आकर्षणाचा सिद्धांत आणि प्रयत्न


एका व्यक्तीचे कोर्स च्या अगोदर समुपदेशन सुरु होते, वय ४५, नोकरी आणि वेळ भेटायचा म्हणून व्यवसाय असे तो आर्थिक आयुष्य जगत होता. परिस्थिती मध्यम वर्गीय पेक्षा थोडी कमी.


इथे ह्या व्यक्तीचे अनुभव शेअर करण्याचे कारण म्हणजे त्याच्या आयुष्यात घडलेला चमत्कार. ह्या व्यक्तीने सुरुवातीपासून इतकी मेहनत घेतली होती, सातत्य ठेवले होते कि फक्त २ महिन्यातच त्याने त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून टाकले.


सर तुम्ही जसे बोलाल तसे मी करेन, निश्चिंत रहा, स्वामींच्या मठातून तुम्हाला शब्द देत आहे, आणी खरच ती व्यक्ती शब्दाला जागली. उत्तम गुरु कधीच नसतो, गुरूला उत्तम त्याचे शिष्य बनवतात.


आता इथून पुढे मी महत्वाचे मुद्दे उदाहरण स्वरुपात सांगणार आहे कृपया ते लिहून ठेवाल.


इथे फक्त समुपदेशनामध्ये कोर्स पेक्षा जास्त पैसे गेले, एक एक पैलू समजून घेत होतो व तो व्यक्ती उत्तम पद्धतीने सांगत होती. मला समजायला सोपे जायला लागले. काहीहि घाई केली नाही, त्या व्यक्तीला पटले कि घाई न करता आरामात जायचे, भले ह्यावर संपूर्ण आयुष्य खर्ची झाले तरी चालेल.


समुपदेशन सोबत टेक्निक असे उत्तम पद्धतीने चालले व एक जी दगडासारखी न बदलणारी मानसिकता होती तिचे रुपांतर एका सुपीक जमिनीत झाले. इथे त्या व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात भेटली नाही अशी मनशांती मिळाली.


सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला, काही फोबिया नाहीशे झाले, डिप्रेशन गायब झाले, काही शारीरिक आजार बरे झाले, हे शक्य झाले फक्त शिष्याच्या इच्छाशक्तीमुळे. आम्हाला असे चमत्कार खूप कमी बघायला मिळतात.


जेव्हा पुढील महिन्यात कोर्स सुरु झाला तेव्हा पहिल्या दिवसापासून रिझल्ट यायला लागला.


एक आता मी महत्वाचे सांगणार आहे.


ह्या व्यक्तीची समस्या काय होती?


१० % कामासाठी १०० % मेहनत घ्यायची. विनाकारणचे कठीण परिश्रम. जेव्हा तिच्या आयुष्यात खऱ्या समस्या आल्या होत्या तेव्हा त्या समस्या जर ५० % असतील तर मेहनत हि १०० % असायची. अशी वेळ आली कि १ रुपया कमावण्यासाठी १० हजार रुपये कमवण्या इतपत मेहनत करावी लागत होती.


त्यामध्ये भर टाकली गेली ते १ मिनिटाच्या प्रोस्ताहन रील्स ची. ह्या प्रोस्ताहन रील्स च्या नुसार १०० करोड च्या खाली कमावणारा एकही व्यक्ती नाही, आणि कमीत कमी १०० करोड कमावलेच पाहिजे. ह्या रील्स मुळे विनाकारण महागड्या गाड्या आणि स्वतःबद्दलचा कमीपणा वाढला आहे.


ह्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीही अतिरेक केलेला नाही, जिथे हि व्यक्ती २० हजार कमवत होती तिथे त्या व्यक्तीला जास्तीत जास्त ५० हजार आणि सरासरी ३५ हजार पर्यंत घेवून आलो, असे वाटत होते कि एका क्षणात संपूर्ण कुटुंब सुरक्षित झाले.


