एका संमोहन शास्त्रात अनेक अद्भुत शक्ती दडलेल्या आहेत.


 संमोहन शास्त्रात अनेक प्रकारच्या शक्ती आहेत, जसे कि वशीकरण, प्रोग्रामिंग री प्रोग्रामिंग, अंतर्मनाच्या व्हेव्स म्हणजे तरंगे, स्वप्नांची दुनिया किंवा भ्रम, विशिष्ट पद्धतीने संमोहन शास्त्राचे शस्त्राप्रमाणे वापर करणे, जसे कि डोळ्यात बघून सूचना देणे, हाता द्वारे सूचना देणे किंवा बोलण्यातील शब्दांनी सूचना देणे इत्यादी, म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास संमोहन शास्त्र एक पण त्या शास्त्राचा वापर करून विविध प्रकारच्या शक्ती निर्माण करून जागृत करता येतात.


संमोहन शास्त्र इतके लोकप्रिय का आहे?


कारण शिकणे सोपे आहे, उपाय व उपचार पद्धती सोपी व प्रभावशाली आहे, हा फक्त इथे एक समस्या आहे कि संमोहन उपचार महाग असतात, ह्याला दुसरा पर्याय नसतो.


संमोहनात तुमचे अंतर्मन किंवा आत्मा शरीराबाहेर जावून फिरून येवू शकते, तुम्ही भाषा एका क्षणात शिकू शकता, शेअर बाजार एका क्षणात शिकू शकता, गणित तुम्हाला जमत नसेल तर एका क्षणात गणितात तज्ञ बनून जातात.


संमोहन शास्त्राचा वापर कुठल्याही शास्त्रासोबत करता येतो. जसे कि मानसशास्त्रा सोबत, अध्यात्मिक शास्त्रासोबत, अलौकिक शास्त्रासोबत, काळ्या जादू सोबत, मंत्र सोबत, तंत्र सोबत, वुडू सोबत किंवा इतर अनेक जिथे संमोहन फिट बसते त्या शास्त्रासोबत.


हे एक नैसर्गिक शास्त्र असल्यामुळे तुम्ही त्याचा वापर आरामात करू शकता. खाली मी टिप्स देत आहे त्या तुम्ही वापरू शकता, ज्या समस्या छोट्या आहेत फक्त त्यासाठी नाहीतर तुम्हाला तज्ञांची मदत घ्यावी लागेल, तीव्र आणि अनेक वर्षे जुनी समस्यांवर घरगुती उपचार करू नका.


१) ध्यान

२) व्यायाम

३) आहार

४) सकारात्मक वातावरण

५) सकारात्मक समूह

६) सूचना

७) गाढ झोप


वरील ७ पायऱ्यांचा वापर करून तुम्ही स्वतःहून तुमच्या आयुष्यात आरामात बदल करू शकता.


संमोहन शास्त्रावर लिहिण्यासारखे खूप काही आहे ते सर्व विषय मी पुढे हळू हळू घेवून येत जाईल, ज्ञान इतके आहे कि ते शब्दात मांडणे कठीण होवून जाते, हो पण मी जे कोर्सेस घेतो त्यामध्ये येणाऱ्या अनुभवात विद्यार्थी सर्वकाही शिकून जातो, इथे बोलण्याची आणी लिहिण्याची गरज पडत नाही. जसे कि "सर आज माझी १५० करोडची डील क्लोज करण्याची मिटिंग होती, मी जे दीड वर्षे तुमच्याकडे संमोहन शास्त्र शिकतो होतो व त्याचा रिझल्ट असा झाला कि मी ती डील तर क्रेक केलीच पण सोबत २, ३ कंपन्यांच्या मालकांनी मला संपर्क केला व जवळपास ६२० करोड च्या डील सर्वांसाठी क्रेक करून दिल्या, सोबत मला व्यवसायात भागीदारी आणि पद देखील मिळाले, मी फक्त आयुष्य जगत आहे आणि एकूण एक रुपया ह्या सर्व कंपन्यांकडून मिळत आहेत."


संमोहनाच्या शक्तीला मर्यादा नाहीत, जे १०, २० वर्षांपासून संमोहन शास्त्र शिकत आहे त्यांनी तर संमोहन शास्त्र जागृत केले आहे, व इतक्या शक्तींमध्ये पारंगत झाले कि सांगू शकत नाही, काही तर एकाच शक्तीमध्ये इतके पारंगत झाले कि त्यांचा हात ह्या जगात कोणी धरू शकत नाही, जसे काही जणांना एका पेक्षा जास्त शस्त्रे चालवता येतात तर काही एकाच शस्त्रामध्ये इतके तरबेज असतात कि त्यांचा हात ह्या जगात कोणी धरू शकत नाही.


बाकी सोडून द्या पण शिकण्यात जी मजा असते ती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. जर शिकायचे असल्यास फक्त शिकण्यासाठी शिका, स्वतःसाठी शिका ना कि समस्या दूर करण्यासाठी तेव्हाच तुम्ही संमोहनाचा आनंद घेवू शकाल, चमत्कारिक आयुष्य तर बायप्रोडक्ट आहे.


धन्यवाद

संमोहन तज्ञ

अश्विनीकुमार

Comments