भावना ह्या उर्जा असतात, जर उर्जा नीट प्रवाहित नाही झाली, जर व्यक्त होता नाही आले तर ती उर्जा साठून राहते. भावनेची उर्जा हि आपल्या शरीरात साठून राहते.
आपले शरीर हे विशिष्ट पद्धतीने भावना रेकोर्ड करते, साठवते. आपले शरीर भावना साठवतांना विशिष्ट अवयवांचा, हार्मोन्स म्हणजे संप्रेरक, ग्लेंड म्हणजे ग्रंथी व इतरांचा वापर केला जातो. समजून घ्या कि तुमच्या प्रत्येक अवयवात भावनेची उर्जा साठलेली आहे, भावना साठलेली आहे. तुमच्या संपूर्ण शरीरात ठीक ठिकाणी भावना साठवून ठेवलेली आहे.
भावना सकारात्मक असतील तर काही समस्या नाही, उद्रेक झालेली भावना व्यक्त होवून जितक्या प्रमाणात भावना साठवू शकता ती भावना साठली गेली तरी काही समस्या नाही पण नकारात्मक भावना व व्यक्त न झालेली भावना हि तुमच्या शरीरावर आघात करते.
इथे त्या भावना तुमच्या शरीरात कश्या साठवल्या गेल्या?
समजा जर मानसिक समस्या असेल तर काही समस्या नाही पण जर अध्यात्मिक मार्गाने, अलौकिक मार्गाने किंवा अघोरी मार्गाने निर्माण करून साठवलेल्या असतील तर समस्या जास्त बिकट होऊ शकतात.
इथे एक महत्वाचा भाग येतो तो म्हणजे अनुवांशिकता किंवा पिढ्यानपिढ्या किंवा परंपरा इत्यादिंचा. भावनिक गुण, शक्ती, रहस्यमयी शक्ती, आशिर्वाद अश्या सकारात्मक भावना अनुवांशिक रित्या, पिढ्यानपिढ्या व परंपरेनुसार येत असतील तर ठीक पण ह्या उलट दुर्गुण, शक्ती पण तिचा अयोग्य वापर, रहस्यमयी नकारात्मक शक्ती, शाप हे देखील तुम्हाला मिळते.
काहींना संकटे आणि समस्या देखील तश्याच मिळतात, काहींचे पूर्ण आयुष्यच हे अगोदरपासून रेकोर्ड केलेले असू शकते, म्हणून अनेकदा अश्या व्यक्ती त्यांच्या ताब्यात नसलेले आयुष्य जगत असतात. लोकांना वाटते कि त्या व्यक्तीचा स्वभाव किंवा सवय तशीच आहे पण तसे काही नाही, हे सर्व घडत असते ते भावनांच्या रेकोर्डिंग मुळे, अनुवंशिकतेमुळे किंवा परंपरेमुळे.
हिलिंग साठी, बरे करण्यासाठी, उपाय व उपचारांसाठी भावना वाचण्याची, मानसिक आघात, अध्यात्मिक आघात, अघोरी आघात आणि इतर आघात ओळखण्याची क्षमता असली पाहिजे. काही तज्ञ किंवा गुरु फक्त वाचू शकत नाही तर बघू देखील शकतात. जेव्हा हे सर्व तुमच्या आई वडिलांकडून, पूर्वजांकडून किंवा जेव्हा तुम्ही इतके लहान असता कि त्या वेळचे तुम्हाला आठवत नाही ह्यासाठी भावना वाचण्याची बघण्याची क्षमता असणे खूप महत्वाचे आहे.
ह्यावर प्रभावी उपाय उपचार म्हणजे आत्म जागृतीचे ध्यान, रेकी, हिलिंग आणि संमोहन उपचार पद्धती. आत्म ज्ञान, आत्म अनुभव, आत्म स्व जागृत करण्यासाठी केलेले ध्यान फायदेशीर आहे. रेकी हिलिंग द्वारे भावनिक उर्जेवर उपाय व उपचार खूप फायदेशीर आहेत. संमोहनाद्वारे अंतर्मनात जावून भावनांच्या मुळावर काम करून केलेले उपाय व उपचार खूप फायदेशीर आहेत.
उपाय व उपचार केल्यावर आयुष्य बदलून जाते, प्रचंड हलके वाटते, दडपण कमी झाल्यासारखे वाटते, अनेक मानसिक व शारीरिक आजार नाहीसे होवून जातात जसे कि त्यांचे अस्तित्वच नव्हते, नकारात्मक लोक आणि परिस्थिती नाहीश्या होवून जातात, सर्वांगीण प्रगती व्हायला लागते.
उपाय व उपचार तुम्ही प्रतिसाद कसे देतात त्यावर अवलंबून आहे आणि तुमची समस्या किती जुनी व मोठी आहे त्यावर देखील अवलंबून आहे.
कुठच्या भावना ह्या कुठच्या अवयवाशी निगडीत आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर त्या संदर्भात कमेंट करा. पुढील व्हिडीओ त्यावर बनवेन.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment