तुमची आत्मविकासाची शक्ती जागृत करा


 आत्मविकास तुमच्या अंतर्मनातील अद्भुत क्षमता जागृत करण्याची चावी आहे. तुमची मानसिकता सकारात्मक होते, भावनिक दृष्ट्या जागृत होता आणि वास्तवात तुम्ही तुम्हाला जसे पाहिजे तसे आयुष्य घडवून आनंदाने जगता. आत्मविकासाची अद्भुत शक्ती जागृत करण्याचा प्रवास हा दररोजच्या लहान कृतीने होतो. तुम्ही दररोज सकारात्मक आयुष्य जगता, ध्यान करता, व्यायाम करता, आर्थिक दृष्ट्या सक्षम होता, कौटुंबिक आयुष्याचा आनंद घेतात, नकारात्मक लोक आणि परिस्थिती पासून लांब राहता. कालांतराने ह्या दररोजच्या कृती तुमच्या सामान्य आयुष्याचे परिवर्तन भाग्यशाली चमत्कारिक अद्भुत अध्यात्मिक आयुष्यात करते.


पहिले मानसिकता तयार करा कि मला चमत्कारिक आणि भाग्यशाली आयुष्य घडवण्याच्या दिशेने प्रवास सुरु करायचा आहे. एकदा का मानसिकता तयार केली कि तुम्ही ध्येयाच्या मध्ये कितीही समस्या का आल्या तुम्ही त्यावर मात करत ध्येय साध्य करता, मध्ये तुम्ही हार मानत नाही. तुम्ही नव नवीन कौशल्य शिकता, साधना शिकता, संमोहन, आकर्षणाचा सिद्धांत, रेकी हिलिंग शिकता, आत्मविश्वास वाढत जातो, दररोज तुमचे छोटे ध्येय साध्य होत जातात व कालांतराने तुम्ही मोठ मोठे ध्येय साध्य करत जातात. कल्पना करा ह्या लहान स्टेप्स तुम्हाला कश्या चमत्कारिक आयुष्याच्या दिशेने घेवून जातात ते. 


तुम्ही तुमची नकारात्मक चौकट मोडता. नकारात्मक कंम्फर्ट झोन बधून बाहेर पडता व सकारात्मक अमर्याद ब्रम्हांडाचा प्रवास सुरु करता. तुम्हाला अपयशाची भीती वाटत नाही, अपयशापासून तुम्ही शिकता, तुम्ही सकारात्मक लोकांच्या संपर्कात राहता, योग्य पुस्तके वाचता आणि स्वतःची काळजी घेण्याला महत्व देता.


सकारात्मक आयुष्य घडवण्याचा प्रत्येक प्रयत्न तुमच्या जीवनाच्या सर्व पैलूवर परिणाम होतो, तुमचा सर्वांगीण आत्मविकास होतो, प्रत्येक प्रयत्नाचा दुप्पट परिणाम होत जात असतो. तुम्ही सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगता. दररोज चमत्कारिक भाग्यशाली आयुष्याच्या दिशेने जात जा, सातत्य ठेवा आणि बघा कि कसे तुम्ही विकसित होत जाता, घडत जाता ते. भविष्यातील तुमचे स्वरूप हा वर्तमानातील तुमच्या ह्या स्वरूपाचे आभार मानेल.


एकट्याने प्रयत्न करा आणि नाही झाले तर तज्ञ किंवा गुरूंची मदत घ्याल पण काहीही झाले तरी नकारात्मक आयुष्याचा आराखडा पूर्णपणे मोडून सकारात्मक आयुष्याच्या आराखडा तयार करा.


बिनधास्त प्रयत्न करा, तुम्ही आरामात करू शकता आणि चमत्कारिक भाग्यशाली आयुष्य जगू शकता.



धन्यवाद

अश्विनीकुमार

८०८०२१८७९७


आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग


Image by SabFrei from Pixabay

Comments