पैसे आकर्षित करण्यासाठी आकर्षणाच्या सिद्धांताच्या ५ टेक्निक्स








 पैसे आणि आर्थिक समृद्धी आकर्षित करण्यासाठी "लॉ ऑफ अट्रॅक्शन"शी संबंधित पाच टेक्निक्स, तंत्र:


अफरमेशंस (Affirmations):


“मी पैसा आणि समृद्धीचा चुंबक आहे.”


टेक्निक्स / तंत्र: हे अफरमेशंस रोज, विशेषतः सकाळी आणि झोपण्याआधी म्हणा. हे अफरमेशंस म्हणताना कल्पना, व्हीज्यूअलाइझ करा कि तुम्ही पैशांनी आणि आर्थिक यशाने वेढून गेले आहात, आणि अफरमेशंस तुमच्या अंतर्मनात रुजून तुमच्यामधून पैसा आणि समृद्धी ची कंपने निर्माण होत आहेत अशी भावना निर्माण करा, व्हीज्यूअलाइझ करा.


“पैसे सोप्या आणि सहजपणे आणि अडथळ्याशिवाय माझ्याकडे येतात.”


टेक्निक्स / तंत्र: तुमच्या आर्थिक ध्येयांशी संबंधित कृती करताना (उदा. बजेट तयार करणे, गुंतवणूक करणे किंवा बाजूच्या प्रकल्पांवर काम करणे, पैसे कमावण्याचे विविध मार्ग निर्माण करणे) हे अफरमेशंस वापरा. हे अफरमेशंस पैसे आकर्षित करणे नैसर्गिक आणि सहज आहे असा विश्वास तुमच्या अंतर्मनात दृढ करण्यात मदत करते.


“मी आर्थिक समृद्धी आणि यशाच्या लायक आहे, पात्र आहे.”


टेक्निक्स / तंत्र: हे अफरमेशंस स्टिकी नोट्सवर, कागदावर लिहा आणि जिथे आपण नियमितपणे ती पाहता अशा ठिकाणी ठेवा (उदा. आरशावर, संगणकावर किंवा फ्रिजवर). प्रत्येक वेळी ती पाहताना आपल्या लायकीवर, पात्रतेवर विश्वास ठेवा आणि स्वीकारा.


“जीवनात येणाऱ्या समृद्धीसाठी मी आभारी आहे.”


टेक्निक्स / तंत्र: आपल्या आभार प्रार्थनेत या अफरमेशंसचा समावेश करा. दर दिवशी तुम्ही आभारी असलेल्या गोष्टींची यादी करा, कोणतेही छोटे किंवा मोठे आर्थिक फायद्याचे यादीत समावेश करा, यामुळे तुमच्या समृद्धीच्या मानसिकतेला सक्षम करण्यास मदत होते.


“मी अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे.”


टेक्निक्स / तंत्र: तुम्हाला अनपेक्षित पैसे किंवा संधी मिळतात अशा परिस्थितीची कल्पना, व्हीज्यूअलाइझ करताना हे अफरमेशंस वापरा. हे अफरमेशंस तुम्हाला मुक्त ठेवण्यास मदत करते आणि तुम्ही कदाचित घेतले नसतील अशा शक्यतांबद्दल आणि जाणीवेबद्दल जागरूक राहता.


वरील टेक्निक्स म्हणजे तंत्र तुम्हाला पैसे आकर्षित करण्यात मदत करेन स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही करू शकता, सोपे आहे, आणि जर शक्य नाही झाल्यास आपला कोर्स तुम्ही करू शकता पण पहिले स्वतः प्रयत्न तरी करा.


"प्रयत्न करणारा कधीही अपयशी होत नाही, कारण अपयश हा शब्द त्याच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जातो व त्याची जागा अनुभव घेतो व अनुभव घेत प्रयत्न करणारी व्यक्ती यशाची अनेक शिखरे सर करत जाते." - अश्विनीकुमार

Comments