आकर्षणाचा सिद्धांत तुमचे आयुष्य कसे बदलतो

 शिष्याच्या वास्तव अनुभवावर आधारित


नाव बदलले आहे. वास्तव घटना आहे, तुम्हाला वाईट वाटू शकते, जर हळवे असाल तर वाचू नका. त्रास तो त्रासच असतो ना कमी ना जास्त. ज्याचे जळते त्यालाच कळते.

श्रुती पुण्याची स्थानिक रहिवासी. घरी आई आणि लहान बहीण, बहीण फक्त एक वर्षाने लहान. वडील ३ वर्षांपूर्वी गेले. वडीलांनी बायको व मुलींसाठी आर्थिक तजवीज करू ठेवली होती. एकटी स्त्री किंवा पुरुष म्हणजे आई किंवा वडीलांनी ह्यांनी मुले वाढवणे सोपे नसते. आई आणि दोन्ही मुली प्रोपर आयुष्य जगत होत्या पण मध्ये काय झाले माहिती नाही जी लहान मुलगी होती ती वाईट वळणावर गेली. एक वाईट परप्रांतीय मुलाच्या संपर्कात आली, त्या मुलाचे घरी येणे जाने होते, असे दाखवत होता कि खरेच प्रेम करतो व सर्वां सोबत अतिशय प्रेमाने वागत होता. तो कॉलेज ला नव्हता पण अभ्यास करत आहे म्हणून एका खोलीत दरवाजा बंद करून बसत होते. एक सुसंकृत पारंपारिक घर, तिथे ड्रग्स आणि सेक्स सुरू झाले होते पण कुणाला माहिती नव्हते कारण आंधळे प्रेम आणि विश्वास, हे सर्वांच्याच घरी असते.

पुढील घटना विस्तृत नाही सांगणार फक्त मुख्य मुद्दे

मुलाचे वडील मोठे व्यवसायिक दाखवणे. २, ५ लाख करत ३० लाख घेणे म्हणजे फसवले. चाळ असो किंवा झोपडपट्टी काही अगदी स्वच्छ असतात तर काही खूपच अस्वच्छ असतात तर ती लहान बहिण लग्न करून अस्वच्छ चाळीत त्या मुलासोबत राहू लागली, तिचे व्हिडीओ इंटरनेट वर आले ते मोठ्या बहि‍णीने खाजगी कंपनीला काही लाख देवून पूर्ण काढून टाकले व कसे तरी बहि‍णीला तंबी देऊन तिला अश्या गोष्टी करण्यापासून रोखले. बहीण शेवटी परप्रांतीय नवर्‍या सोबत त्याच्या जिल्ह्यात निघून गेली व ह्यांनी संबंध तोडले.

हे प्रकरण ५ वर्षे सुरू होते. आपले आयुष्य म्हणजे सिनेमा नाही तर काहींना १०, २० वर्षे नकारात्मकता सहन करावी लागते, आयुष्यात निर्णय घेणे सोपे नसते. प्रचंड मानसिक ताण आला, कोणीही मदतीला नाही ना नातेवाईक, ना समाज म्हणून मी बोलत असतो आपण भले व आपले घर भले व आपल्या पाठीशी संकटात खंबीर पाने उभी असलेली एक व्यक्ती किंवा कुटुंब देखील पुरेसे आहे. ह्यामध्ये आई दोन वेळा हॉस्पिटल मध्ये एडमिट झाली होती आणि घरी आले तरी सुख नाहीच कारण इतक्या सुंदर घरात अचानक अतिशय वाईट घटना घडल्या होत्या.

जेव्हा लग्न करायचे होते तेव्हा श्रुतीने माझी जाहिरात बघितली व कन्सल्ट करायचे ठरवले. नंतर समुपदेशन सुरु झाले, हळू हळू बदल दिसायला लागला. मानसिकता बदलायला लागली, चेहर्‍यावरची चमक परत आली. आई मध्ये देखील मुलीकडे बघून समाधानाचे भाव यायला लागले, आईने स्वत:ची लहान मुलगी स्वत: पासून कुटुंबापासून योग्य करणे दूर केली होती त्यामुळे तो त्रास तर होताच पण त्यामधून बाहेर पडणे गरजेचे होते त्यासाठी श्रुतीचे आयुष्य चमत्काराने भरलेले असले गेले पाहिजे होते आणि चैलेंज त्यांच्या पेक्षा माझ्यावर आले होते कारण मा‍झ्या कडून एक चुकी एक कुटुंब उध्वस्त करून टाकेल. एका पाठोपाठ एक आघात कोणीही सहन करू शकत नाही, कुठे तरी मर्यादा असतात.

