जसा तुमचा विश्वास असतो तसे तुम्ही आयुष्य जगत असता.


 तुमचा विश्वास हा कंपने निर्माण करतो, भावना निर्माण करतो आणि जिवंत कल्पना म्हणजे व्हिज्युअलायझेशन, स्वप्ने म्हणेज बघवतो.


तुमचा विश्वास समृध्द आहे तर तुम्ही समृध्द आयुष्य जगत असाल, आणि जरि समस्येतून जात असाल तरीही तुम्ही त्या समस्येवर मात करत परत समृध्द आयुष्य जगाल.


जर जर तुमचा समृद्धी वर विश्वास नसेल तर तुम्ही समृद्ध आयुष्य जगत नसाल, आणि जर समस्येतून जात असाल तर समस्येवर मात करणे तुम्हाला कठीण जाईल.


म्हणजे जसा तुमचा तुमचा विश्वास आहे तसे तुम्ही आयुष्य जगता.


विश्वासाचा एक चमत्कार म्हणजे जर एखादी व्यक्ती डिप्रेशन ने ग्रस्त असेल आणि तिचा आर्थिक समृद्धीवर विश्वास असेल तर ती व्यक्ती व्यक्ती आर्थिक दृष्ट्य समृद्ध आयुष्य जगते.


म्हणून काही ठिकाणी लोकांचा स्वभाव भिन्न, मानसिकता भिन्न तरीही स्वभावाच्या विरुध्द क्षेत्रात यशस्वी आयुष्य जगत असतात. बाहेरील लोकांना फक्त बाह्य आयुष्य दिसते पण त्यांच्या अंतर्मनात सततची उलाढाल सुरु असते.


अनेकदा जे हुशार असतात ते करिअर मध्ये यशस्वी होत नाही तर जे एव्हरेज असतात ते प्रचंड यश संपादन करतात. सर्व खेळ हा विश्वासाचा असतो.


शेअर बाजारात काहींना ज्ञान प्रचंड असते पण ते त्या ज्ञानाचा वापर करू शकतो नाही किंवा तितका पैसा त्यांच्याकडे नसतो तर दुसरीकडे शेअर बाजाराचे शून्य ज्ञान पण ट्रेड अगदी तज्ञासारखे खरेदी विक्री केले जाते.


चार भिंतीमध्ये तुम्ही मर्यादा घालू शकता पण जगात सर्वांना संधी उपलब्ध आहे. तुम्ही फक्त स्वतःला अडवू शकता जगाला नाही. तुम्हाला जसे बाहेरून दिसते त्यापेक्षा भिन्न ती व्यक्ती असते.


इतक्या वर्षांच्या लोकांच्या अनुभवाने एक सुविचार वास्तवात बघितला आहे तो म्हणजे जर एखाद्याने ठरवले तर तो त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो, अगदी कोणीही यशाच्या उंच शिखरावर जावू शकतो आणि हे वास्तव आहे. त्यामुळे मी बोलूच शकत नाही कि हि व्यक्ती यशस्वी नाही होणार किंवा ती व्यक्ती यशस्वी नाही होणार म्हणून.


मी एक गुरु आहे असे माझ्या सारखे अनेक गुरु आहेत आणि त्यापैकी काही माझे चांगले मित्र आहेत त्यांच्या देखील शिष्यांचे चमत्कार मी ऐकले आहे, काहींना प्रत्यक्षात भेटलो आहे. म्हणजे माझे १५ शिष्य चमत्कार घडवतात तर तिथे दुसर्या गुरूंचे २०, ५ किंवा ३० असे शिष्य चमत्कार घडवतात.


आयुष्य खरच अमर्याद आहे, इथे कुणालाच कसलीच कमी नाही. 1 करोड च्या आत टर्न ओव्हर करणारे अमर्याद भेटत आहे तर त्यापुढे टर्न ओव्हर करणारे एका पेक्षा एक भेटत चालले आहे, म्हणजे एखाद्याने ठरवले तर त्याला जे पाहिजे ते अमर्याद भेटू शकते तरीही ह्या ब्रम्हांडात कसलीही कमी पडणार नाही.


इथे विषय फक्त पैश्यांचा म्हणजे आर्थिक समृद्धी चा नाही तर दुर्धर आजार बरे करणारे अनेक आहेत, नोकरी मिळणारे अनेक आहेत, योग्य उद्योग व्यवसाय मिळणारे अनेक आहेत, जोडीदार मिळणारे अनेक आहेत, आनंद गवसणारे, मन शांती मिळणारे आणि निरोगी शरीर मिळणारे अनेक आहेत, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते सर्व अमर्याद उपलब्ध आहे.


म्हणून मी शिष्यांना सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगण्याचा विश्वास ठेवायला सांगतो, एकतर १०० % मिळते किंवा थोडेफार कमतरता राहते पण जास्तीत जास्त समृद्ध आयुष्य तर आरामात जगतो.


बिनधास्त स्वतःवर विश्वास ठेवा, असे काहीच नाही कि जे तुम्ही करू शकत नाही. जास्त काही करायची गरज नाही, फक्त सकारात्मक दृष्टीकोन आणि जर मदत लागल्यास आपला कोर्स आणि कन्सल्ट आहेतच. मी हे जे सांगत आहे ते इतक्या लोकांच्या अनुभवातून सांगत आहे, अनुभवला पर्याय नाही आणि तेच वास्तव आहे.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Comments