जर तुम्हाला समस्या माहिती नसेल आणि जर तुम्ही कोणतेही उपाय करायला लागलात तर समस्या अजून चिघळत जाते


 काल एक फोन आला होता ज्यामध्ये त्या स्त्री ने समस्या सांगितली आणि त्या स्त्री ने कोर्स केला होता रेकी हिलिंग चा. समस्येचे मूळ हे रेकी हिलिंग शास्त्रामध्ये नव्हतेच तर वाईट शक्तींचा वापर करून वश केले गेले सोबत मारण क्रिया सारखी एक क्रिया केली गेली होती. जेव्हा कन्सल्ट केले आणि त्यानंतर ओम मंत्राचा वापर रेकी हिलिंग शास्त्रात करून तिचे सर्व चक्र सुरळीत केले व सुरुवाती पासून फरक जाणवायला लागला.


१२ वर्ष चुकीची उपचार पद्धती मुळे तिचा व्यवसाय डबघाईला आला, दोन्ही हात कामातून जाण्याची वेळ आली, कौटुंबिक वाद उफाळून वर यायला लागले, सर्व कुटुंबातील लोक दूर जायला लागली व सर्वात वाईट घटना म्हणजे गर्भपात झाला. नकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक शक्ती आजू बाजूला तिच्या आत वावरत होती. समस्या अजून बिकट होत जाणार होत्या त्या सर्व थांबवल्या.


मनोविकार आणि मानसोपचार तज्ञ ह्यांची मदत घेत होती तिथे देखील निराशा हातात आली होती, म्हणजे मार्ग सर्व योग्य होते फक्त एकच चूक महागात पडली जी म्हणजे समस्येचे मूळ शोधण्याचे, एकदा का समस्येचे मूळ शोधून काढून टाकले कि सर्व उपाय तुमच्यावर योग्य काम करतात आणि नाही तर तेच शास्त्र तुमच्या समस्येच्या मुळांना नकळत ऊर्जा देतात व समस्या अजून वाढत जाते.


ज्या सहस्त्राकार चक्रामधून ऊर्जा ब्रम्हांडातून आत येवून हिलिंग सुरु होते त्याच सहस्त्राकार चक्रामधून ऊर्जा बाहेर चालली होती, दररोजचे आयुष्य जगायलाच ऊर्जा ठेवली जात नव्हती आणि त्यात भरीस भर कानात कंपने जाणवत होती म्हणजे जे काही उपाय सुरु आहेत ते सर्व पुढील व्यक्तीला समजत होते.


जेव्हा बाहेर जायचा योग यायचा तेव्हा अगोदरच्या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या स्त्री ची ऊर्जा शोषून घेतली जात होती, त्या सोबत स्त्री आणि पुरुष दोन्ही आकर्षित तर होत होते पण अगदी विचित्र पद्धतीने ते काही अजून समजून आले नाही.


तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे समस्या आहे तिथे समाधान देखील आहे, प्रश्न आहे आहे तिथे उत्तर देखील आहे, तुम्हाला ३ महिन्यांचा कालावधी ठेवून विविध उपाय करत जायचे आहे त्यामध्ये एकतर समस्या दूर होवून जाते किंवा कमी व्हायला लागते, कधी कधी २ शास्त्र वापरावे लागतात. म्हणजे प्रोग्रेस दिसून येते. म्हणजे वर्षे जावू द्या पण प्रोग्रेस दिसून येते. १२ वर्षात तर समस्या दूर होवून अद्भुत शक्ती जागृत झाल्या पाहिजे होत्या.


कधीही कोर्स किंवा उपचार करण्याची घाई करू नका, पहिले कन्सल्ट करा त्या नंतर निर्णय घ्या. तुमच्या आजूबाजूला अनेक थेरपी उपाय उपचार मिळतील आणि नाही मिळाले तर ऑनलाईन मिळतील. स्थानिक ते जगभर तुमच्यासाठी थेरपी उपाय व उपचार उपलब्ध आहेत.


जर काही समस्या असतील तर उपचार करा, आणि जर पर्यायी उपचार पद्धती मध्ये जायचे असेल तर कोर्सेस करा, पण कोर्सेस करून स्वतः उपचार करायला बसू नका, नकारात्मक परिणाम होईल.


धन्यवाद

अश्विनीकुमार


आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग

Comments