श्रुती आणि तिची आई थोडे व्यवस्थित झाल्यावर श्रुती ने ठरवले कि आता ती आकर्षणाचा सिद्धांत हा कोर्स करू शकते. सकारात्मक विचार, भावना कंपने आणि ऊर्जा श्रुतीने लगेच शिकून घेतले. श्रुती लगेच का शिकू शकली? कारण तिचे अगोदर समुपदेशनाचे सेशन झाले होते म्हणून. बघा उपचारांचा किती फायदा होतो ते.

श्रुती विचार भावना कंपने आणि ऊर्जा प्रोपर निर्माण करू लागली, छोट्या छोट्या गोष्टी आणि घटना आकर्षित करू लागली. ती एका ठिकाणी १० हजाराची नोकरी करत होती तिथून तिला ४० हजाराच्या नोकरीची ऑफर आली व तिने ती स्वीकारली. असे करत श्रुती चे आयुष्य बदलू लागले. आई आणि मुलीचे सर्वांगीण आयुष्य सुधारू लागले व घरात पहिल्या सारखे वातावरण निर्माण झाले. आता श्रुतीने लग्नाचा विचार केला पण तिला आई ला एकटे सोडायचे नव्हते, घरात इतक्या मोठ्या समस्येला तोंड दिल्या नंतर मुलगा असो किंवा मुलगी कुणालाही जास्त प्रमाणात काळजी वाटणारच.

जर आपण सतत काळजी करत राहिलो तर ब्रम्हांड जे नको पाहिजे तेच आयुष्य आकर्षित करून देईल कारण नकळत आपण त्याच आयुष्याचा विचार सतत करत असतो. म्हणून कधीही चिंता काळजी भीती भावना मनात ठेवायच्या नाही, साठवायच्या नाही, नकारात्मक भावना वाहू द्यायच्या किंवा समुपदेशन करू मुक्त करून टाकायच्या नाहीतर नकळत तुम्ही तुम्हाला जे आयुष्यात नाही पाहिजे ते तुम्ही आकर्षित कराल.

श्रुती रीलेक्स झाली व तिच्या लग्नाच्या आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करू लागली, भावना निर्माण करू लागली, आभार व्यक्त करू लागली. श्रुती मागतांना कधीही फिक्स हेच पाहिजे असे मागत नव्हती किंवा कुठलाही अतिरेक केला नव्हता आणि नाही आई ची काळजी मध्ये आणली आणि बघता बघता एक मुलगा आकर्षित झाला, त्याचे नाव शुभम पकडू, भारतात ज्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे त्या सर्व जुळून आल्या, फक्त वय ६ महिने कमी होते, नोकरी २० हजारांची होती पण श्रुतीने जे आयुष्य बघितले त्यावरून तिला समजले कि व्यक्तीचा स्वभाव महत्वाचा आहे ना कि इतर गोष्टी. शेवटी छोटेच लग्न केले. अजून चमत्कार व्हायचे थांबले नाही.

शुभमचे आई वडील कोरोना काळात गेले होते. तो स्वभावाने खूप चांगला मुलगा आहे आणि ही २० हजाराची नोकरी लागण्या आधी त्याला खूप जास्त पगार होता पण मध्ये लेओफ होते त्यामध्ये नोकरी गेली व परत मिळाली नाही, पण हा मुलगा मेहनती होता, ओला उबर चालवली, डिलिव्हरी केली, ह्या ले ऑफ मध्ये त्याच्या जवळच्या मित्राने आत्महत्या केली होती, जो मित्र त्याला घरचा सदस्य असल्या सारखा सांभाळायचा त्यामुळे शुभम अजून नैराश्यात गेला होता. जेव्हा कोणी नसते तेव्हा आयुष्य जगणे खूप वेगळे असते.

ह्या परिस्थिती मधून शुभम गेला, स्वभावाने खूप चांगला आणि त्या सोबत त्याला आयुष्यात चांगली लोक भेटत गेली नाहीतर इथे नेहमी उलटे होते, चांगल्यांना धूर्त आणि वाईट मिळतात व सर्व ओरबाडून टाकतात, हे वास्तव आहे. आपले आयुष्य काय सिनेमा नाही आहे. स्वभावाने चांगल्या लोकांचा फक्त वापर करू घेतला जातो आणि वाईट लोकांना डोक्यावर घेतले जाते. एखाद्याचे चांगले सुरु असेल तर त्याचा विश्वासच नसतो कि दुसरी व्यक्ती कदाचित नकारात्मक आयुष्य फेस करत असेल. म्हणजे फक्त स्वत:च्या अनुभवानेच अश्या व्यक्ती जगत असतात, जर बर्फाळ प्रदेशात असतील तर त्यांना वाळवंट माहितच नसते किंवा ते तसे समजूनच घेत नाही.

