जो पर्यंत तुमच्या मनातून, अंतर्मनातून, अवचेतन मनातून, सुप्त मनातून तुम्हाला जाणवत नाही, जेव्हा कंपने तुम्हाला जाणवत नाही तेव्हा समजून जायचे कि ते काम होणारे नाही, मग ते काम कसलेही असो.
नाशिक मधील प्रसिद्ध रिअल इस्टेट ब्रोकर माझ्या कडे कोर्स संदर्भात आले होते. त्यांचा व्यवसाय अगोदर उत्तम सुरु होता पण नंतर त्या मध्ये गडबड व्हायला सुरुवात झाली.
एक vibes म्हणजे शरीरात जाणवते कि होणार आहे मग ते कसे हि करून होतेच आणि हीच vibes माझ्या ब्रोकर शिष्यामध्ये जवळपास संपुष्टात आली होती. जिथे छोटी कामे आरामात घर चालवत होतीत आणि मध्ये मोठी कामे बोनस सारखे काम करत होते त्यामध्ये पूर्ण अडथळे आले होते.
ते ब्रोकर शिष्य गरिबीतून वर आले होते त्यामुळे क्षमता तर होतीच, पण असे काय झाले ज्यामुळे त्यांच्या vibes नाहीश्या झाल्या?
अजून एक मुंबई मधील ब्रोकर होती तिचा पण सेम प्रोब्लेम. गंडे दोरे केले, नजर उतरवली, कुंडलि, रत्न असे सर्व प्रयोग करून झाले पण समस्या तर वाढत चालली होती. इथे दाखवून दिले जाते ह्या ब्रोकर ने तिच्या परीने बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले हि एक जमेची बाजू निघाली.
एका पेक्षा जास्त शास्त्र काम करत नसतील तर समजून जायचे कि समस्येचे मुळ भेटले नाही, आणि एकदा का समस्येचे मूळ भेटले कि सर्व शास्त्र जादू सारखे काम करतात.
vibes हा शब्द कि छोटा वाटतो ना?
एकदा vibes जागृत करण्याचा प्रयत्न करा मग समजेल. आणि ज्यांचे vibes जागृत आहे पण नको तिकडे जातात म्हणजे जिथे कामाचे नाही तिथे जातात त्याला काहीही अर्थ नाही.
इथे एक उदाहरण देतो, एका व्यक्तीकडे vibes सक्षम होत्या पण जेव्हा त्याच्या vibes जागृत होत्या तेव्हा त्याने नको त्या कामासाठी वापरल्या, करिअर चांगले सुरु होते, त्याचा गर्व वाटून लागला व तो पूर्ण वासने कडे झुकला. ऑफिस मध्ये, नातेवाईक मध्ये इतके काय तर त्याच्या आई ची जवळची मैत्रीण त्यांना देखील सोडले नाही.
म्हणजे जे vibes करिअर कडे द्यायचे होते, सर्वांगीण विकासासाठी वापरायचे होते ते सर्व वाया गेले कारण अतिरेक झाला आणि सोबत गर्व. मग काय प्रकरण हाताबाहेर गेले आणि जवळपास ३ महिने लागले पूर्ण बाहेर काढण्यासाठी आणि त्यापुढे ६ महिने निरीक्षण आणि प्रशिक्षणासाठी गेले तेव्हा कुठे जावून ती व्यक्ती बाहेर पडली.
दुसरी कडे माझ्या एका शिष्याने vibes उत्तम वापरले, तिला पहिल्या नोकरीत सपशेल अपयश आले, वाईट नजरांचा सामना करावा लागत होता, त्यामध्ये देखील माझ्या मार्गदर्शनाखाली राहत दुसरीकडे नोकरी लागली, मालक वडीलांसारखा आणि त्यांची बायको आई सारखी निघाली, व मालकाचा मुलगा भावासारखा व तिला अमेरिकेत घेवून गेला व त्याच्या कंपनीत चांगल्या पदावर कामाला ठेवले.
vibes म्हणजे कंपने योग्य पद्धतीने वापरावी लागतात. जर गर्व आला तर ती कंपने तुमची नुकसान करतात. जिथे तुम्ही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली असता तिथे नुकसान होत नाही, किंवा योग्य लोकांच्या संपर्कात असतात तेव्हा नुकसान होत नाही.
आता वरील ब्रोकर शिष्यांच्या मुख्य मुद्द्यावर येतो.
