नकारात्मक लोक, परिस्थिती आणि वातावरण तुमच्या जन्मजात असलेल्या अद्भुत क्षमता नष्ट करतात.

 

एक व्यक्ती जिने शेअर बाजाराचा एक व्हिडीओ बघितला व इन्व्हेस्टमेंट सुरु केली. सुरुवाती पासून यशाच्या मार्गाने, आनंदाने समृद्ध आयुष्य जगत होता. एकदा एक अनोळखी व्यक्ती संपर्कात आली. त्याच्याशी बोलणे वाढले, त्या अनोळखी व्यक्तीने विनाकारण नकारात्मक बोलणे सुरु केले जसे कि "तू कुठे क्लास नाही केला?" "अश्याने तुला खूप नुकसान होईल." "तू असे नको करू , ते नको करू" असे सतत बोलत होता, काही महिने गेले शेवटी अश्या नकारात्मक बोलण्याचा परिणाम व्हायला लागला, आणि हळू हळू शेअर बाजारातील नफा घटून तोटा व्हायला लागला. इतका नैराश्यात गेला कि आत्महत्या करणार होता. एका जैन व्यापाऱ्याने माझा नंबर दिला, त्या व्यक्तीला कसे तरी सामान्य आयुष्य पर्यंत आणले आणि आज तो सामान्य आयुष्य जगत आहे. जो परिणाम व्हायचा तो झाला, मानसिक आघात तर झालाच पण जी अद्भुत शक्ती दडलेली जागृत केली होती ती नकारात्मक झाली त्यामुळे परत तिला जागृत करू शकत नव्हतो.


जर चांगले चालू आहे तर आहे तसे चालू राहू द्या, ह्यामध्ये तुम्हाला फक्त वाढ करत जायची आहे नाहीतर विविध मार्ग काढून ठेवायचे आहे. आणि जर शक्य नसेल तर आहे ते मेंटेन ठेवायचे आहे हेच आयुष्य आहे. पण वरील अनुभवानुसार ह्या विरुद्ध नकारात्मकता वाढत गेली, ती देखील स्वतः मधून नाही तर बाहेरून अनोळखी व्यक्तीपासून आतमध्ये आली. वेळ होता अडवू शकत होते पण असेच नकारात्मकते मध्ये वेळ घालवल्यास त्या नकारात्मकतेची सवय होते. आता तुम्हाला नकारात्मक परिस्थिती आणि लोकांमध्ये राहण्याचा धोका कळाला असेल, आयुष्यात अनुभव मिळतो जो बदलायला तुम्ही पाठी जावू शकत नाही.


तुमचा चांगला दयाळू स्वभाव तेव्हाच कामी येईल जेव्हा समोरील व्यक्ती धृत, गुन्हेगार प्रवृत्तीची नसेल, एखाद वेळेस धूर्त आणि गुन्हेगार चालेल पण विकृत नको. कारण तुम्ही तुमच्या जवळचे ज्यांना द्याला ते त्यांच्या प्रवृत्तीनुसार तुम्हाला अनुभव देतील. आपले आयुष्य म्हणजे काही सिनेमा नाही, माझ्या समोर कितीतरी चांगली कुटुंबे वाईट स्वभावाच्या व्यक्तींनी उध्वस्त केली, काहींच्या कहाण्या अजून स्थानिक भागात लोक सांगत असतात.


दुसरी व्यक्ती जिला जोडीदार आरामात भेटत जायचा, कोणीही कसाही असला तरी त्याचे रिलेशन चांगले चालायचे, मग एक मित्र अतिशय जळणारा पण खूप चांगला असणारा दिखावा करणारा तो सतत पाप पुण्य, चांगले वाईट इत्यादी बोलत बसायचा, त्यानंतर हळू हळू त्या व्यक्तीला त्याला मिळणाऱ्या रिलेशन बद्दल नकारात्मक बोलत बसायचा मग शेवटी परिणाम झालाच आणि जे जोडीदार मिळायचे ते मिळणे हळू हळू कमी होत त्याचे अस्तित्वच नाहीसे झाले कि काय असे झाले होते.