शुभम एक शेवटची फूड डिलिव्हरी करत होता व त्या दिवशी त्याला काही खाता ही आले नाही, उपाशी पोटी काम करत होता आणि ही डिलिव्हरी रात्री होती आणि त्या व्यक्तीच्या घरी त्याचा आई ला हृद्य विकाराचा तीव्र झटका आला होता व त्या वेळी शुभम सर्वकाही सोडून त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेला व पुढील १२ तास सर्व शांत होईपर्यंत शुभम तिथेच थांबला. हे सिनेमातील नाही तर वास्तव आयुष्यातील चांगल्या लोकांचे अनुभव सांगत आहे. सिनेमा फक्त ३ तासाचा असतो.

लग्न होण्या अगोदर शुभम च्या चेहर्‍यावर एक चिंता श्रुतीला दिसत होती व तो तिला काही सांगत नव्हता, श्रुतीने माझा नंबर दिला व समुपदेशन करून घेतले. इथे मुख्य प्रश्न आले ते म्हणजे कमी पगार तर वैवाहिक जीवनात काही समस्या तर निर्माण होणार नाही ना? मी सांभाळू शकेन का? सेक्स चा अनुभव नाही तर मी खुष ठेवू शकेन का? जर कोणी इतर व्यक्ती आवडायला लागल्यास परत मी एकटा होणार का असे विविध प्रश्न भंडावून सोडत होते.

कोणीही कितीही इंटरनेट वगैरे बोलले, काळ बदलला बोलले तर ह्याचा अर्थ असा नाही कि सर्व फक्त सेक्स आणि विवाह बाह्य संबंध ह्याच्याशी निगडीत आहे म्हणून. भारतातील तरून, तरुणी अजूनही चांगल्या संस्कारात आहेत. आपण भले व आपले घर भले व आपले काम भले.

लग्नानंतर सर्वकाही उत्तम चालू लागले, शुभम श्रुतीच्याच घरात राहू लागला. घर घेणे घर भाड्याने घेणे शक्य नसते वास्तवात, सर्व आप आपल्या आर्थिक परिस्थिती नुसार आयुष्य जगत असतात आणि समजूतदार लोक अशी सुंदर तडजोड करतात. त्यांना अगोदरच सांगीतले होते सर्व सामाजिक दबाव सोडून द्या आणि स्वत:चे बघा व तुमच्या आजूबाजूला असलेल्या चांगल्या लोकांच्या सहवासात रहा आणि त्यामुळे हे सर्व सुरळीत घडून आले.

शुभम ने ज्या व्यक्तीच्या आईला हॉस्पिटल मध्ये नेण्यासाठी मदत केली होती ती ऑइल इंडस्ट्री मध्ये मोठ्या पदावर होती व त्याच्या मित्राने सेम इंडस्ट्री मधील उच्च पदाचा जॉब सोडून स्वत:ची कंपनी सुरू केली होती व त्या एका ओळखीच्या व्यक्तीची सक्त गरज होती कारण सुरुवाती पासूनच त्याच्याकडे मोठी कामे आली होती. इथे शुभम ला जॉब मिळाला व दोन टायटल वर काम करायला लागले.

शुभमला ८० लाखाचे पेकेज मिळाले आणि महिन्यातून दोनदा दुबई मधील ऑफिस मधून काम करावे लागेल आणि बाकी वेळ घरातून. एक सुटकेचा निश्वास खूप वेळ शुभम श्रुतीसमोर रडत बसाल होता कारण जे शक्य वाटतच नव्हते ते शक्य झाले. पूर्ण आयुष्य बदलून जाणार होते आणि आयुष्य बदलले.

