सकाळी जाग येण्या अगोदर जेव्हा तुम्ही जागृत होता तेव्हा लगेच "आजचा क्षण सकारात्मक आहे." "आजचा दिवस सकारात्मक आहे." "माझी जीवनशैली सकारात्मक आहे." हे विचार मनात आण व जास्तीत जास्त वेळ पकडून ठेवण्याचा प्रयत्न करा मग बघा कसा चमत्कार घडतो तुमच्या आयुष्यात. लगेच सकारात्मक विचारांना कृतीत उतरवत जा. लगेच ध्यान करा, व्यायाम करा, दररोज जे काम करायचे आहे ते लिहून ठेवा, ध्येय स्वप्न लिहून ठेवा आणि ते लिहितांना अतिरेकी कल्पनांचा वापर नका करू, वास्तववादी ध्येय स्वप्ने लिहून ठेवा व त्या दिशेने कृती करत जा. फक्त हाच क्षण नाही तर तुम्ही जीवनशैलीच सकारात्मक कराल. चमत्कारिक आयुष्य जगणे खूपच सोपे आहे. जितके सोपे ठेवता येईल तितके सोपे ठेवा, विनाकारण भविष्यात हे होईल ते होईल अश्या कल्पना वापरू नका, फक्त वर्तमानात आयुष्य जगा.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments
Post a Comment