असे पकडू कि मी जी उदाहरणे सांगत आहेत त्यांचे सातत्याचे अनुभव हे कमीत कमी २ वर्षांचे आहेत पण जास्तीत जास्त गिनती नाही.
एक उदाहरण आठवत आहे, जेव्हा मी ऑफलाईन कोर्सेस घ्यायचो तेव्हा एक स्त्री माझ्याकडे शिकायला आली होती ती देखील पुण्यावरून, डोळ्यात नैराश्य, नवऱ्याला सोडून दिले कारण मारत होता, लग्न टिकले नाही, हे मी इथे थांबवत आहे आणि पुढचे नीट वाचा.
काहींचे वैवाहिक आयुष्य उत्तम सुरू होते तर काहींचे नाही, काहींचे मध्येच बिघडते तर काहींचे शेवटपर्यंत सुरळीत चालते, काहींच्या आयुष्यात विवाहबाह्य संबंध निर्माण होतात तर काही एक पती पत्नी व्रता आयुष्य जगतात, काहींच्या आयुष्यात छोटे मोठे गुन्हे घडतात तर काहींच्या जीव जाई पर्यंत गुन्हे घडतात, त्यामुळे सर्वांना एक नियम लागू होत नाही, चुकीचा सल्ला कुणाचे वैवाहिक आयुष्य किंवा जीवन संपवू शकतो. जसे तुमचे आयुष्य चालू आहे जरुरी नाही कि दुसरी व्यक्ती देखील त्याच मार्गाने जात असेल म्हणून.
मोल मजुरी टाईप काम पण कारखान्यात, शिकलेली, इंटरनेट उत्तम वापरू शकत होती, पगार कमी पण स्वतःचा खर्च भागवण्यासाठी खूप मेहनत करावी लागत होती.
माझी फी जास्त असूनही तरीही ती स्त्री आली, तिची अवस्था बघून पाहवत नव्हते, माझ्याच मनात अनेक प्रश्न निर्माण होत होते, करणार कि नाही, परत फी कशी देईल वैगैरे. पण सुरुवात झाली, पहिल्या सेशन नंतर आर्थिक कारणामुळे २ महिन्यांचा गेप पडला, पण ती जेव्हा आली तेव्हा तिच्यात प्रचंड बदल दिसून आले.
माझ्याकडे ज्या स्त्रिया किंवा मुली यायच्या त्या सर्वांना कुटुंब असायचे म्हणजे एक आधार असायचा पण हिचे असे कोणीही नव्हते आणि तिने माझ्यावर विश्वास दाखवला, जर माझ्या जागी दुसरा कोणी असता तर? सहसा मी कुणाला इतके धाडस दाखवायला सांगत नाही कारण मला माहिती आहे जग कसे आहे ते आणि किती गुन्हे ह्या समाजात दडलेले गेले आहेत ते.
लापता लेडीज सिनेमा चांगला आहे पण माहिती अधिकार टाकून बघा कि वास्तवातील लापता लेडीज कोण कोण कसे कसे आहे ते, सिनेमा आणि वास्तव आयुष्य ह्यात फरक आहे. सिनेमा ने कधीही प्रोस्ताहित होऊ नका. इथे कितीतरी श्रीमंत आपल्या मुलींना शोधू शकले नाही तर सामान्य लोकांची काय अवस्था.
परत मुद्द्यावर येवू
मी दुसरे सेशन आणि कोर्स चा टप्पा अजून विस्तृत ठेवला जेणेकरून त्या स्त्री ने जी झेप घेतली आहे ती अजून टिकून रहावी आणि चमत्कार पुढील टप्पा लवकरच आला कारण तिने त्याच ठिकाणी २ कामे करायला घेतली त्यामुळे आर्थिक परिस्थिती बदलली.
जस जसे महिने पुढे जावू लागले तस तसे त्या स्त्री चा आत्मविश्वास वाढत जावू लागला, सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊ लागला, एकाग्रता वाढली, धाडस वाढत गेले, ध्यान आणि व्यायाम ह्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहू लागले, आर्थिक साक्षरता वाढवली तर त्यामधून तिला पैसे येण्याचे, निर्माण होण्याचे नव नवीन मार्ग निर्माण होऊ लागले.
जेव्हा ती दोन वर्षांनी आली होती जी बुजलेली स्त्री होती तिला संकटे असलेल्या मोठ्या संधी दिल्या कि लगेच तिचे डोळे चमकायचे म्हणजे धाडस प्रचंड निर्माण झाले होते. कुठे ती स्वतःला एकटी समजायची आणि कुठे जगच तिच्यासाठी निर्माण झाले असे वागू लागली.
आता तुम्ही विचार कराल कि ती एकदम अब्जोपती झाली असे असे काही नाही, पण जे काही २ रूम आणि एक दुकान निर्माण केले ते तिच्यासाठी संपत्ती आणि अशीच संपत्ती अनेकांकडे असते पण ह्या अति प्रोस्ताहित, भ्रमित दुनियेमुळे लोक हातातील काढून पळत्याच्या मागे जातात. आणि जे २ रूम आणि दुकान होते ते काही अति उच्च वसाहतीत नाही तर सामान्य वसाहतीत. आणि जितके लोन होते त्यापेक्षा जास्त कमाई होती.
एक व्यक्ती आयुष्यात आली जिला कधी काळी एका मुलीने प्रेमाचे नाटक करून विनयभंगाची धमकी देवून फसवले, पैसे आणि व्यवसाय पूर्ण गेला, त्या व्यक्तीने परत झेप घेतली पण त्या व्यक्तीला मानसिक झटका बसला होता, दोघांची ओळख झाली होती, दोघांना रिलेशनशिप चा फोबिया तरीही सुत जुळले, सध्या तरी लिव्ह इन मध्ये राहत आहेत आणि त्यांचे सर्व व्यवस्थित सुरु आहे.
मला कधी कधी माझे बोलणे सोपे वाटते पण अश्या स्त्री चे स्ट्रगल बघतो तर मला इतके माहिती आहे कि मी तिच्या जागी असो असतो तर माझ्याने शक्य झाले नसते. पण अशीच लोक मला एक ओळ पटवून देतात त्यांच्या आयुष्याच्या अनुभवाने ते मी खाली देत आहे.
"सर्वकाही शक्य आहे, तुम्ही करू शकता आणि हे खरच सोपे आहे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तुम्हाला फक्त सातत्य ठेवायचे आहे." अश्विनीकुमार
एक सांगतो कि तिचा औरा आणि तिच्या डोळ्याची चमक सर्वकाही सांगून जाते.
अश्विनीकुमार
आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग
Image by AIDA FERNANDEZ from Pixabay

Comments
Post a Comment