वोच्च उर्जेचे स्त्रोत मी उर्जेच्या प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी आलो आहे, मला सुरक्षा द्या, माझ्यात सुरक्षा उर्जा प्रवाहित करा, मी तन मन धन अर्पण केले आहे."
मला आशा आहे कि समूहात उर्जा कशी शोषली जाते ह्याबद्दल तुमच्यासोबत अनुभव शेअर करू शकलो, कन्सल्ट साठी माझा मोबाईल, क्रमांक देत आहे, वेळ निश्चित करून फोन कराल. कृपया hi मेसेज पाठवू नका, विषय लिहाल.
धन्यवाद
तांत्रिक मास्टर हीलर
अश्विनीकुमार
8080218797
Comments
Post a Comment