हुशारीने आयुष्य जगायला शिका ज्याला महत्व द्यायचे त्याला द्या


एका व्यक्तीचे कोर्ट केस खूप वर्ष सुरु होते. त्याला समजत नव्हते कि काय करायचे ते. मानसिक स्थिती ढासळत होती, पैसे संपत आले होते, प्रगती थांबली होती व ज्याच्या विरुद्ध केस होती तो आरामात आयुष्य जगत होता.


एक सुप्रीम कोर्टाचा वकील त्यांच्याकडून माझ्याबद्दल समजले, महाराष्ट्र भवनात एकदा भेट झाली होती तेव्हा माझा क्रमांक भेटला. जवळपास ३० लाख रुपये आतापर्यंत खर्च झाले पण परीणाम शून्य आणि करोडोंचे नुकसान, ह्यासाठी मला त्यांना ऑफलाईनच बोलवावे लागले.


३ सेशन झाले संपूर्ण माहिती घेण्यासाठी, समजून घेतले गेले, सर्व महत्वाचे मुद्दे बाहेर आले, हे मुद्दे संमोहन सूचनांची स्क्रिप्ट बनवण्यास कामी येणार होते.


पुढील १० सेशन्स हे स्क्रिप्ट चा सराव करण्यात गेले. त्यांच्यासाठी खरच कठीण कालावधी होता, त्रास झाला पण सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वभाव चांगला, इतरांना त्रास देवू शकत नव्हते मग भले ती समोरील खोटी केस टाकणारी व्यक्ती का असेना. इथे आम्हाल जास्त त्रास झाला.


जग भावनांवर चालत नाही, जर चांगली व्यक्ती भेटली तर तुम्हाला चांगलेच अनुभव देईल आणि वाईट भेटली तर वाईट अनुभव देईल, तुम्हाला व्यक्ती आणि परिस्थिती नुसार बदलावेच लागेल कारण कोर्ट तुमचा स्वभाव बघत नाही तर जे समोर आहे त्यावर काम करते.


दीड महिना कालावधी, त्यामध्ये ५ दिवस अगोदर शेवटचा दिवस ठरवून सर्व सराव जसा च्या तसा करून घेतला, भावनिक दृष्ट्या सक्षम करून घेतले, अनेकदा डोळ्यातून पाणी देखील आले पण कोर्टात हे सर्व काहीच चालत नाही त्यामुळे ह्याचा काहीही फायदा नाही, हा पण पिक्चर मध्ये हे सर्व भावनिक नाटक चालते.


वास्तव जगतात खालायक जिंकतो नायक नाही. - अश्विनीकुमार


दीड महिना, १ लाख खर्च, प्रचंड मानसिक मेहनत आणि त्याचे फळ असे कि सरळ केस अशी जिंकली गेली कि परत समोरील व्यक्ती कुठेही प्रतिदावा करू शकत नव्हती. कारण इथे एक चूक सर्व मेहनत पाण्यात घालवू शकत होती आणि ती चूक करण्याची जागाच मी सोडली नाही.


जी चांगली व्यक्ती होती आज तिने मला गुरु मानले आहे, तिला समजले कि आजू बाजूला लोकांची गरज आहे, प्रोपर टीम बनवून दिली, जेणे करून त्या व्यक्तीपर्यंत काहीच पोहचत नाही व समस्या अगोदरच इतर लोक सोल्व्ह करून टाकतात.


तुम्हाला तुमची कमतरता समजली पाहिजे, दूर करता आली पाहिजे नाहीतर रिप्लेस करता आली पाहिजे, आणि जर ह्यामध्ये चुकलात तर तुम्हाला ह्याची तुमच्या आयुष्यात मोठी किंमत चुकवावी लागू शकते. - अश्विनीकुमार


अनेक वर्षांची केस एका हिअरिंग मध्ये संपली, सहसा आयुष्यात भले काहीही असो माझ्या ओळखीचे जे वकील आहेत ते इतका त्रास देत नाही जितका त्या समोरील व्यक्तीच्या वकिलाने दिला, तडजोड करता आली पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. आणि वकील योग्य सल्ला देवून तडजोड करून पुढे जातो दोघांचा फायदा, इथ काही नैतिक अनैतिक नाही, ज्या जसे वागायचे आहे तो तसेच वागणार .


तुम्ही तुमच्या आयुष्यातील समस्यांना घाबरू नका, बिनधास्त सामना करा. जे ध्येय साध्य करायचे आहे त्याच दिशेने जा, जर तुम्हाला शक्य नाही तर मला संपर्क करू शकता.


• आपल्या क्षमता आणि कमतरता ओळखा व त्यावर काम करा.


• सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.


• सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहा.


• तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहा.


• ध्यान करा.


• व्यायाम करा.


• आहार उत्तम ठेवा.


• आयुष्य सोपे आहे, कठीण करू नका.


धन्यवाद

संमोहन तज्ञ अश्विनीकुमार

Comments