रिलेशन फक्त लॉज मध्ये जावून सेक्स करणे नाही तर रिलेशनशिपचे अनेक पैलू असतात पण आपल्या इथे फक्त एकच दिसते त्यापलीकडे नाही. ह्या विविध रिलेशनशिप मुळे त्याचे सर्वांगीण आयुष्य समृद्धततेणे चालले होते त्याला आडकाठी आली आणि नकारात्मक आयुष्य सुरु झाले. असे का झाले तर एका जळणाऱ्या मित्रामुळे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे आयुष्य असते हे मान्य नसलेल्या मित्रामुळे.


ह्या व्यक्तीला मी त्याच्या अगोदरच्या क्षमतेमध्ये आणू शकलो पण मैत्रीचा फोबिया राहिला, कारण एक नकरात्मकता इतकी घातक असते हे जो पर्यंत तुमचे आयुष्य उध्वस्त होत नाही तो पर्यंत तुम्हाला समजूनच येणार नाही. नकरात्मक वातावरण, परिस्थिती आणि लोक हळूवार भिननाऱ्या विषासारखी असतात. शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजेल पण तुम्ही काहीच करू शकत नाही.


एक व्यक्ती जिची पचन क्षमता चांगली होती, काही विशेष करावे लागत नव्हते, जस जसे इंटरनेट वर रील्स यायला लागले त्यामध्ये विविध प्रकारचे आरोग्याचे सल्ले यायचे, त्यामध्ये काही डॉक्टर परप्रांतीय आणि सहसा स्थानिक आहाराचा अनुभव नाही त्यामध्ये अजून भर पडली व जे घरचे खायचे त्यामध्येच चुका दिसायला लागल्या. त्या सातत्याने दिसणाऱ्या रील्स चा इतका परिणाम झाला कि जो काहीही पचवू शकत होता त्याचे लिव्हर खराब झाले होते.


जे अल्गोरिदम आहे ते असे वाटत आहे कि भारतातील लोकांना आणि पिढीला मानसिक शारीरिक रित्या बरबाद करण्यासाठी बनवले आहे. त्याला बरे करण्यास खूप प्रयत्न करावे लागले व त्यामध्ये यश देखील आले आणि त्यानंतर मी सर्वांना मोबाईल चा वापर कमी करण्याचा सल्ला दिला, त्याचा खूप फायदा झाला.


अशी अनके उदाहरणे आहेत जिथे वैवाहिक जीवन उध्वस्त झाले, मुलांचे शिक्षणावरील लक्ष उडाले, कौटुंबिक व्यवस्था धोक्यात आली आणि असे अनेक उदाहरणे जी सेक्स रिलेटेड आहे ती इथे सांगू देखील शकत नाही कारण लास्ट टाईम सेक्स वर व्हिडीओ टाकला त्याला हजाराच्या वर लाईक आले म्हणजे किती सेक्स बद्दल अज्ञान. लाईक पेक्षा इंटरनेट द्वारे योग्य लोक संपर्कात येणे महत्वाचे आहे.


नकारात्मकता ती कुठूनही येवू द्या, तिला हावी होऊ देवू नका. जर तुम्ही नकारात्मक वातावरणात राहिला तर त्याची तुम्हाला सवय होईल आणि त्यानंतर तुमचे आयुष्य उध्वस्त होईल, नंतर तुमचे आयुष्य सुधरू शकेल ह्यासाठी प्रयत्न करू शकतो पण हमी नाही देवू शकत कि पूर्ण ठीक होईल म्हणून, सहसा आयुष्यासोबत मस्करी करू नका, आयुष्य सरळ अनुभव देतो जो तुम्हाला जगायचाच आहे, तुम्ही पाठी जावून काहीही बदलू शकत नाही आणि परत शून्य किंवा वाजातून सुरुवात करावी लागेल कर तुम्ही जगलात तर.


विचार करा, आयुष्य तुमचे निर्णय तुमचा.


जर सकारात्मक लोक संपर्कात नसतील तर ध्यान, योग, व्यायाम, छंद क्लास, फिरणे आणि ज्या ज्या सकारात्मक एक्टिव्हीटी करू शकतात त्या त्या करा. नसेल तर गुरु तज्ञ लोकांच्या संपर्कात रहा. सकारात्मक आयुष्य जगण्याचे अगणित मार्ग आहेत आणि जास्त शोधावे देखील लागत नाही हि सकारात्मकतेची शक्ती आहे.


धन्यवाद

अश्विनीकुमार

आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, मानसशास्त्र, रेकी आणि हिलिंग


Image by Mohamed Hassan from Pixabay

Comments