जिथे १० % मेहनतीची गरज आहे तिथे १० % च मेहनत केली जात होती, उरलेला वेळ आणि उरलेली उर्जा हि सकारात्मक आत्मविकासाच्या, कौटुंबिक आत्मविकासाच्या कामाला लावली जात होती.


अतिरेक सोडला आणि वास्तवात येवून मेहनत सुरु झाली, आणि हळू हळू करत पूर्ण बदल घडवून येत होते. आता हि सुरुवात झाली कुठ पर्यंत येवून थांबेल हे माहिती नाही, पुढे अजून खूप आयुष्य बाकी आहे.


थोडक्यात सांगायचे झाल्यास जर तुम्ही समस्यांमधून जात आहात, मोठ्या संकटाचा सामना करत आहात तर तिथे विनाकारण अतिरेकी मेहनत करू नका, कारण तणावामुळे तुम्ही अति घाई करत २५ % समस्यासाठी १०० % मेहनत वाया घालवता. मन शांत करा व समस्येचा सामना करा मग बघा कसे तुम्ही समस्येमधून बाहेर पडता ते.


आयुष्याचा एक एक टप्पा पूर्ण करत जा, समस्येची तीव्रता कमी करण्यावर भर द्या, हळू हळू तुम्ही समस्येवर मात करता व शेवटी पूर्ण समस्येमधून बाहेर येता.


जेव्हा तुम्ही पूर्ण समस्येमधून बाहेर येता तेव्हा तुमचा पुर्नजन्म होतो, तुमची कंपने सक्षम होतात आणि तुमच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करायला लागतो. तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतो.


जी लोक अतिरेक ध्येय ठेवतात, इंटरनेट वरील खोट्या आयुष्याचा बळी पडतात ती कधीही आयुष्य बदलू शकत नाही व आहे तिथे अडकून पडतात. १० करोड कर्जा पासून मुक्ती मिळवायची आहे तर त्यावर लक्ष केंद्रित करा ना कि १०० करोड ची अवास्तव स्वप्ने बघा.


हि अवास्तव स्वप्ने घाबरट व्यक्तीच बघतो कारण त्याला माहिती आहे कि १० करोड आज कर्ज आहे उद्या १०० करोड ह्यासाठी कमवायचे आहे कारण हे १० करोड कर्ज कमी वाटले पाहिजे, त्यांना माहिती आहे का कि १०० करोड च्या पर्वतावरून पडलात तर काय होईल? ह्यासाठी टप्प्या टप्प्याने आयुष्य घडवावे लागते, आज कर्ज आहे तर उद्या प्रचंड पैसा आहे, असे आयुष्य असते.


आयुष्यात समस्या येतच राहणार आहे, फक्त इथे आपण त्यामधून लगेच बाहेर पडत आहोत ना कि रडत बसत आहोत, काही वेळेस समस्या येण्या अगोदरच आपण त्यावर उपाय करतो, ह्याला बोलतात अनुभव.


आनंद, धाडस सकारात्मकता हे सर्व मानसिक आहे, ह्याचा पैश्यांसोबत काहीही संबंध नाही, म्हणून मी स्वभाव बघतो, मानसिकता बघतो ना कि फक्त पैसे किंवा व्यक्ती दिसायला कशी आहे ते, हे काहीही कामी येत नाही.


जी लोक चमत्कार घडवतात ती आजूबाजूलाच असतात पण अतिशय सामान्य आयुष्य जगत असतात. सिनेमात दाखवतात तसे अतिरेक आयुष्य जगत नाही.


हे मी जे सांगितले आहे ते वास्तव आणि काही दिवस किंवा महिन्यात बदल घडवणारे सांगितले आहे, तुम्ही देखील तुमच्या आयुष्यात वापरा आणि चमत्कार बघा. अतिशय सोपे आहे, आणि काहीही अतिरेक नाही, फक्त प्रयत्न करणारच यशस्वी होतो त्यामुळे तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता आणि कोणीही कुणाला अडवू शकत नाही, तुम्ही फक्त तुम्हाला अडवू शकतात.


धन्यवाद

अश्विनीकुमार


आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments