जेव्हा मन मेंदू आणि शरीर तुमच्या मर्यादेपर्यंत पोहचते त्यानंतरच कल्पनाशक्ती कामी येते. जेव्हा एखादी व्यक्ती उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी एका मर्यादेपर्यंत पोहचते त्यानंतर तिची कल्पना शक्ती पुढे घेवून जात ध्येय साध्य करून देते. विना कृतीची कल्पनाशक्ती कामाची नाही. दररोज एक एक रुपया कमावणाराच एका मर्यादेनंतर करोडो कमवायला लागतो. जे मेहनत करून मार्ग न बनवता व्हीज्यूअलाइझ करतात ते कधीही काहीही आकर्षित करू शकत नाही आणि जे सतत ध्येयाच्या दिशेने कृती करत जातात तेच आकर्षित करू शकतात.
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment