आयुष्य जगणे सोपे आहे, फक्त पुढील नियम फोलोव करा :

१) दररोज ध्यान करा, कमीत कमी वेळ १० मिनिटांचा ठेवू शकता आणि श्वासावर लक्ष केंद्रित करण्यापासून सुरुवात करू शकता


२) व्यायाम जिथे तुमच्या शरीराची हालचाल झाली पाहिजे व बेंबीच्या देठ पर्यंत तुमचा श्वास गेला पाहिजे, इथे ज्यांना समस्या असतील तिथे डॉक्टरांचा सल्ला घेवूनच व्यायाम करा.


३) सकस आहर इथे तुम्ही घरच्या आहाराल प्राधान्य द्या, बाहेरील पदार्थ घरी बनवून खाऊ शकता आणि शक्य नसेल तर कधी तारी बाहेरच खाऊ शकता. जे घरापासून लांब राहत आहेत त्यांनी शक्य असल्यास घरी जेवण बनवायचे आणि नसल्यास खानावळ किंवा डब्बा लावायचा.


४) सकारात्मक, मुक्त मनाच्या लोकांच्या सहवासात रहा, एक सारखे ध्येय असलेल्या लोकांच्या सहवासात रहा. प्रगतीच्या दिशेने जाणार्या लोकांच्या सहवासात रहा, संकटात कामी येणाऱ्या लोकांच्या सहवासात रहा. एकमेकांना मदत करणाऱ्या लोकांच्या सहवासात रहा.


५) ज्यांना शक्य आहे ते गुरूंच्या आणि त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ लोकांच्या सहवासात रहा. जिथे तुम्ही कमी पडता तिथे गुरु आणि त्या क्षेत्रातील तज्ञ ती कमतरता भरून काढतात. जिथे आर्थिक व्यवहार किंवा लग्न अश्या गोष्टी येत असतील तर गुरु आणि तज्ञ अश्या दोन्ही लोकांचा सल्ला घ्याल.


६) नकारात्मक लोकांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका, गुरु किंवा तज्ञांनी दोष दाखवणे वेगळे किंवा जवळील व्यक्तीने जिला माहिती आहे तीने दोष दाखवणे वेगळे, ज्या मुळे आपली चुकी समजून आपण तिथे बदल करत आयुष्य घडवत जातो पण नकारात्मक लोक नको. वानवा पेटला तर तिथून पळून जाने योग्य तर तिथे थांबलात तर तुम्ही देखील वणव्यात फसून खाक व्हाल असेच नकरात्मकतेची सवय लागली तर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचे आयुष्य पूर्ण पने पोखरून जाईल.


७) प्रेम, दया आणि करून दाखवा पण मर्यदा ठेवा, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्याला धक्का लागायला नाही पाहिजे.


८) वरील नियम विसरू नका किंवा जीवनशैल बनवा, मानसिकता बनवा, स्वभाव बनवा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


#आकर्षणाचासिद्धांत #संमोहन #रेकी #हिलिंग #मानसोपचार #आत्मविकास

 

Comments