सर्वकाही जुळून येते


 एक व्यवसायिक मोठ्या क्लाइंट च्या संपर्कात येण्याची वाटत बघत होता आणि तो क्लाइंट येतोच, काहींच्या आयुष्यात त्या सारखे किंवा त्यापेक्षा मोठे क्लाइंट येतात. नाही अडवू शकत कोणी, जास्तीत जास्त इतर प्रगती बघू शकतात, भले कितीही नजर लावण्याचा मंत्र तंत्र करण्याचा प्रयत्न कराल अश्या अवस्थेत सर्व फेल जाते.


एक शाळेत देखील आरामात पास होत जायचा आणि उच्च पदवी पर्यंत अगदी आरामात पास होत जातो.


एक नोकरीला लागतो व जेव्हा जेव्हा नोकरी बदलतो तेव्हा तेव्हा अजून चांगली ऑफर येत जाते.


एक व्यक्ती असे आयुष्य जगत असतो कि तो ऋतू नुसार बदलणारे आजार सोडले तर आजारीच पडत नाही.


एक व्यक्ती कशीही वागली तरी तिला आरामात समाजात आदर मिळत जातो.


एक व्यक्ती फक्त २ ते ४ तास काम करून हजारो आणि लाखो कमवत जाते.


एक व्यक्ती आरामात जगातील कुठलीही भाषा शिकून शकते.


एक व्यक्ती आरामात जगातील कुठलही डान्स शिकू शकते.


एक व्यक्ती आरामात कुठलाही जोडीदार आकर्षित करू शकतो मग तो लग्न झालेला का असेना.


हा जो आरामात शब्द वापरला आहे ती त्यांची जीवनशैली आहे, इथे तुम्ही कितीही काहीही करा अश्या लोकांचे काहीही नुकसान करू शकत नाही. अगदी आरामात म्हणजे अगदी आरामत हे सर्व व्यक्ती आयुष्य जगत असतात आणि तिथे मी दुसरीकडे विरोधाभास देखील बघितला आहे.


हि अवस्था काहींची जन्मजात असते तर काहींना हि अवस्था जागृत करावी लागते. हि अवस्था जागृत करायला कमीत कमी २ वर्षे ते नीट वापरायला १२ वर्षे लागतात.


काही तंत्र मंत्र उपाय आहेत त्यांनी देखील होतो पण तिथे किंमत मोजावी लागते. खुप कमी प्रमाणात किंमत मोजली जात नाही, करणार्‍याच्या शक्तीवर अवलंबून असते.


इथे मी दुसरीकडे एक एक रुपयासाठी लोकांना प्रचंड मेहनत करावी लागते तिथे दुसरीकडे काहींना आरामात भेटत जाते. एक पर्याय आहे कि तुम्ही प्रयत्न करू शकता तशी शक्ती जागृत करण्यासाठी आणि एक महत्वाचा मुद्दा राहिलाच तो पुढे सांगतो.


मी ज्या लोकांचे अनुभव सांगितले आहेत ना त्यांच्यात जन्मजात होती, काहींची जागृत झाली आणि काहींनी जागृत करून घेतली. इथे आपल्याला ३ गट दिसले, आणि जास्तीत जास्त समस्या हि तिसर्‍या गटात आढळून आली. तिसरा गट हा अति आनंद, अति उस्ताह, अति गर्व, आणि अति शॉक लागल्यामुळे ९८ % लोकांनी जागृत केलेली शक्ती घालवून टाकली किंवा त्या शक्तीने त्यांना पूर्ण संपवले.


ट्युनिंग असणे, एकरूप होणे म्हणजे देवाशी एकरूप झालो तर काही दानवी शक्तीशी एकरूप होतात, रेकी हिलिंग कुंडलिनी मध्ये ऊर्जा जुळून येणे, संमोहनात अंतर्मनाशी एकरूप होतात, आकर्षणाच्या सिद्धांतात कंपने जुळून येतात, ब्रम्हांडाशी ट्यून होतात हे सर्व यात आले. आता तुम्हाला समजायला सोपे गेले असेल.


अश्या व्यक्ती प्रत्यक्षात देखील बघितल्या आहेत भेटलो आहेत आणि इतरांकडून अनुभव देखील ऐकले आहेत. एकदा का तुम्हाला असा अनुभव आला तो पकडून ठेवा व त्याचा फायदा उचला, अतिविचार करू नका आणि कृती करायला वेळ दडवू नका, इथेच तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल व तुम्ही कायमस्वरूपी सर्वांगीण समृध्द आयुष्य जगाल.


तुम्हाला असे अनुभव आले आहे?

तुम्ही असे आयुष्य जगत आहात?

तुमच्या सानिध्यात अशी व्यक्ती आली किंवा येवून गेली आहे?


मेसेज द्वारे तुम्ही तुमचे अनुभव शेअर करू शकता. 


धन्यवाद


अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग


Image by Gerd Altmann from Pixabay

Comments