सर्वांगीण समृद्धीचा एक भाग म्हणजे आर्थिक समृद्धी आणि ह्या आर्थिक समृद्ध लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
सर्वांगीण समृद्धीचा एक भाग म्हणजे आर्थिक समृद्धी आणि ह्या आर्थिक समृद्ध लोकांमध्ये दोन प्रकार असतात.
१) पहिल्या प्रकारातील आर्थिक समृद्ध लोक त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या आर्थिक समृद्धीच्या लेव्हल ला घेवून येतात. जसे कि एखादे काम असेल आणि बाहेर त्या कामाचे दिवसाला २० हजार मिळत असतील तर ते तुम्हाला त्यांच्या समृध्द आयुष्यासारखे २ लाख देतील.
२) दुसऱ्या प्रकारातील आर्थिक समृद्ध लोक त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्व लोकांकडून कमी पैश्यात किंवा फुकट म्हणजे काम झाले तरी पैसे न देणे असे वागवत असतात. ह्यांच्याकडे वरचा पैसा प्रचंड असतो आणि तितकेच ते समोरील व्यक्तींचे शोषण करतात. जर दिवसाला २० हजाराचे काम असेल तर त्या कामाचे १० किंवा त्यापेक्षा कमी देतात व जास्त राबवून घेतात.
तुम्ही कुणाच्या संपर्कात, सहवासात आहात?
जर पहिल्या लोकांच्या सहवासात असाल तर निश्चिंत रहा, व पहिल्या क्रमांकातील लोकांचा सहवास वाढवा.
जर दुसऱ्या क्रमांकातील लोकांच्या सहवासात असाल तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तिथून बाहेर पडाल, कारण त्यांची तर नकारात्मकता तर लागेलच पण सोबत त्यांनी ज्यांना लुटले त्यांची हाय पण लागेल, म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्यांचे सुरक्षा कवच आहात, तुमचीच परिस्थिती खूप बिकट होऊन जाईल.
जर पहिल्या क्रमांकातील लोक तुमच्या संपर्कात येत नसतील तर तो पर्यंत गुरूंच्या सहवासात रहा पण चुकुनही दुसऱ्या क्रमांकातील लोकांच्या सहवासात राहू नका. भले गुरूंकडे पैसे देखील गेले तरी एक खात्री आहे कि इतरांची तुम्हाला हाय तरी लागणार नाही आणि तुमचे कुठलेही शोषण तरी होणार नाही.
चांगल्या लोकांना ज्यांनी तन मन धन अर्पण केले आहे ते सुखाने आयुष्य जगत आहे तर दुसरीकडे धूर्त लोकांच्या वागण्याला फसून ज्यांनी तन मन धन अर्पण केले आहे ते दुखात आयुष्य जगत आहे.
हा नियम फक्त आर्थिक आयुष्यासाठी नाही तर सर्वांगीण आयुष्यासाठी देखील लागू आहे जसे कि खाजगी आयुष्य, व्यवसायिक आयुष्य, सामाजिक आयुष्य, अध्यात्मिक आयुष्य आणि शारीरिक सुखाचे आयुष्य.
अतिशय सोप्या भाषेत सांगितले आहे, जिथे वाईट लोक आहेत तिथे त्या विरुद्ध चांगली लोक देखील आहे, जर तुम्ही वाईट लोकांच्या संपर्कात आहात ह्याचा अर्थ असा नाही ह्या जगात चांगली लोक नाही म्हणून, जे चांगल्या लोकांच्या संपर्कात आहेत त्यांच्यासाठी वाईट लोकांच्या संपर्कात आयुष्य जगणारे अस्तित्वात नाही.
धन्यवाद
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, रेकी, हिलिंग
Comments
Post a Comment