दोन्ही ब्रोकर पण त्यांना अचानक झाले काय?
माझी एक क्षमता अशी जागृत आहे कि कंपने लगेच ओळखून येतात आणि कोणीही खोटी कंपने निर्माण करून पटवून देवू शकत नाही कारण ती मी लगेच पकडतो, हि क्षमता ह्यासाठी जागृत केली माझ्या एका निर्णयाचा माझ्या शिष्य व त्यांच्या कुटुंबावर प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. दुसरी संधी नाही.
सुरुवातील कोर्स केला, काही फरक नाही, नंतर उपाय उपचार सुरु केले तेव्हा असे जाणवले कि भाडे किंवा विकत दरम्यान जे vibes निर्माण व्हायचे ते निर्माण होणेच बंद झाले आहे. त्यामुळे छोटी कामे देखील होणे मुश्कील झाले होते.
काही दिवस फक्त vibes च्या स्पार्क वर लक्ष केंद्रित केले होते, एक vibes ची ठिणगी फक्त एक ठिणगी समृद्धतेचा वनवा पेटवू शकत होती. मुंबई मधील शिष्याची vibes ची ठिणगी जागृत झाली व तिचे आयुष्य हळू हळू प्रगतीच्या दिशेने सुरु झाले, नाशिक मधील शिष्याची vibes ची ठिणगी एक महिन्याने जागृत झाली व त्याचे देखील आयुष्य पूर्व पदावर यायला लागले.
दीड महिन्यात मुंबई मधील शिष्याच्या आयुष्यात vibes पूर्व पदावर आले व दोन महिन्यांनी नाशिक मधील शिष्याच्या आयुष्यात vibes पूर्व पदावर आले. मुंबई मधील शिष्याने एका महिन्यात ७५ लाख कमावले व नाशिक मधील शिष्याने एका महिन्यात दीड करोड कमावले. त्यांच्या टर्नओव्हर च्या २० ते २५ % दोघेही लांब होते. ते काही महिन्यात अचिव्ह होवून जाईल.
एक्स्ट्रीम फोकस, एक्स्ट्रीम डिसिप्लीन आणि संकटात सातत्य हे गुण मला दिसून आले, मी जे जे ऑर्डर द्यायचो ते ते फोलोव होवून जायचे. बेसिक उत्तम असल्यामुळे मी फक्त ऑर्डर द्यायचो आणि ते फोलोव करायचे.
माझे जे कोर्स आहे तो एक प्रकारे मी आराखडा बनवून देतो जो कायमस्वरूपी शिष्य अंतर्मनात रुजवतात, जीवनशैली निर्माण करतात त्यामुळे मला फरक ऑर्डर द्यायची आहे आणि ते फोलोव होते. जसे विमानाचे डिझाईन तयार आहे फक्त फ्युएल भरायचे असते तसे, जर आराखडा नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही, कच्चा आराखडा, चुकीचा आराखडा आयुष्यात काहीही कामाचा नाही.
एक सरटेन लेव्हल ला गेल्यावर एक समजते कि हि सर्व लोक एक्स्ट्रीम फोकस असतात, सुस्पष्ट ध्येय असते आणि गुरु किंवा तज्ञ लोकांच्या विषयी प्रचंड आदर असतो, इथे डिस्टर्ब माइंड सेट ची लोक तुम्हाला दिसणार नाही.
तुमच्यातील गुण तुम्ही विकत घेवू शकत नाहीत ते तुम्हाला निर्माण करावेच लागणार जसे कि इच्छाशक्ती. ध्येय गाठायचे आहे म्हणजे गाठायचेच आहे.
तुमच्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देत आहे त्याचा वापर करा व आयुष्य बदलून टाका :
१) ध्यान
२) व्यायाम
३) सकस आहार
४) समविचारी भावना व गरज असलेल्या लोकांचा सहवास
५) अफरमेशन : "मी सर्वांगीण समृध्द आयुष्य जगत आहे." सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्याअगोदर कम्पल्सरी, दिवसातून कितीही वेळेस करू शकता फक्त मनापासून करायचे आहे, करायचे म्हणून करायचे असे नाही.
जास्तीत जास्त ३ महिन्यात रिझल्ट येतो आणि जर काही कारणास्तव नाही आला तर कोर्स उपाय व उपचारांसाठी मला संपर्क कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
#आकर्षणाचासिद्धांत #संमोहन #मानसशास्त्र #रेकी #हिलिंग
Comments
Post a Comment