स्टॉकहोम सिंड्रोम अशी एक मानसिक अवस्था आहे, स्थिती आहे किंवा सिद्धांत आहे जे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते कि का काही बंधकांचे कधी कधी त्यांच्या अपहरणकर्त्यांबद्दल भावना निर्माण होतात, मानसिक संबंध निर्माण होतात.
बंधकांच्या मनात अपहरणकर्त्या बद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात, शारीरिक, मानसिक आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्यां बद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात.
म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास जी व्यक्ती नकारात्मक वागते त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक भावना निर्माण होतात
आणी मी एक स्पष्ट सांगतो कि हे प्रेम नाही, जर काही मजबुरी मुळे नकारात्मक व्यक्ती सोबत राहत असेल तर आपन ते समजू शकतो पण हि जर मानसिक समस्या असेल तर त्या व्यक्तीला जागे करा,
आणि तरीही सुधरत नसेल तर अश्या व्यक्तींना तुमच्या आयुष्यातून बाहेर काढा किंवा तुम्ही तिथून निघून जा कारण त्यांनी तो निर्णय घेतला असतो.
मानसशास्त्र असे अनेक गैर समज दूर करते म्हणून आपल्या आयुष्यात मानसशास्त्र आणि अध्यात्माला महत्व द्या. पण कृपया मानसशास्त्र आणि अध्यात्मात समान धागा शोधण्याचा प्रयत्न करू नका, दोन्ही शास्त्र त्यांच्या जागी अगदी योग्य आहे, भिन्न शास्त्रांचा आदर करायला शिका हे तुमच्या फायद्यासाठीच आहे.
अश्विनीकुमार
Comments
Post a Comment