आपल्या आजूबाजूला गैर मार्गाने संपत्ती कमावणारे खूप आहे आणि त्यांची संपत्ती ही करोडोंच्या घरात जाते, पण जे सरळ मार्गी आणि इनामदार आहे त्यांची एक रुपयाची कमाई देखील खूप आहे आणि इथे फक्त कमी नसते तर आयुष्य जगण्याचा दर्जा देखील असतो. ह्यामुळे माझ्यासाठी शुभम ची झेप ही मा‍झ्या आयुष्यातील एक मोठी झेप आहे, मी मा‍झ्या आजूबाजूच्या संपर्कात येणार्‍या लोकांमध्ये सेलिब्रेटी बघतो, प्रेरित करणारे बघतो. ह्या मध्ये सर्व डॉक्टर, इंजिनीअर, प्लम्बर, रिक्षा चालक, खानावळ चालवणारा अशी सर्वसामान्य लोक आहे आणि ह्यापैकी काही प्रचंड यशस्वी झाली आहेत.

आपल्या आजूबाजूला अशी चमत्कार घडवणारीही लोक खूप आहेत फक्त तुम्हाला अश्या लोकांच्या संपर्कात रहायचे आहे, चमत्कार कल्पना नाही तर वास्तव आहे.

आज श्रुतीने नोकरी सोडली त्याचे कारण प्रेम आहे. कोणीही तिला सांगीतले नाही पण तिने ठरवले कि नवऱ्याची काळजी घ्यायची आणि कुटुंब सांभाळायचे. प्रेम म्हणजे तडजोड वगैरे काही नाही जे मनापासून शुद्ध भावनेने होते ते प्रेम. कठीण परिस्थिती मध्ये श्रुतीने खूप काही झेलले व शुभम ने देखील व तिच्या आई ने देखील व ज्या कठीण काळात कुटुंबाला जोडून होते ते फक्त प्रेम ना कि पैसा वगैरे. भारतातील स्त्रिया कुटुंब देखील सांभाळता, मोठ मोठे अधिकारी देखील घडवतात, उद्योजक व्यवसायिक देखील घडवतात आणि वेळ पडली तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी देखील उचलतात म्हणून प्रत्येक घरात आईला खूप महत्व आहे. मग आई काम करणारी असो किंवा घर गृहिणी. एखाद्याच्या घरातील नकारात्मक अनुभव सर्वांना लागू होत नाही.

एकट्या श्रुतीने तिचे आयुष्य उभे केले, ज्या वयात काही मुलं मुली मौज मजा करतात तिथे श्रुतीच्या आयुष्यात संकटे आली होती व ती तिचा सामना करत होती. ह्या बोलतात क्रिएशन. अश्या अनेक धाडसी मुली आणि स्त्रिया आहेत आपल्या आजूबाजूला पण ह्यांच्या बद्दल कोणीही बोलत नाही, फक्त जे सीने कलाकार, खेळाडू आणि राजकारणी आहेत त्यांच्या बद्दल बोलले जाते म्हणजे १४० करोड मध्ये फक्त थोड्याच लोकांची माहिती सतत दिली जाते ना कि आपल्या आजूबाजूला असणार्‍यांची. काही स्त्रिया इतक्या वाईट परिस्थिती मधून गेल्या आहेत कि एकूणच काटा यायचा, ह्या वेळेस समाजाची आणि व्यवस्थेची काळी बाजू पूर्णपणे उघडी पडते.

आज जे श्रुतीने केले आहे जे शुभम ने केले आहे ते तुम्ही देखील करू शकता. खाली काही पॉइंट देत आहे ते तुम्ही फोलोव करा :

१) ध्यान करा. श्वासावर लक्ष द्या, पुरेसे आहे.
२) व्यायाम करा. 
३) घरचा आहार घ्या, कधीतरी बाहेर खाल्ले तर चालेल.
४) सकारात्मक लोकांच्या संपर्कात रहा.
५) तज्ञ, गुरूंच्या संपर्कात रहा पण तपासा कि तुमची प्रगती होते कि नाही , प्रगती होत नसेल तर तज्ञ किंवा गुरु बदला, सुरुवातीला जास्त पैसे खर्च करू नका.

आकर्षणाच्या सिद्धांताचा सराव

१) डोळे बंद करून प्रार्थना करा "मी सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगत आहे."
२) ब्रम्हांडाचे आभार माना, सर्वांचे आभार माना
३) तुम्हाला मिळाले आहे ह्यावर विश्वास ठेवा.
४) संपूर्ण दिवस आनंदाने जगा.

इतके सोपे आहे, तुम्ही करू शकता, स्वत:वर विश्वास ठेवा, जर तुमच्याने शक्य नाही झाले तर मी आहे पण पहिले प्रयत्न तरी करा, सकारात्मक आयुष्य जगणे सोपे आहे आणि नकारात्मक आयुष्य जगणे कठीण आहे.

धन्यवाद
अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७

Comments