आकर्षणाच्या सिद्धांताचे ५ टेक्निक्स जे तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करून देतात







१) व्हिज्युअलायझेशन (Visualization) (जिवंत कल्पनाशक्ती, जिवंत स्वप्न):

तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे त्या बद्दल सुस्पष्ट व्हिज्युअलायझेशन करा. डोळे मिटून तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे ते तुमच्या मनात स्पष्टपणे पाहा, सूक्ष्म च्या सूक्ष्म डीटेल्स ठेवा, जणू ते आधीच तुमच्याजवळ आहे असे वागा. तन, मन धन आणि भावना तुम्हाला जे आकर्षित करायचा आहे त्यावर लावा. 


२) अफरमेशंस (Affirmations):

सकारात्मक अफरमेशंस वापरा. जसे, "मी आनंदी आणि सर्वगुण संपन्न आहे," किंवा "माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत," किंवा "मी सर्वांगीण समृध्द आयुष्य जगत आहे." हे शब्द आपल्या मनात पुन्हा पुन्हा म्हणा, व्हिज्युअलाइझ करा, विश्वास ठेवा.


३) आभार (Gratitude):

तुमच्याजवळ जे आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा, आभार व्यक्त करा. दररोज त्या गोष्टींची यादी करा ज्या तुमचं जीवन आनंदी करतात. आभार सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत करते. "माझ्याकडे जे काही आहे त्या सर्वांचा मी आभारी आहे.".


४) विश्वास (Belief):

तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे त्यावर ठाम विश्वास ठेवा. विश्वास ठेवा की जे तुम्हाला आकर्षित करायचे आहे ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. सर्व प्रकारच्या शंका मनातून काढून टाका आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. ध्येय आणि ब्रम्हांड मध्ये काहीही यायला नको, पूर्ण रस्ता साफ पाहिजे.


५) कृती, क्रिया (Action):

फक्त विचार आणि भावना पुरेशा नाहीत, त्यासाठी काहीतरी कृती करणे आवश्यक आहे. तुम्हाला जे आकर्षित करायचे आहे त्या संदर्भात किंवा त्या दिशेने छोट्या, परंतु सातत्यपूर्ण पावले उचला.


या आकर्षणाच्या सिद्धांताच्या ५ टेक्निक्स तुम्हाला जे पाहिजे ते आकर्षित करण्यास मदत करतील.


अश्विनीकुमार


आकर्षणाचा सिद्धांत कोर्स, उपाय व उपचार

 

Comments