पुढील सूचना रात्री झोपण्याअगोदर न चुकता मनात बोलायचे आहेत दिवसभरात जसा वेळ भेटेल तसे मनात बोलायचे आहे.
१) सर्वांगीण समृद्ध आयुष्यासाठी
वैचारिक औषध - "मी सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
२) निरोगी आयुष्यासाठी मानसिक, मनोशारीरिक आणि शारीरिक
वैचारिक औषध - "मी निरोगी आहे."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
३) आर्थिक आयुष्यासाठी
वैचारिक औषध - "मी श्रीमंत आहे, पैसा सर्व मार्गांनी माझ्याकडे येतो, साठतो व योग्य ठिकाणी गुंतवणूक करतो."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
४) नोकरीसाठी
वैचारिक औषध - "मी आनंदाने काम करत आहे, मला बढती मिळत आहे, मी उच्च पदावर पोहचलो आहे."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
५) उद्योग व्यवसायासाठी
वैचारिक औषध - "पैसा सर्व मार्गाने माझ्याकडे येतो, ग्राहक सर्व मार्गांनी माझ्याकडे येतात, माझ्या उत्पादन आणि सेवांना प्रचंड मागणी आहे, माझा उद्योग व्यवसाय दिवसेंदिवस भरभराट करत आहे."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
६) शेअर बाजारासाठी
वैचारिक औषध - "मी गरजेनुसार योग्य शेअर विकत घेतो व विकतो, माझे शेअर हे मला दर वर्षी श्रीमंत बनवत आहेत, मला दररोजची व्युव्हरचना बनवता येते."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
७) लग्नासाठी, प्रेमासाठी
वैचारिक औषध - "मी समजूतदार आहे, मला समजूतदार जोडीदार भेटला आहे."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
८) व्यक्तिमत्व विकासासाठी
वैचारिक औषध - "जास्तीत जास्त सकारात्मक विचार करणे, ध्यान व्यायाम करणे, आत्मविकासाचे कोर्सेस करणे, सकारात्मक लोकांसोबत राहणे."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
९) दैवी अलौकिक शक्तींसाठी
वैचारिक औषध - "मी तन मन धन अर्पण करून भक्ती करतो, करते. देवांवर, ब्रम्हांडावर, निसर्गावर आणि अश्विनीकुमार गुरूंवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या भल्यासाठी सर्व शक्ती काम करतात."
उपचार कालावधी : जोपर्यंत अंतर्मनात रुजत नाही तोपर्यंत.
संमोहन तज्ञ
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment