psychiatrist, counsellor आणि therapist मध्ये काय फरक आहे?


 psychiatrist, counsellor आणि therapist मध्ये काय फरक आहे?


A psychiatrist:


- मानसशास्त्रीय विकारांमध्ये विशेषज्ञ असलेले वैद्यकिय डॉक्टर

- बोलणे, औषधे आणि ECT द्वारे शेवटी निदान आणि सर्व मानसिक विकारांवर उपचार करू शकतात.


A counsellor: 


- मेडिकल डॉक्टर नाही

- औषध देऊ शकत नाही

- ढोबळपणे निदान करू शकतो आणि काही विकारांवर फक्त बोलून उपचार करू शकतो

- कमी कालावधीसाठी उपचार

- कधीकधी प्रथमोपचार म्हणून कार्य करते

- समाधान केंद्रित उपचार


A therapist:


- मेडिकल डॉक्टर नाही

- औषध देऊ शकत नाही

- ढोबळपणे निदान करू शकतो आणि काही विकारांवर फक्त बोलून उपचार करू शकतो

- उपचारांचा दीर्घ कालावधी

- वर्तमान आजाराच्या कारणांवर लक्ष केंद्रित करतात

- मनोविश्लेषण, CBT किंवा REBT इत्यादीसारख्या काही विशिष्ट थेरपी पद्धती वापरतात.


समुपदेशक आणि थेरपिस्ट हे शब्द काही वेळा लोक एकमेकांना बदलून वापरतात


बहुतेक मनोचिकित्सक औषधोपचार करून निदान करतात आणि उपचार करतात. काही जण सल्ला देऊ शकतात आणि थेरपी देखील करू शकतात. ज्यांना व्यापक समुपदेशन किंवा थेरपीची गरज आहे त्यांना ते इतरांकडे रेफर करू शकतात.


जेव्हा देखील तुम्हाला मानसिक, मनोशारीरिक समस्या किंवा आजार असतील, जेहा तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे असेल, तुम्हाला विचारात सुस्पष्टता पाहिजे असेल म्हणजे थोडक्यात समस्या दूर करायच्या आहे आणि आत्मविकास करायचा आहे तर तुम्ही psychiatrist, counsellor आणि therapist जावू शकता.


मानसिक आजार म्हणजे वेडेपणा नाही, मानसिक आजार जसे इतर शारीरिक आजार आहेत तसेच असतात फक्त त्यावर उपचार वेगळ्या पद्धतीने होतात. जिथे गरज आहे तिथे गोळ्या दिल्या जातात. कृपया घरगुती उपाय आणि उपचार करू नका, डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाऊनच करा. तुम्ही आरामात बरे व्हाल.


एका सेशन मध्ये किंवा काही सेशन मध्ये फरक पडतो, सुरुवात केल्यावर तुम्हाला समजून येईल. जास्त वेळ उपचार चालतील असे सुरुवातीला समजू नका.


हा लेख मानसिक आरोग्याच्या जागृतीसाठी देत आहे, तुम्ही जवळील psychiatrist, counsellor आणि therapist ना विना संकोच संपर्क करू शकता. मानसिक आरोग्याबद्दल जागृत व्हा. डिप्रेशन, एंझायटी असे आजार दुर्लक्षित केल्यामुळे जीवघेणे बनतात पण सुरुवातीला उपचार केले तर एका क्षणात नाहीसे होवून जातात.


धन्यवाद 

अश्विनीकुमार


आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, रेकी, हिलिंग, अध्यात्मिक उपचार, उर्जा थेरपी

Comments